या चहाच्या स्टॉलवरील स्वच्छता पाहून तुम्ही अवाक व्हाल!
मुंबईतील दादरमध्ये नुकतीच येवले या सुप्रसिद्ध चहाचा स्टॉल सुरू झाला आणि त्यात एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे
मुंबई : मराठी माणूस उद्योग धंद्यात मागे आहे किंवा उद्योग धंदा करण्यास लाजतो, असं सर्वांच्या बाबतीत खरं नाही. मराठी माणूस उद्योगधंदा करू शकत नाही, हे खोडून काढण्याचं काम मराठी महिलाच करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे मराठी माणूस जेव्हा खाण्यापिण्याच्या उद्योग धंद्यात पाऊल टाकतोय, तेव्हा स्वच्छतेलाच अधिक महत्व येत आहे. ज्या मराठी महिला खाद्यपदार्थांचे स्टॉल चालवतात, त्यांच्याकडे कमालीची स्वच्छता दिसून येत आहे.
मुंबईतील दादरमध्ये नुकतीच येवले या सुप्रसिद्ध चहाचा स्टॉल सुरू झाला आणि त्यात एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या स्टॉलवरील स्वच्छता पाहून तुम्ही अवाक व्हाल.
या व्हिडीओत तुम्ही चहा बनवण्यापासून ते कप धुण्यापर्यंत किती काळजी घेतली जात आहे. हे पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, मराठी महिला जे खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल चालवतात, ते नक्कीच किती स्वच्छ असतात.
VIDEO :