सवर्ण आरक्षण मिळण्यासाठी ही सात कागदपत्र आवश्यक
नवी दिल्ली : सवर्णातील गरीबांना 10 टक्के आरक्षण देणारं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमताने मंजूर झालं. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी आता केवळ राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची गरज आहे. या आरक्षणांतर्गत अनेकजण येऊ शकतात. त्यामुळे हे आरक्षण कधी लागू होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे. पण, हे आरक्षण लागू झाल्यानंतर ते मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता […]
नवी दिल्ली : सवर्णातील गरीबांना 10 टक्के आरक्षण देणारं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत बहुमताने मंजूर झालं. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी आता केवळ राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीची गरज आहे. या आरक्षणांतर्गत अनेकजण येऊ शकतात. त्यामुळे हे आरक्षण कधी लागू होणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे. पण, हे आरक्षण लागू झाल्यानंतर ते मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. यासाठी तुम्ही सवर्ण आरक्षणास पात्र असल्याचं सिद्ध करणारे सात पुरावेनिशी कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जर हे आठ कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला हे आरक्षण मिळवण्यात अडचण येऊ शकते.
सवर्ण आरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक आठ कागदपत्र
उत्पन्नाचा दाखला : सवर्ण आरक्षण हे केवळ त्या लोकांना लागू होईल ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा दाखला सादर करणे गरजेचं असेल. उत्पन्नाचा दाखला हा तहसील कार्यालय, सार्वजनिक सेवा केंद्र या ठिकाणी बनवला जातो.
आधार कार्ड : सवर्ण आरक्षणासाठी आधारकार्ड अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आज भारतातील बहुतेक लोकांकडे आधारकार्ड आहे. पण तुमच्याकडे आधारकार्ड नसेल तर तुम्ही ते आधार केंद्रावर जाऊन बनवून घेऊ शकता.
बीपीएल कार्ड : बीपीएल म्हणजे दारिद्र्यरेषेखाली येणारे लोक. हे कार्ड त्या लोकांसाठी असते जे आर्थिक स्तरावर एका निश्चित दारिद्र्यरेषेखालील जीवन जगतात. बीपीएलचं कार्ड अधिकृत सरकारी रेशनच्या दुकानात किंवा ग्रामपंचायतर्फे बनवले जाते.
पॅन कार्ड : पॅन कार्ड हे सध्या नोकरी आणि इतर सर्वच ठिकाणी अनिवार्य आहे. जर तुमच्याजवळ पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला आरक्षण मिळवण्यात अडचण येऊ शकते. तसेच पॅन कार्ड हे इतर सरकारी कामे, शिक्षा, नोकरी यांसाठीही महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता.
जनधन योजना : सवर्ण आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं जनधन योजने अंतर्गत बँकेत खातं असणे आवश्यक आहे. जनधन योजनेंतर्गत त्या खातेधारकांना लाभ मिळेल जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील.
इन्कम टॅक्स रिटर्न : आयकर परतावा किंवा इन्कम टॅक्स रिटर्न असणेही या आरक्षणासाठी आवश्यक असेल. इन्कम टॅक्स रिटर्नच्या माध्यमातून तुम्ही हे सिद्ध करु शकालं की, तुमचं आर्थिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे.
पासबुक किंवा बँक स्टेटमेंट : आरक्षणासाठी तुमच्याजवळ पासबुक किंवा बँकेचं स्टेटमेंट असणे आवश्यक असेल. यासाठी तुम्हाला बँकेचं मागील तान महिन्यांचं बँक स्टेटमेंट दाखवावं लागू शकतं. यामुळे तुमच्या उत्पन्नाची माहिती मिळते.
सवर्ण आरक्षण मिळवण्यासाठी तुमच्याकडे ही सर्व कागदपत्र असणे आवश्यक असणार आहे, तेव्हाच तुम्ही या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता.