डोनाल्ड ट्रम्प यांच्या धाकट्या भावाचे निधन, “जिवलग मित्र गेला” ट्रम्प यांना अश्रू अनावर

रॉबर्ट ट्रम्प यांनी 26 ऑगस्टला वयाची 72 वर्षे पूर्ण केली असती, मात्र अवघ्या दोन आठवड्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धाकट्या भावाचे निधन, जिवलग मित्र गेला ट्रम्प यांना अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Aug 16, 2020 | 11:06 AM

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धाकट्या भावाचे निधन झाले. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी रॉबर्ट ट्रम्प यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Younger brother of US President Donald Trump Robert Trump died)

व्हाईट हाऊसने परिपत्रक काढून रॉबर्ट ट्रम्प यांच्या निधनाची दु:खद वार्ता दिली. रॉबर्ट ट्रम्प यांनी 26 ऑगस्टला वयाची 72 वर्षे पूर्ण केली असती, मात्र अवघ्या दोन आठवड्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

“अत्यंत जड अंतकरणाने मला सांगावे लागत आहे, की माझा भाऊ रॉबर्ट याचे देहावसान झाले” असे ट्रम्प यांनी शनिवारी रात्री सांगितले. “तो माझा फक्त भाऊच नव्हता, तर जिवलग मित्रही होता. त्याची खूप आठवण येईल. मात्र आम्ही पुन्हा भेटू. त्याच्या स्मृती माझ्या मनात चिरंतन राहतील. रॉबर्ट, आय लव्ह यू. रेस्ट इन पीस” अशा भावना डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केल्या.

न्यूयॉर्क शहरातील रुग्णालयात रॉबर्ट यांच्यावर उपचार सुरु होते. शुक्रवारीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भावाची सदिच्छा भेटही घेतली होती. रॉबर्ट यांच्या आजारपणाविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गेल्या तीन महिन्यात ते दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल होते.

हेही वाचा : Tik-Tok अमेरिकेला विका, नाहीतर चालते व्हा, ट्रम्प यांचा इशारा

रॉबर्ट ट्रम्प हे ट्रम्प ऑर्गनायझेशनचे माजी उच्च पदाधिकारी होते. ट्रम्प कुटुंबातील चार भावंडांपैकी ते एक होते. त्यांचे आणखी एक बंधू फ्रेड ट्रम्प यांचे 1981 मध्ये निधन झाले. पुतणी आणि फ्रेड यांची कन्या मेरी ट्रम्प हिच्यासोबत झालेल्या कायदेशीर लढाईमुळे रॉबर्ट ट्रम्प प्रकाशझोतात आले होते. (Younger brother of US President Donald Trump Robert Trump died)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.