उंटाने चावा घेतल्याने 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू

परभणी: उंटाने चावा घेतल्याने 16 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. समीर शाहबुद्दीन असं या तरुणाचं नाव आहे. उंटाने गळ्याचा चावा घेतल्याने तो जखमी झाला होता, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. याप्रकरणी पोलिसांनी उंटासह मालकाला ताब्यात घेतलं आहे. काय आहे प्रकरण? परभणीत सध्या सय्यद शाह तुराबुल हक रहे दर्गाची उर्स […]

उंटाने चावा घेतल्याने 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:30 PM

परभणी: उंटाने चावा घेतल्याने 16 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. समीर शाहबुद्दीन असं या तरुणाचं नाव आहे. उंटाने गळ्याचा चावा घेतल्याने तो जखमी झाला होता, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्याचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं. याप्रकरणी पोलिसांनी उंटासह मालकाला ताब्यात घेतलं आहे.

काय आहे प्रकरण? परभणीत सध्या सय्यद शाह तुराबुल हक रहे दर्गाची उर्स यात्रा सुरु आहे. या यात्रेचा एक भाग म्हणून भक्तांकडून दर्ग्यापर्यंत संदल काढली जाते. यंदा शेख समद शेख गफूर यांनी संदल आयोजित केला होता. या संदलमध्ये घोडे, उंट यांचा समावेश असतो.

हा संदल जनता मार्केटजवळ पोहोचला, तेव्हा समीरने उंटाची दोरी खेचल्याचं सांगण्या येतंय. दोरी खेचल्याने उंट बिथरला आणि त्याने समीरच्या गळ्याचा चावा घेतला.

या प्रकाराने उपस्थित भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. उंटाने जबर चावा घेतल्याने समीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान 16 वर्षीय समीरचा मृत्यू झाला.

या मृत्यूमुळे यात्रेवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी उंट मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.