सोलापुरात शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन, टॉवरवरुन खाली उतरवताना प्रशासनाच्या नाकीनऊ

शेतकऱ्याने टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. त्या शेतकऱ्याला खाली उतरवताना प्रशासनाला नाकीनऊ आले आहे. (Youth farmer started solay style protest at Solapur collector office)

सोलापुरात शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन, टॉवरवरुन खाली उतरवताना प्रशासनाच्या नाकीनऊ
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 8:16 PM

सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने सावकारांकडून घेतलेल्या कर्जानंतर होणाऱ्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखे आंदोलन केले आहे. शेतकऱ्याने टॉवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले आहे. त्या शेतकऱ्याला खाली उतरवताना प्रशासनाला नाकीनऊ आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू जोपर्यंत दखल घेत नाहीत तोपर्यंत टॉवरवरुन खाली येणार नाही, अशी भूमिका तरुण शेतकऱ्यानं घेतली आहे. (Youth farmer started solay style protest at Solapur collector office)

पंढरपूर तालुक्यातील इब्राहिम याकूब मुलानी वय 30 या तरुणाने बँक कर्जाची परतफेड आणि दवाखाण्यासाठी गावातील खासगी सावकार शामराव सोपन भोसले आणि त्यांच्या मुलाकडून 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते. इब्राहिम मुलानी याने या बदल्यात 14 महिन्यानंतर 1 लाख 43 हजार परत दिले. मात्र, सावकार भोसले पिता-पुत्राने इब्राहिमकडून घेतलेले 12 लाखाचे कोरे चेक बँकेत भरले.  याप्रकरणी भोसले पिता-पुत्राचा निषेध म्हणून आणि न्याय मिळावा यासाठी इब्राहिम मुलाणी हा तरुण आज जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या टॉवर इब्राहिम मुलाणी चढला. जोपर्यंत सावकारांकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळत नाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री बच्चु कडू यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. त्यानंतरच टॉवर वरून खाली येणार असल्याचा पवित्रा इब्राहिम मुलानी यांनी घेतला आहे.

वीज बिल माफीसाठी स्वाभिमानीचे आंदोलन

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूरच्या महावितरण कार्यालयालासमोर आंदोलन करण्यात आल आहे. लॉकडाऊनच्या काळात सारे व्यवहार ठप्प होते. मात्र, लोकांचे जगणे मुश्किल झाले असताना महावितरण कडून मात्र वीज बिल आकारले जात आहे. त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटेनेने आंदोलन केले. येत्या काळात वीज बिल माफ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कृषी संशोधन केंद्रातील कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विभागीय कृषी संशोधन केंद्रात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अदयाप सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही. त्यामुळे कृषी संशोधन केंद्रात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आजपासून काळ्याफिती लावून कामकाजास सुरुवात केली आहे. या संदर्भात राज्य सरकारला अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. 2 नोव्हेंबरपर्यंतया संदर्भात निर्णय न घेतल्यास सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या:

दुकानदारांनी रॅपिड अँटीजन टेस्ट करा, रिपोर्ट गिऱ्हाईकांना दिसेल असा लावा, सोलापूर पालिका उपायुक्तांचे आदेश

Breaking | मुख्यमंत्री सोलापूर विमानतळावर दाखल, थोड्याच वेळात उस्मानाबादला होणार रवाना

(Youth farmer started solay style protest at Solapur collector office)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.