Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघे भाऊ बाईकवरुन जत्रेला गेले होते, वाटेत पैसे पडल्याचा बहाणा करुन भावाला थांबवले, यानंतर तरुण पुन्हा कधीच…

दोघे भाऊ भाऊ बाईकवरुन जत्रेला गेले. मात्र जत्रेत पोहचण्याआधीच मोठ्या भावाचा घात झाला. मात्र प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर जे उघडकीस आले त्यानंतर पोलीसही चक्रावले.

दोघे भाऊ बाईकवरुन जत्रेला गेले होते, वाटेत पैसे पडल्याचा बहाणा करुन भावाला थांबवले, यानंतर तरुण पुन्हा कधीच...
अनैतिक संबंधातून पत्नी आणि भावाने तरुणाला संपवलेImage Credit source: freepik
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 9:28 PM

बेगूसराय : बिहारमध्ये रक्ताच्या नात्यांना काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. सुट्टीवर घरी आलेल्या मोठ्या भावाचा लहान भावाने काटा काढल्याची घटना घडली. बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यात ही घटना घडली. जत्रेला जाण्याच्या बहाण्याने भाऊ भावाला सोबत घेऊन गेला. मग ठरल्या ठिकाणी पैसे पडल्याचे सांगत बाईक थांबवायला सांगितली. मग बाईकवरुन उतरुन पैसे शोधू लागला. हीच संधी साधून सुपारी किलरने मोठ्या भावावर गोळ्या घातल्या. मात्र सख्या भावानेच आपल्या भावासोबत केलेले कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या हत्येमागचे कारण ऐकून सर्व हैराण झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

मयत शिवम कुमार हा गुजरातमध्ये नोकरी करत होता. लग्नानंतरही तो पत्नीला गावी ठेवून गुजरातमध्ये नोकरीनिमित्त राहत होता. अधून मधून सुट्टी घेऊन तो घरी यायचा. पण पती जवळ नसल्याने पत्नीचे लहान दिराशी सूत जुळले. दोघं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. यामुळे त्यांना शिवम कुमार त्यांच्या मार्गातील काटा वाटत होता.

सध्या शिवम सुट्टीवर घरी आला होता. यावेळी तो पत्नीला सोबत घेऊन जायचं म्हणत होता. यामुळे शिवमचा भाऊ शुभम आणि पत्नी चांदणी यांनी त्याला मार्गातून दूर करण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी एका गुंडाला शिवमची सुपारी दिली होती. प्लानप्रमाणे शुभम शिवमला बाईकवर जत्रेच्या निमित्ताने घेऊन गेला. त्यानंतर ठरल्या जागी आपले पैसे पडल्याचे निमित्त करुन बाईक थांबवली. यानंतर आधीच दबा धरुन बसलेल्या आरोपीने शिवमवर गोळी झाडली.

हे सुद्धा वाचा

घटना लूट करण्याच्या हेतूने झाल्याची दर्शवण्यासाठी शिवमची बाईक घेऊन फरार झाला. गोळीबारात शिवमचा जागीच मृत्यू झाला. मात्र पोलीस तपासात सर्व सत्य उघडकीस आले. यानंतर पोलिसांना भाऊ शुभम कुमार, पत्नी चांदनी आणि हत्या करणारा आरोपी राजकिशोर कुमार यांना अटक केली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.