विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान भरकटला, चार तास दगडाला लटकून राहिला

विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंग करताना अडकलेल्या पर्यटकाची सुमारे चार तासांनी सुटका करण्यात आली. हा पर्यटक अपुर्‍या माहितीमुळे रस्ता भरकटून जंगलात अवघड ठिकाणी अडकला होता.

विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान भरकटला, चार तास दगडाला लटकून राहिला
Follow us
| Updated on: Jul 19, 2019 | 2:55 PM

पुणे : विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंग करताना अडकलेल्या पर्यटकाची सुमारे चार तासांनी सुटका करण्यात आली. हा पर्यटक अपुर्‍या माहितीमुळे रस्ता भरकटून जंगलात अवघड ठिकाणी अडकला होता. सुमारे चार तासाच्या प्रयत्नानंतर त्याची सुखरुप सुटका करण्यात आली.

तळेगावातील जनरल हॉस्पिटलमधील आठ ते दहा शिकाऊ डॉक्टर सोमवारी विसापूर किल्ला परिसरात ट्रेकिंगला गेले होते. यावेळी किल्ला चढत असताना, अमर कोरे नावाचा तरुण रस्ता चुकला आणि अवघड ठिकाणी अडकला. तिथून ना त्याला वर चढणे शक्य होते, ना खाली उतरणे.

अशा परिस्थितीत अमर कोरेचा सहकारी कौशिक पाटीलने लोणावळ्यातील शिवदुर्ग टीमशी संपर्क साधला. मोबाईल लोकेशन पाठवून त्यांची मदत मागितली. सुदैवाने

शिवदुर्गचा कार्यकर्ता सागर कुंभार हा भाजे लेणी परिसरातच होता. त्याने तत्परता दाखवत घटनास्थळी पोहोचला. सागर कुंभारने त्याची टीम आणि रेस्क्या साहित्य मागवून घेतलं.

सुमारे अर्धा ते पाऊण तासात लोहगड मार्गे ही बचाव टीम गायखिंडीत दाखल झाली. किल्ल्यापर्यंत गाडी जाणे शक्य नसल्याने, पायी प्रवास करत टीम किल्ल्याजवळ पोहचली. दुपारी दोनच्या सुमारास रेस्क्यू कार्य सुरु केलं. त्यांतर संध्याकाळी साडेचार वाजता अमरची सुटका करण्यात आली. अडकलेल्या अमरची अडीच तासात सुटका केली असली तरी तो साडेचार तास एका दगडला पकडून बसला होता.

विकास मावकर, सागर कुंभार, सागर बाळकुंद्री, पवन म्हाळसकर, दत्ता तनपुरे, रोहित नगिने, हेमंत वाघमारे, निलेश निकाळजे, अनिल आंद्रे, वैष्णवी भांगरे, निकेत तेलंगे, अमित भदोरीया, दिनेश पवार, आनंद गावडे, सुनिल गायकवाड या टीमने मदत आणि बचावकार्य केले.

Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.