Zomato आता घरचं जेवणही पुरवणार

वेळेअभावी, मुडमुळे किंवा बदललेल्या कामाच्या स्वरुपांमुळे बाहेरचे जेवण मागवले जात असले, तरी एक असाही वर्ग आहे जो घरच्या जेवणाची मागणी करतो. हा वर्गही मोठा आहे. यावरच लक्ष ठेऊन झोमॅटोने (Zomato) एक मोठी घोषणा केली आहे.

Zomato आता घरचं जेवणही पुरवणार
झोमॅटो आपल्या युजर्सना देतेय ‘अनलिमिटेड फ्री डिलीव्हरी’
Follow us
| Updated on: Jul 08, 2019 | 8:18 PM

मुंबई : कधी कधी जेवण बनवण्याचा मुड नसेल तर हमखास बाहेरुन जेवण मागवले जाते. महिन्यात किमान 4-5 वेळा सहजच असं होताना दिसतं. त्यामुळेच सध्या ‘रेडी टू ईट’, ‘फास्ट फूड’चा बाजार जोरात सुरु आहे.

वेळेअभावी, मुडमुळे किंवा बदललेल्या कामाच्या स्वरुपांमुळे बाहेरचे जेवण मागवले जात असले, तरी एक असाही वर्ग आहे जो घरच्या जेवणाची मागणी करतो. हा वर्गही मोठा आहे. यावरच लक्ष ठेऊन झोमॅटोने (Zomato) एक मोठी घोषणा केली आहे. झोमॅटोने आपल्या ग्राहकांना आता घरचे जेवण पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण अथवा नोकरीमुळे घरापासून दूर असणाऱ्यांना घरचे जेवण देखील खाता येणार आहे. बाहेरचं खाऊन कंटाळा आल्याचं आपण नेहमीच ऐकत असतो. याचाच विचार करत झोमॅटोने घरचे जेवण देण्याची योजना आखली आहे.

फुड इंडस्ट्रीचा व्यवसाय सध्या चांगलाच तेजीत आहे. लोकांना ऐनवेळी हवे ते जेवण उपलब्ध करुन देणारे अनेक अॅप उपलब्ध आहेत. यात झोमॅटोही आघाडीवर आहे. आता घरच्या जेवणासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी झोमॅटोने कंबर कसली आहे. झोमॅटोच्या टिफिन सेवेत खास घरचे जेवण दिले जाईल. विद्यार्थी आणि नोकरदारांना त्यांच्या आवडीनुसार हे टिफिन पुरवले जातील. त्यामुळे येणाऱ्या काळात या योजनेला किती प्रतिसाद मिळतो ते येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

दरम्यान, मुंबईत आधीपासूनच टिफिन सेवा लोकप्रिय आहे. आता ही सेवा देशातील इतर भागातही लोकप्रिय होत आहे. याचाच विचार करुन झोमॅटो देखील टिफिन सेवेत उतरली आहे. झोमॅटोने एक ट्विट करत मित्रांनो कधीकधी घरचं जेवण देखील खायला हवं, असं म्हटलं आहे. झोमॅटोच्या आधीपासून स्विगीने ही सेवा सुरु केली आहे. विशेष म्हणजे स्विगीने आपल्या प्लॅटफॉर्मवर घरचे जेवण तयार करुन पुरवणाऱ्यांनाही संधी दिली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.