बापरे! तब्बल 11 वेगवेगळ्या प्रकारे वाजवला जातो ट्रेनचा ‘हॉर्न’, साखळी खेचताच वाजते शिट्टी!

प्रवासादरम्यान आजही आपण सर्वजण रेल्वेचे हॉर्न ऐकतो. परंतु, ट्रेनचा हॉर्न वाजवण्याचे किती प्रकार आहेत आणि या हॉर्नचा नेमका अर्थ काय? याचा विचार आपण करतच नाही.

बापरे! तब्बल 11 वेगवेगळ्या प्रकारे वाजवला जातो ट्रेनचा ‘हॉर्न’, साखळी खेचताच वाजते शिट्टी!
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 10:47 AM

मुंबई : रेल्वेचा भोंगा अर्थात हॉर्न (Indian railway horn) आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडतो. लहान मुलांमध्ये ट्रेनची हॉर्नची बरीच क्रेझ असते. जेव्हा ट्रेन थांबते किंवा रेल्वे स्टेशनमधून पास होते, तेव्हा ट्रेनचा हॉर्न वाजवला जातो. प्रवासादरम्यान आजही आपण सर्वजण रेल्वेचे हॉर्न ऐकतो. परंतु, ट्रेनचा हॉर्न वाजवण्याचे किती प्रकार आहेत आणि या हॉर्नचा नेमका अर्थ काय? याचा विचार आपण करतच नाही. अनेकदा हे हॉर्न वेगळ्याप्रकारे वाजतात, परंतु आपण नेहमीचं समजून त्याकडे दुर्लक्ष करतो (11 types of Indian railway horn).

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रेनचे हे हॉर्न तब्बल 11 वेगवेगळ्या प्रकारे वाजवले जातात. या हॉर्नच्या माध्यमातून ट्रेनचा चालक आणि गार्ड यांच्यात ताळमेळ साधला जातो. चला तर, जाणून घेऊया हे हॉर्नचे प्रकार आणि त्या आवाजाशी संबंधित सर्व माहिती…

  1. एक छोटा हॉर्न

जर लोकोपायलट लहान हॉर्न वाजवित असेल तर याचा अर्थ असा की, ट्रेन धुण्यासाठी आणि साफसफाईसाठी यार्डात जाण्यास तयार आहे. यानंतर, ती पुन्हा प्रवाशांसह पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

  1. दोन छोटे हॉर्न

ट्रेन प्रवासासाठी तयार असताना हा हॉर्न वाजवला जातो. या हॉर्नद्वारे, लोकोपायलट गार्डना संकेत देतो की, ट्रेन प्रवासासाठी तयार आहे, पुढे जाण्यासाठी सिग्नल द्या.

  1. तीन छोटे हॉर्न

रेल्वेचा लोकोपायलट तीन लहान हॉर्न आणीबाणीच्या स्थितीत वाजवतात. याचा अर्थ असा होतो की, ड्रायव्हरने इंजिनवरील नियंत्रण गमावले आहे. म्हणून तो या हॉर्नद्वारे गार्डना संकेत देती की, त्यांनी व्हॅक्यूम ब्रेक त्वरित खेचला पाहिजे. अशी घटना क्वचितच घडते आणि हा ब्रेकदेखील आपत्कालीन स्थितीतच वापरला जातो (11 types of Indian railway horn).

  1. चार लहान हॉर्न

ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड असताना चार लहान हॉर्न वाजवले जातात. जर चालत असलेली ट्रेन थांबली असेल आणि ड्रायव्हर चार वेळा लहान हॉर्न वाजवत असेल तर, तो गार्डला हा इशारा देत आहे की, इंजिन खराब झाल्यामुळे ट्रेन पुढे जाऊ शकत नाही.

  1. एक लांब आणि एक लहान हॉर्न

ट्रेन चालवण्यापूर्वी किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी, ब्रेक पाईप सिस्टम तपासण्यासाठी लोकोपायलट एक लांब आणि एका लहान हॉर्नद्वारे गार्डवर सूचित करतो. यानंतर गार्ड ब्रेक ठीक काम करत आहे की नाही, हे तपासतात.

  1. दोन लहान आणि एक लांब हॉर्न

या हॉर्नने ड्रायव्हर गार्डला इंजिनवर नियंत्रण ठेवण्यास सूचित करतो. हा हॉर्न तेव्हाच वाजवला जातो, जेव्हा कोणी ट्रेनची इमरजन्सी साखळी (आपातकालीन साखळी) ओढली किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक लावला तरच हा हॉर्न वाजवला जातो (11 types of Indian railway horn).

  1. बराच वेळ वाजणारा लांब हॉर्न

जर हा हॉर्न कोणत्याही स्टेशनवर ऐकू आला तर, याचा अर्थ असा आहे की, ती ट्रेन त्या स्थानकावर थांबणार नाही. ट्रेन स्थानक नॉनस्टॉप ओलांडणार आहे.

  1. दोनदा थांबून हॉर्न वाजवणे

जर ड्रायव्हर जरा थांबून लांब हॉर्न देत असेल तर, ट्रेन स्थानकाजवळची क्रॉसिंग पार करणार आहे. या हॉर्नमधून लोको पायलट ट्रॅकच्या सभोवताली असणाऱ्या लोकांना ट्रेन येत असल्याची सूचना देतो.

  1. दोन लांब आणि एक लहान हॉर्न

जर आपण प्रवास दरम्यान हा हॉर्न ऐकला तर, समजून घ्या की ट्रेन ट्रॅक बदलत आहे.

  1. सहावेळा छोटा हॉर्न

ट्रेनचा लोकोपायलट जेव्हा सहावेळा छोटे हॉर्न वाजवतो, तेव्हा तो ट्रेन काही अडचणीत अडकली आहे, हे सूचित करतो. याद्वारे तो मदतीसाठी जवळच्या स्टेशनला सहाय्य मागतो.

  1. दोन लांब आणि दोन लहान हॉर्न

दोन लांब आणि दोन लहान हॉर्न वाजवून मोटरमन गार्डला इंजिनचा ताबा घेण्यास सूचित करतो.

(11 types of Indian railway horn)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.