Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Obesity | नेहमीपेक्षा 15 मिनिटही कमी झोप वाढवू शकते लठ्ठपणाची समस्या, निर्माण होऊ शकतो रक्तदाबाचा धोका!

जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते, तेव्हा आपण आपल्या आहाराकडे लक्ष देतो, वर्कआउट्सवर लक्ष केंद्रित करतो, आपले लक्ष लहान लहान तपशीलांकडे जाते. परंतु, पुरेशी झोप देखील आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाची असते, हे आपण विसरून जातो.

Obesity | नेहमीपेक्षा 15 मिनिटही कमी झोप वाढवू शकते लठ्ठपणाची समस्या, निर्माण होऊ शकतो रक्तदाबाचा धोका!
लठ्ठपणाची समस्या
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 1:26 PM

मुंबई : जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते, तेव्हा आपण आपल्या आहाराकडे लक्ष देतो, वर्कआउट्सवर लक्ष केंद्रित करतो, आपले लक्ष लहान लहान तपशीलांकडे जाते. परंतु, पुरेशी झोप देखील आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाची असते, हे आपण विसरून जातो. बर्‍याच लोकांना यावर विश्वासही बसणार नाही की, कमी झोपेमुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे केवळ तब्येत खराब होत नाही, तर वजनही वाढते. गेल्या काही दशकांपासून जसजशी लोकांची झोप कमी होत आहे, तस तशी त्यांच्यात लठ्ठपणाची समस्या वाढत आहे (15 minutes less sleep than regular sleep can cause obesity).

शरीराचे वजन आणि झोपेचा संबंध काय?

हे लक्षात घेऊन, अनेक संशोधकांनी शरीराचे वजन आणि झोपेचा संबंध काय आहे?, हे शोधण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत, बर्‍याच अभ्यासामध्ये एक गोष्ट सामान्य होती, ती म्हणजे कमी झोपेमुळे आणि रात्री 7 ते 8 तास झोप न लागल्यामुळे एखाद्याला भूक नियंत्रित करणे अवघड होते. म्हणूनच लठ्ठपणापासून हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि टाईप 2 मधुमेह यासारखे गंभीर आजार उद्भवतात.

एक लाखाहून अधिक लोकांवर केला अभ्यास

‘जामा इंटर्नल मेडिसीन’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की, जर एखादी व्यक्ती नेहमीच्या झोपेपेक्षा 15 मिनिटापेक्षा कमी झोपली, तर तिचे वजनही खूप वाढू शकते. या अभ्यासानुसार 1 लाख 20 हजार लोकांच्या झोपेच्या गुणवत्तेवर 2 वर्षासाठी परीक्षण केले गेले आणि त्यासाठी स्मार्टफोन, स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्सवरील स्लीप अ‍ॅप्स या गोष्टी वापरल्या गेल्या. अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, ज्यांच्या बीएमआय 30 पेक्षा जास्त आहे, त्यांना लठ्ठपणाची समस्या म्हणून वर्गीकृत केले गेले. या लोकांमध्ये निरोगी बीएमआय असलेल्यांपेक्षा केवळ 15 मिनिटांच्या झोपेची कमी आहे (15 minutes less sleep than regular sleep can cause obesity).

झोपेची कमतरता असल्यास भूक वाढवणारे हार्मोन वाढते!

संशोधनात असेही समोर आले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती पुरेशी झोपू शकत नाही, तेव्हा शरीरात घ्रेलिन संप्रेरक वाढतो आणि लेप्टिन संप्रेरकाची कमतरता सुरू होते. लेप्टिन भूक कमी करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो. तर, घ्रेलिन एक वेगाने वाढणारे हार्मोन आहे, जे भूक वाढवते आणि वजन वाढण्यास जबाबदार असते. टाईप 2 मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका देखील वजन वाढल्यामुळे लक्षणीय वाढला आहे.

यूकेमधील 10 हजार 308 लोकांवर केलेल्या अभ्यासात संशोधकांना असे आढळले आहे की, ज्यांनी आपली रोजची रात्रीची झोप 7 तासांवरून 5 तासांपर्यंत कमी केली आहे,  त्यांच्यात हृदयरोगामुळे मृत्यूची जोखीम इतर अनेक कारणांपेक्षा दुप्पट होती.

(15 minutes less sleep than regular sleep can cause obesity)

हेही वाचा :

Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!

Onion Hacks | कांदे कापताना डोळ्यांतून घळाघळा अश्रू येतात? मग, ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.