घर खरेदी करण्यासाठीचे 2025मधील शुभ मुहूर्त कोणते? या तारखांना घर घेतले तर…

2025मध्ये घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा लेख महत्त्वाचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुभ मुहूर्तावर घर खरेदी केल्याने आर्थिक फायदा आणि घरात सुख-शांती मिळते. या लेखात 2025 च्या शुभ दिवसांची यादी देण्यात आली आहे. जानेवारी ते डिसेंबरपर्यंत महिन्यानुसार शुभ तारखा स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

घर खरेदी करण्यासाठीचे 2025मधील शुभ मुहूर्त कोणते? या तारखांना घर घेतले तर...
Follow us
| Updated on: Jan 06, 2025 | 3:36 PM

प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. ते म्हणजे हक्काच्या घराचं. आपलं हक्काचं घर असावं. छोटं का होईना पण आपलं असावं. त्यासाठी मग प्रत्येकजण अपार मेहनत करत असतो. आयुष्याची सर्व पुंजी घरात घालवत असतो. ही संपूर्ण पूंजी घरासाठी खर्च केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद निर्माण होतो, तो शब्दात व्यक्त करता येत नाही. गेल्या वर्षी अनेकांनी घरे घेतली. त्यांच्या मनावरचं मोठं ओझं कमी झालं. ज्यांनी गेल्या वर्षी घर खरेदी करता आलं नाही. ते या वर्षी घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. पण घर खरेदी करताना शुभ काळ लक्षात घेतला पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार, जर आपण शुभ काळात घर खरेदी केले, तर ते खूप फायदेशीर ठरते. जे लोक शुभ काळात घर खरेदी करतात, त्यांना आर्थिक लाभ होतो आणि त्याच्या घरात सुख आणि शांती नांदते.

शुभ काळ विशेष तिथींवर आधारित

विशेष तिथींवर शुभ काळ असतो. हे तिथी ग्रह आणि नक्षत्रांच्या मांडणीवर आधारित निवडले जातात, असं ज्योतिष शास्त्र सांगतं. नवीन वर्ष 2025 आता सुरू झालंय. अनेक लोक यंदाच्या वर्षात घर खरेदी करण्याचा प्लान करतील. अशा परिस्थितीत, त्यामुळेच या वर्षी म्हणजे 2025मध्ये घर खरेदी करण्यासाठीचा उत्तम काळ कोणता आहे हे जाणून घेऊया.

2025 मध्ये घर खरेदी करण्याचे शुभ दिवस

जानेवारी 2025 :

हे सुद्धा वाचा

जानेवारीत घर खरेदी करण्यासाठी एकूण 5 शुभ दिवस आहेत. 16, 17, 23, 24 आणि 31 तारखेला घर खरेदी करणे अत्यंत शुभ ठरेल.

फेब्रुवारी 2025 :

या महिन्यात घर खरेदी करण्यासाठी 7, 13, 14, 20, 21 आणि 28 तारखेला शुभ दिवस आहेत. या महिन्यात एकूण 6 शुभ दिवस आहेत.

मार्च 2025 :

मार्चमध्ये घर खरेदी करण्यासाठी एकूण 7 शुभ दिवस आहेत. 6, 7, 13, 20, 21, 27 आणि 28 तारखेला घर खरेदी करणे शुभ मानलं जातं.

जुलै 2025 :

या महिन्यात घर खरेदी करण्यासाठी 5 शुभ दिवस आहेत. 10, 11, 17, 24 आणि 25 तारखेला घर खरेदी करणे शुभ ठरेल.

ऑगस्ट 2025 :

ऑगस्ट महिन्यात घर खरेदी करण्यासाठी एकूण 6 शुभ दिवस आहेत. 1, 7, 14, 21, 22 आणि 29 तारखेला घर खरेदी करणे शुभ ठरेल.

सप्टेंबर 2025 :

18, 19, 25 आणि 26 या सप्टेंबर महिन्यातील शुभ तारखा आहेत. या दिवशी घर खरेदी केलं जाऊ शकतं.

ऑक्टोबर 2025 :

ऑक्टोबर महिन्यात 16, 17, 23 आणि 24 तारखेला घर खरेदी करणे शुभ ठरेल.या महिन्यात फक्त चारच तारखा आहेत.

नोव्हेंबर 2025 :

नोव्हेंबरमध्ये सहा शुभ दिवस आहेत. 7, 13, 14, 20, 21 आणि 28 तारखेला घर खरेदी करणे शुभ ठरेल.

डिसेंबर 2025 :

डिसेंबर महिन्यात एकूण 5, 11, 17, 19 आणि 26 तारखेला घर खरेदी करणे शुभ ठरेल. या महिन्यात घर खरेदी करण्यासाठी एकूण पाच दिवस शुभ आहेत.

या महिन्यात शुभ काळ नाही…

2025मध्ये मार्च महिन्यानंतर एप्रिल, मे आणि जून महिन्यात घर खरेदीसाठी कोणताही शुभ काळ नाही. कारण या महिन्यांत घर खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त उपलब्ध नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.