3 सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा, ज्या मोठ्या मेकअप आर्टिस्टलाही करतील फेल

साध्या सोप्या पद्धतीचा अवलंबन करून तुम्ही डोळ्यांच्या मेकअप अगदी प्रोफेशनल पद्धतीने करू शकता. एखाद्या मोठ्या मेकअप आर्टिस्टप्रमाणे मेकअप करून तुम्ही त्यांना फेलही करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही जर डोळ्यांचा मेकअप करू शकता.

3 सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवा, ज्या मोठ्या मेकअप आर्टिस्टलाही करतील फेल
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 5:49 PM

लग्नसमारंभाला जायचं असो किंवा घरातल्या छोट्याश्या कार्यक्रमाला जायचे असल्यास आपण प्रत्येकजण छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी पार्लरमध्ये जातो. त्यात आपण कार्यक्रमात लग्नात सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतो, पण मेकअप करताना आपले डोळे सुंदर दिसण्यासाठी त्यावर चांगल्या पद्धतीने आयशॅडो लावण्याची शिफारस करतो. त्यासाठी किमान एक हजार दोन हजार खर्च येतो. पण आता पैसे खर्च करण्याची गरज नाही? कारण तुम्ही या ट्रिक्सच्या मदतीने डोळ्यांचा मेकअप केला तर एखाद्या मोठ्या मेकअप आर्टिस्टप्रमाणे मेकअप करून तुम्ही त्यांना फेलही करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच 3 अतिशय सोप्या मेकअप ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत. त्या शिकल्या तर पार्लरमध्ये जाण्याचीही गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत या सोप्या ट्रिक्स.

टेपच्या मदतीने परफेक्ट आयशॅडो लावा

चांगल्या प्रकारे आयशॅडो लावण्यासाठी तुम्ही टेपचा वापर करू शकता. यासाठी प्रथम डोळ्यांच्या बाहेरील बाजूला टेप लावा आणि नंतर तुमच्या आवडीच्या शेड प्रमाणे आयशॅडो लावा. आयशॅडो लावल्यानंतर टेप काढा. टेप लावल्याने आयशॅडो डोळ्यांमधून बाहेर जाऊन पसरत नाही. यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने तुमच्या डोळ्यांवर आयशॅडो लागले जाते.

टेपमुळे आयशॅडोचा अँगल गोलाकार पद्धतीने करण्यासाठी इअरबड्स घ्या त्यानंतर हे इअरबड्स थोडेसे ओले करून त्याद्वारे थोडाफार बाहेर आलेला आयशॅडो स्वच्छ करा.

यानंतर दुसरी टेप डोळ्यांच्या बाजूला तिरक्या पद्धतीने लावा आणि नंतर त्यावर आयशॅडो लावून घ्या त्यानंतर ही टेप काढून टाका.

अश्या पद्धतीने जर तुम्ही आयशॅडो लावलात तर तुमचे डोळे खूप छान दिसतील.

आयलाइनर लावण्याची सोपी पद्धत

अनेकदा आपण जेव्हा स्वतः आयलाइनर लावतो तेव्हा एका डोळ्यांवर चांगल्या पद्धतीने लागले जाते पण मात्र कधी दुसऱ्या डोळ्यांवर बारीक किंवा जाड पद्धतीने वेगवेगळे आयलाइनर लागले जातात. दोन्ही डोळ्यांच्यावर योग्य पद्धतीने आयलाइनर लावायचे असल्यास ही ट्रिक तुमच्यासाठी आहे. तुम्हाला फक्त तुमच्या तर्जनी बोटावर आयलाइनरचा एक ठिपका लावा. यानंतर हे बोट डोळ्याच्या एका कोपऱ्यावर ठेवा आणि नंतर कानाकडे सरकवून एक रेषा तयार करा. बघा काही मिनिटामध्ये तुम्ही आयलाइनर लावला. त्याचप्रमाणे दुसऱ्या डोळ्यांच्यावर आयलाइनर लावा. अश्याने तुमच्या डोळ्यांवर परफेक्ट आयलाइनर लागेल आणि डोळे छान दिसतील.

इयरबड्सने कलरफुल आयशॅडो लावा

तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या डोळयांना आकर्षक बनवण्यासाठी इयरबड्सच्या मदतीने परफेक्ट कलरफुल आयशॅडो शेड लावू शकतात. यासाठी तुम्हाला सर्व प्रथम डोळ्याच्या कोपऱ्यात तिरक्या पद्धतीने टेप लावून घ्या, त्यानंतर इयरबड्सच्या मदतीने तुमच्या आवडीचे आयशॅडो शेड घेऊन डोळ्यांवर लावा. त्यानंतर मेकअप ब्रशच्या साहाय्याने आयशॅडो स्प्रेड करा. त्यानंतर टेप काढून टाका अश्याने तुम्ही लावलेला आयशॅडो बाहेर येणार नाही आणि छान पद्धतीने आयशॅडो लागला जाईल.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.