व्यायाम न करताही फिटनेस ठेवण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स

मुंबई : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे नोकरी करणाऱ्या महिलांना फिटनेससाठी व्यायाम करणेही कठीण होत आहे. त्यात जर नोकरी बैठे कामाची असेल तर मग वजन कमी करणे अगदीच जिकीरीचे होते. अशास्थितीत योग्य आहार (डायट) तुमचं वजन कमी करु शकतो. व्यायाम दिर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. मात्र, वजन कमी करताना व्यायामासाठी नेहमीच वेळ मिळेल असेही नाही. […]

व्यायाम न करताही फिटनेस ठेवण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे नोकरी करणाऱ्या महिलांना फिटनेससाठी व्यायाम करणेही कठीण होत आहे. त्यात जर नोकरी बैठे कामाची असेल तर मग वजन कमी करणे अगदीच जिकीरीचे होते. अशास्थितीत योग्य आहार (डायट) तुमचं वजन कमी करु शकतो.

व्यायाम दिर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. मात्र, वजन कमी करताना व्यायामासाठी नेहमीच वेळ मिळेल असेही नाही. अशावेळी तुम्ही तुमच्या आहारावर काम करु शकता. आपल्या जेवणात केवळ काही पौष्टिक पदार्थांचा सहभाग करणे आवश्यक आहे.

ब्रेकफास्‍ट करायलाच हवा 

कामाला महत्व देणारे कामाला उशीर होऊ नये म्हणून अनेकदा सकाळचा नाश्ता न करताच बाहेर पडतात. ही एक मोठी चूक असून ती टाळायला हवी. संपूर्ण दिवस उत्साहवर्धक जाण्यासाठी आपल्या शरीराला दुपारच्या जेवणाआधी नाश्‍त्याची आवश्यकता असते. जर नाश्ता करणे टाळले तर तीव्र भूक लागल्यानंतर शरीरातील फॅट्स आणि साखर संपून जाते. दुसरीकडे नाश्ता केल्यास दिवसभरासाठी कॅलरी मिळतात आणि पचनक्रिया देखील सुधारते. त्यामुळे ऑफिसच्या कामातही उत्साह टिकून राहतो.

कॉफी आणि चहाच्या सेवनावर नियंत्रण ठेवा

बहुसंख्य नोकरदार महिला काम करताना चहा किंवा कॉफी पितात. बऱ्याच कॉफी मशीनमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या पावडरचा उपयोग होतो. त्यामुळे चहा किंवा कॉफीचे प्रमाण अगदी एक कपापर्यंत कमी असावे किंवा पूर्णपणे बंद करावे. यामागे एरिजोना विश्वविद्यालयाच्या संशोधनाचाही आधार आहे. येथील पर्यावरण मायक्रोबायोलॉजीचे प्रोफेसर चार्ल्स गेरबा यांनी केलेल्या संशोधनात आढळले आहे, की कामाच्या ठिकाणावरील किचनमध्ये 90 टक्क्यांपर्यंत कीटाणू असतात.

घरचे जेवण करण्याला पसंती द्या

ऑफिस फूड कोर्टमधून किंवा हॉटेलमधून जेवण मागवणे सोपे असते. मात्र ही सवय आरोग्यदायी आहाराची नाही. नोकरी करणाऱ्या महिलांना दुपारी घरी बनवलेल्या पौष्टिक जेवणाची गरज असते. तुमची शक्ती वाढवण्यासाठी टिफिन बॉक्समध्ये भाजी, पोळी, भात, दाळ आणि सलाड असा चौकस आहार असणे अत्यावश्यक आहे. ऑफिसमधील चटपटे स्नॅक्स आरोग्याला अपायकारक आहेत. त्यापेक्षा फळांचे सेवन अधिक उपयोगी आहे. फिटनेस ठेवायची असेल तर जंक फुड आणि तेलकट पदार्थांपासून बाजूला राहायला हवे. स्नॅक्स घेताना त्यात प्रोटीन, कॅल्शियम, फॅट्स, कार्बोहायड्रेड्स (कार्ब्स), खनिज आणि फायबरचे भरपूर प्रमाण असावे. त्यामुळे वजनात तर मदत होतेच, सोबत आजारांपासून संरक्षणही मिळते. पॅकेज फूड स्वादिष्ट लागते आणि सहज उपलब्धही होते. मात्र, त्यामुळे त्यामुळे शरीराला चांगलेच नुकसान होते.

डिनर देखील महत्वाचा 

रात्री जेवताना तुम्ही काय खाता याविषयी योग्य ती काळजी घ्यायला हवी. कार्बोहायड्रेड्स घ्यायला कंटाळा करु नका. त्यात कमी फॅट्स आणि जास्त तंतू (फायबर) असतात. त्यामुळे रात्री आराम करताना मदत होते. आरोग्यदायी वजनासाठी आरोग्यदायी आहाराचे नियोजन महत्वाचे आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या दैनंदिन पोषणाच्या गरजा वेगळ्या आहेत. नेहमी कामात व्यस्त असणाऱ्या नोकरदार महिलांना व्यायामाशिवाय आपले वजन कमी करायचे असते. जर आहाराचे वेळापत्रक पाळले तर चांगल्या आरोग्याचा नक्कीच फायदा घेता येईल.

सुचना : संबंधित बातमी संशोधनावर आधारीत आहे. कोणताही उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.