7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी, रेल्वेनं आणलं सर्वात स्वस्त पॅकेज, असं करा बुकिंग
भारत गौरव टूरिझम ही ट्रेन 5 जानेवारी 2025 रोजी ओडिशातील झारसुगुडा स्थानकातून निघेल आणि देशातील प्रमुख धार्मिक स्थळे आणि 7 ज्योतिर्लिंगांना भेट देईल. प्रवाशांना किफायतशीर आणि सोयीस्कर पद्धतीने तीर्थक्षेत्रांचा प्रवास करण्याचा अनुभव मिळावा हा या विशेष रेल्वेचा उद्देश आहे.
आपल्या देशात अनेक धार्मिक पर्यटन स्थळे आहेत जिथे संपूर्ण देशाच्या कान्याकोपऱ्यातून लोकं दर्शनासाठी येत असतात. एवढेच नव्हे तर भारताबाहेरील लोकं सुद्धा आपल्या धार्मिक स्थळांना भेट द्यायला येतात. त्यातच आता हिवाळी सुट्ट्या सुरु होणार आहे त्यामुळे अनेक लोकं आपल्या कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा प्लॅन करतं असतात.यातील काहीजण हे देवदर्शनासाठी जाण्याचा प्लॅन करतात. तुम्ही देखील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी जाणार असाल तर आपल्या भारतीय रेल्वेने एक छान रेल्वे टूर पॅकेज आणला. यात धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे ही भारत गौरव टूरिझम ट्रेन चालवत आहे. भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या आयआरसीटीसीने अवघ्या १२ दिवसांत देशातील ७ ज्योतिर्लिंगांना भेट देण्यासाठी परवडणारे पॅकेज प्रवाशांसाठी सादर केले आहे. ही विशेष यात्रा ५ जानेवारी ते १७ जानेवारी या कालावधीत चालणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला भारत गौरव टूरिस्ट ट्रेनमधून 7 ज्योतिर्लिंग पाहण्याची संधी मिळणार आहे.
भारत गौरव टूरिझम ही ट्रेन 5 जानेवारी 2025 रोजी ओडिशातील झारसुगुडा स्थानकातून निघेल आणि देशातील प्रमुख धार्मिक स्थळे आणि 7 ज्योतिर्लिंगांना भेट देईल. प्रवाशांना किफायतशीर आणि सोयीस्कर पद्धतीने तीर्थक्षेत्रांचा प्रवास करण्याचा अनुभव मिळावा हा या विशेष रेल्वेचा उद्देश आहे. ही गाडी बिहारशरीफमार्गे येथून जाणार आहे.
स्वस्तात ७ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याची संधी
या यात्रेअंतर्गत भाविकांना उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर येथील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारकेतील नागेश्वर ज्योतिर्लिंग व द्वारकाधीश मंदिर, सोमनाथ येथील सोमनाथ ज्योतिर्लिंग, शिर्डीचे साईबाबा मंदिर, नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येणार आहे.
बुकिंग कसे करावे
या १२ दिवसांच्या सहलीत स्लीपर क्लास बुकिंगचे भाडे केवळ २४,३३० रुपये प्रति व्यक्ती निश्चित करण्यात आले आहे. या टूर पॅकेजचे बुकिंग आयआरसीटीसीच्या irctctourism.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. याशिवाय आयआरसीटीसी टूरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसच्या माध्यमातूनही तुम्ही बुकिंग करू शकता.