सतत चिडचिड होतेय, रडू येतय, मूड नाहीये? ‘हे’पदार्थ नक्की खा, लगेचच व्हाल एकदम फ्रेश
अनेक कारणांनी आपली चिडचिड होत असते.अनेकदा विनाकारण राग येत असतो, रडायला येत असतं तेव्हा मनस्थाप होतो. पण असे काही पदार्थ आहेत जे खाल्ल्याने तुमचा राग, चिडचिड शांत होऊ शकते. तुम्ही फ्रेश फिल करू शकता.
अनेकदा कामाच्या तणावाने, धावपळीने किंवा अनेक कारणांनी आपली चिडचिड होत असते. अनेकदा विनाकारण राग येत असेल तेव्हा आपल्याला मनस्थाप नक्कीच जाणवतं. तसेच त्यामुळे काहीच खाण्याची-पिण्याची इच्छा होत नाही. कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नाही. कुठेतरी शांत जागी निघून जावसं वाटतं. म्हणजे आपला मूड खराब असतो तेव्हा या सर्व गोष्टी आपल्यासोबत घडत असतात.
पण तुम्हाला एक गंमत माहितीये का की, काही असे पदार्थ आहेत जे तुमचे मूड चेंजिग पदार्थ ठरू शकतात. जे खाल्ल्याने तुमचा मूड तर ठिक होईलच पण सोबतच तुम्हीही फ्रेश व्हाल. अगदी काही वेळातच तुम्हाला बरं वाटू लागेल. चला तर मग पाहुयात की नक्की ते कोणते पदार्थ आहेत ते.
डार्क चॉकलेट
चॉकलेट म्हणजे सर्वांसाठी एक रामबाण आहे. म्हणजे कोणाला सॉरी बोलायचं असूदेत किंवा कोणाला थँक्यू म्हणायचं असू देत. चॉकलेट हे हवंच. पण सोबतच चॉकलेटचा उपयोग हा आपला खराब मूड ठिक करण्यासाठी सुद्धा होऊ शकतो.
डार्क चॉकलेटमध्ये असलेल्या फ्लेव्होनॉइड्समुळे सेरोटोनिनची पातळी वाढून नैराश्याची लक्षणे कमी होतात. चॉकलेट हे सर्वांनाच आवडतं आणि ते सहज उपलब्धही होतं. त्यामुळे जेव्हा तुमचा मूड खराब झाला असेल, किंवा चिडचिड जाणवत असेल तर चॉकलेट नक्की खा. मूड सुधारायला मदत होईल.
केळ
होय. केळ म्हटल्यावर थोडं आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे की केळ खाल्ल्यानेही मूड बरा होण्यास मदत मिळते. केळामध्ये असलेले फायबर आणि व्हिटॅमिन बी 6 डोपामाइन आणि सेरोटोनिन सारख्या फील-गुड न्यूरोट्रांसमीटरच्या उत्पादनास मदत करतं. केळामध्ये असलेल्या फायबर्समुळे पोटही भरल्यासारखं राहतं त्यामुळे भूकेमुळे होणारी चिडचिडही कमी होते.
इडली, डोसा , दही किंवा लस्सी
आपली चिडचिड कमी करण्यासाठी इडली, डोसा , दही किंवा लस्सी हे पदार्थही फार उपयोगी असतात. कारण हे सर्व पदार्थ आंबवून तयार केलेले असतात त्यामुळे हे पदार्थ प्रोबायोटिक्सने भरलेले असतात. प्रोबायोटिक्स नैराश्यावर उपचार करण्यास मदत करू शकतात. तुमचा मूड खराब असेल तर इडली, डोसा खाल्ल्याने मूडही चांगला होईल. मूड चांगला करण्यासाठी दही खाणं किंवा लस्सी पिणं हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.
सुकामेवा
मूड चांगला करण्यासाठी सुकामेवा हा एक चांगला पर्याय आहे. कारण सुक्या मेव्यात ट्रिप्टोफेन नावाचं अमिनो ॲसिड असतं जे सेरोटोनिन वाढवण्यासाठी फायद्याचं असतं. त्यामुळे सुकामेवा खाल्ल्याने सेरोटोनिन वाढून मूड चांगला राहू शकतो. याशिवाय सुकामेव्यातून प्रोटिन्स, गुड फॅट आणि व्हिटॅमिन ई असतात त्याचे फायदेही शरीराला मिळतात.
ओट्स
ओट्स हा जसा डाएट करणाऱ्यांसाठी चांगला आहे तसाच तो मूड चांगला करण्यासाठीही मदत करतो. कधी कधी रक्तातल्या साखरेच्या चढ-उतारामुळे मूडवर परिणाम होतो. ओट्स खाल्ल्याने शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते आणि रक्तातली साखर नियंत्रित राहते. त्यामुळे मूडस्विंग्स कमी होतात.
पालक भाजी
पालक म्हटलं की बहुतेक जणांची तोंडं वाकडी होतात. पण तुम्हाला माहितीये का की पालक देखील आपला खराब मूड सुधरवण्यासाठी मदत करत. पालकाच्या पानांमध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन बी घटक असतात, जे सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे तुमचा मूड खराब असेल जर, तेव्हा तुम्ही जेवणात पालकचा उपयोग केल्यास तुमचा मूड सुधारू शकतो.
त्यामुळे जेव्हा तुमचा मूड खराब असेल किंवा त्रागा होत असेल तेव्हा यांपैकी पदार्थ खाऊन पाहा नक्की फरत जाणवेल. आणि शरिरालाही त्याचे फायदेच मिळतील.