Valentine’s 2023 : ‘रोझ डे’ च्या दिवशी लाल गुलाब देण्याचा काय असतो अर्थ ?

दरवर्षी 7 फेब्रुवारी रोजी रोझ डे साजरा केला जातो. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन प्रेम व्यक्त करण्याची संधी असते.

Valentine’s 2023 : 'रोझ डे' च्या दिवशी लाल गुलाब देण्याचा काय असतो अर्थ ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 2:48 PM

नवी दिल्ली – फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमाचे वारे वाहू लागतात. हा महिना प्रेमवीरांसाठी अगदी खास असतो, कारण या महिन्यात व्हॅलेंटाइन डे (Valentines Day) असतो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत व्हॅलेंटाईन वीक (Valentines Week) साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात रोझ डे ( Rose Day) पासून सुरू होते. दरवर्षी 7 फेब्रुवारी रोजी रोझ डे साजरा केला जातो. या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन प्रेम व्यक्त करण्याची संधी असते. या दिवशी तरुणाईमध्ये मोठी धामधूम बघायला मिळते. रोझ डे च्या दिवशी गुलाबाच्या फुलांना मोठं महत्व असतं. त्याचे कारण म्हणजे गुलाबाच्या फुलालाप्रेमाचे (Love) प्रतीक मानलं जातं. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला छानसं गुलाबाचं फूल (Rose) देऊन प्रेम व्यक्त करू शकता.

प्रत्येक गुलाबाचं काही महत्व असतं, त्यामुळे कोणत्या रंगाचे फूल द्यावे असा संभ्रम अनेकांच्या मनात असतो. कोणत्या रंगाच्या गुलाबाचा काय अर्थ असतो, असा प्रश्नही अनेकांना पडतो. पण रोझ डे च्या दिवशी जोडपी एकमेकांना लाल गुलाबच का देतात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का ? चला, जाणून घेऊया..

लाल रंग असतो प्रेमाची निशाणी

हे सुद्धा वाचा

गुलाब हा फुलांचा राजा मानला जातो. त्याचे सौंदर्य आणि मनमोहक सुगंधामुळे तो प्रेमाचे प्रतीक देखील मानला जातो. लाल रंग हा जीवनातील उत्साह, प्रेम आणि आनंदाचा रंग मानला जातो. असं म्हणतात की प्रेमाचा मार्ग सोपा नसतो आणि प्रेम करणाऱ्यांच्या मार्गात फुलं नसून काटेही असतात. कदाचित, म्हणूनच जिगर मुरादाबादी यांनी असे म्हटले आहे :

ये इश्क़ नहीं आसां इतना ही समझ लीजिए, इक आग का दरिया है और डूब के जाना है.. !

याचाच अर्थ असा की प्रेमात सुख असो किंवा दु:खं, ते सगळं एकत्र सहन करायचं असतं. आणि या नात्याचं वर्णन करण्यासाठी गुलाबाच्या फुलापेक्षा चांगलं कोणतं फूल असू शकतं. गुलाब सुंदर असतो, रंग मनमोहक असतात, सुगंध तर मन मोहून टाकणारा असतो, पण त्याला काटेही असतात. आयुष्यात फुलं आणि काटे दोन्हींचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच या रोझ डे च्या दिवशी वातावरणात प्रेमाचा सुगंध पसरवत राहा आणि आपल्या प्रियजनांना लाल गुलाब द्या.

प्रत्येक रंगाचे आहे महत्व

लाल गुलाबाव्यतिरिक्त पिवळे, पांढरे आणि गुलाबी फुलंही खूप महत्त्वाची आहेत. या दिवशी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींना या रंगांची फुले भेट देऊ शकता. त्यांचा अर्थ काय हे समजून घेऊया.

पांढरा गुलाब : जर तुमचे तुमच्या जवळच्या व्यक्तीशी भांडण झाले असेल ते मिटवण्यासाठी तुम्ही पांढरं गुलाबाचे फूल देऊ शकता. पांढरा रंग शांततेचे प्रतीक मानला जातो.

पिवळा गुलाब : पिवळा गुलाब हे मैत्रीचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला कोणाशी मैत्री करायची असेल तर त्याला एक पिवळा गुलाब भेट द्या.

गुलाबी रंगाचा गुलाब : गुलाबी रंगाचा गुलाब हा सेलिब्रेशनसाठी दिला जातो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोझ डेच्या दिवशी तुमच्या पालकांना हे गुलाबी फूल देऊन तुम्ही तुमच्या पालकांचे आभारही मानू शकता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.