Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांनी चांदीची नथ का घालू नये ? काय आहे यामागे कारण ? पाहूयात

Nose Ring : हिंदू धर्मशास्रात दागिन्यांना देखील धार्मिक महत्व दिलेले आहे. ज्योतीष शास्रानुसार कोणत्या धातूचे दागिने कुठे घालावेत कुठे घालू नयेत याची माहिती दिलेली आहे. त्यात चांदीचा दागिना नाकात घालण्यास सक्त मनाई केलेली आहे. का ते पाहूयात....

महिलांनी चांदीची नथ का घालू नये ? काय आहे यामागे कारण ? पाहूयात
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 3:49 PM

हिंदू धर्मात दागिन्यांचे महत्व केवळ नटणे किंवा शृगांरापुरते महत्व नाही, तर याला धार्मिक आणि आरोग्यविषयक देखील महत्व असते. ज्योतिष शास्रानुसार प्रत्येक दागिन्यांचा संबंध विशेष ग्रहांशी देखील जोडलेला आहे. त्याचा संबंधित व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक किंवा सकारात्मक प्रभाव पडत असतो. पुरुष किंवा महिला सहसा आपल्या दागिन्यांची निवड धातू, रत्न आणि रंग पाहून करीत असतात. परंतू दागिन्यांचा प्रभाव आपल्या आरोग्य आणि आयुष्यावर काय होतो हे अनेकांना माहिती नसते.

महिलांना सोने आणि चांदीचे दागिने पसंत

महिलांच्या शृगांरासाठी सोने आणि चांदीचे बनविलेले दागिन्यांचे खास महत्व असते. कान, बोटे, हात, गळ्यासाठी सोने आणि चांदीचे दागिन्यांचा वापर सर्वसामान्यपणे केला जात असतो. परंतू तुम्ही हे माहिती आहे का ? नाकात नोज रिंग म्हणून चांदी धातूचा वापर करणे वर्जित आहे? या मागे काय आहे कारण ? या प्रश्नाचे उत्तर भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत दिले आहे.

ज्योतिषी शास्राच्या मान्यतेनुसार शरीराच्या वरच्या भागात सोन्याचे दागिने घालणे योग्य आहे. तर शरीराच्या खालच्या भागासाठी चांदीच्या दागिने घालणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार शरीराचा वरील भाग हा देवाचा अंश मानला जातो. आणि सोन्याला शुभ मानले जाते.सोन्यावर सुर्य आणि गुरु ग्रहाचे शासन असते.यास दिव्य आणि शक्तीने परिपूर्ण मानले जाते.

हे सुद्धा वाचा

सोन्याचा देवी आणि देवतांशी संबंध

सोन्याला देवी-देवतांशी संबंध जोडून पाहीले जाते. सोन्याचा सुर्याशी देखील संबंध जोडला जातो. सुर्य आत्मविश्वास,ऊर्जा आणि नेतृत्वाचे प्रतिक मानला जातो.जेव्हा आपण शरीराच्या वरच्या भागात सोन्याचे दागिने परिधान करता तेव्हा त्याचा सकारात्मक प्रभाव वाढत असतो. त्यामुळे जीवनात आत्मविश्वास आणि ऊर्जेचा संचार होत असतो.

चांदीचे दागिने आणि चंद्राशी संबंध

चांदीच्या दागिन्यांना ज्योतिषशास्रात शीतलतेचे प्रतिक मानले गेले आहे. चांदीला चंद्राचे घर मानले जाते. यावर चंद्राचे शासन असते अशी मान्यता आहे. त्यामुळे जर आपण चांदीची नथ परिधान केली तर तो शुक्र ग्रहावर नकारात्मक प्रभाव होऊ शकतो. त्यामुळे जीवनात अस्थिरता येऊ शकते.त्यामुळे ज्योतिष शास्रानुसार नाकात चांदीचा दागिना घालू नये असा सल्ला देण्यात येतो.

'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत
'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत.
तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी
तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी.
धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?
धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?.
राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले..
राज ठाकरे-उदय सामंतांच्या भेटीने भुवया उंचावल्या, मनसे नेते म्हणाले...
पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, 5 ठार
पुलाचं काम करून थकलेल्या मजुरांवर झोपेतच काळाचा घाला, 5 ठार.
सुरेश धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबियंची भेट घेतल्यानंतर म्हणाले...
सुरेश धस मस्साजोगमध्ये, देशमुख कुटुंबियंची भेट घेतल्यानंतर म्हणाले....
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे UNCUT भाषण.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले "मी बोलण्याचा
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठी भाषेचे कौतुक, म्हणाले
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार
'ऑपरेशन टायगर'चा सपाटा, शिंदेंच्या शिलेदाराकडून ठाकरे गटाला मोठ खिंडार.
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'
'मेरी कुर्सी छिनी गई', मुनगंटीवार म्हणाले, 'पंतप्रधानांची खुर्ची मी..'.