नाश्त्यात हे पदार्थ घेऊच नका; धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने काय सांगितला धोका?
सकाळी नाश्त्यात काय खाल्लं पाहिजे असा विचार तुम्ही करत असाल. व्हाइट ब्रेडच्या जागी नॉर्मल ज्वारी, रागी, पराठा बनवून तुम्ही खाऊ शकता. त्याशिवाय ब्रेकफास्टमध्ये तुम्ही फ्रेश आणि कापलेली फळे खाऊ शकता. भाज्यांचे सलाड खाऊ शकता. हेल्दी नट्स आणि सीड्स खाऊ शकता. साखरेच्या जागी मध आणि नैसर्गिक स्वीटनरही घेऊ शकता... त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं.
आपण रोज सकाळी नाश्ता करतो. त्यामुळे आपल्याला त्या दिवशी किकस्टार्ट मिळतो. जर सकाळी आरोग्याला फायदा देणाऱ्या गोष्टींचं सेवन केलं नाही तर आरोग्य बिघडू शकतं. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. खराब आणि चुकीचा नाश्ता केला तर वजन वाढणे, पोट सुटणे आणि हृदयाशी संबंधित आजाराला आमंत्रण देतो. त्यामुळे नाश्त्यात कोणत्या गोष्टी असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात याचा नेहमी सल्ला दिला जातो. धकधक गर्ल आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे पतीन डॉ. श्रीराम नेने यांनीही अशाच काही फुडूसचा उल्लेख केला आहे. त्यांच्या मते हे पदार्थ नाश्त्यात असतील तर आरोग्याला धोका होऊ शकतो. डॉ. नेने त्यांच्या इन्स्टावर नेहमी सक्रिय असतात आणि त्यावर ते आरोग्य विषयक सल्ला नेहमी शेअर करत असतात. आताही त्यांनी नाश्त्यात कोणते पदार्थ नकोत याचा सल्ला दिला आहे.
नाश्त्यात कोणते पदार्थ टाळाल.. डॉ. श्रीराम नेनेंचा सल्ला काय?
व्हाइट ब्रेड
व्हाईट ब्रेडमध्ये प्रोसेस्ड व्हाईट फ्लार असतो. नाश्त्यात हे ब्रेड घेतल्यास तुम्ही अनहेल्दी बनू शकता. नाश्त्यात गरजेपेक्षा जास्त व्हाईट ब्रेड खाल्ल्यास वजन वाढण, पोटदुखी, हृदयाशी संबंधित विकार आणि मधुमेहासारखे आजार होतात. त्याशिवाय अनेक प्रकारच्या ब्रेडमध्ये एडेड शुगर असते. त्यामुळे आरोग्याचं नुकसानच होतं.
शुगरी सीरियल्स
शुगरी सीरियल्सचं ग्लाइसेमिक इंडेक्स अधिक असतो. त्यात कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं. हे स्वीट सीरिअल्स सकाळी खाल्ल्यास हाय ब्लड लिपिड लेव्हल्स आणि हृदयाच्या समस्या वाढू शकतात.
फ्रूट जूस
जर सकाळी रिकाम्यापोटी फ्रुट ज्यूस प्यायल्यास त्यामुळे शुगर स्पाइक, डेंटल प्रॉब्लेम्स आणि पाचनाशी संबंधित समस्या वाढतात. ताज्या फळांमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. डायबिटिज कंट्रोल करण्यासाठी त्याची मदत होते. पण फळांच्या ज्यूसमध्ये फायबरचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल्स वाढू शकते.
प्रोसेस्ड मीट
नाश्त्यात प्रोसेस्ड मीट खाणं हे खराब लाइफस्टाईलची सवय मानल्या जाते. प्रोसेस्ड मीट खालल्याने उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार आणि पोटाशी संबंधित विकार वाढण्याचा धोका असतो.
स्वीटेंड योगर्ट
स्वीटेंड शुगरचे लाभ असतात म्हणून खाण्यापिण्यात त्याचा समावेश केला जातो. पण सकाळी रिकाम्यापोटी स्वीटेंड योगर्ट खाऊ नये. स्वीटेंड योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स आणि चांगले कॅल्शियम असतात. पण रिकाम्या पोटी खाल्ल्याने चांगले बॅक्टेरिया पोटातील अॅसिडमुळे नष्ट होतात. त्यामुळे स्वीटेंड शुगर सकाळी नाश्त्यात घेणं टाळावं.