Skin Care Tips | नृत्य आणि अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या नोरा फतेहीच्या चमकदार त्वचेच ‘रहस्य’!
आपल्या नृत्याने आणि दिलखेचक अदांनी रसिक प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही तिच्या लुक्स आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.
मुंबई : आपल्या नृत्याने आणि दिलखेचक अदांनी रसिक प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री नोरा फतेही तिच्या लुक्स आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. पण स्टेजवर आल्यानंतर नोरा इतकी चर्चेत कशी असते, हे तुमच्या लक्षात आले आहे का?( Actress Nora Fatehi’s glowing skin secret)
नोरा केवळ तिच्या डान्स स्टेप्समुळे नव्हे तर, चमकदार त्वचा आणि सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. ती आपल्या त्वचेची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडत नाही. ज्यामुळे ती खूपच सुंदर दिसते. चला तर, ‘गर्मी गर्ल’ नोराच्या या किलर स्टाईल बरोबरच, तिने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केलेल्या चमकदार त्वचेच्या रहस्यही जानुन्न घेऊया…
मेकअप रूममध्ये अशाप्रकारे तयार होते नोरा
नोराने स्वतः आपल्या चमकदार त्वचेचे आणि सौंदर्याचे रहस्य शेअर केले आहे. एका मुलाखती दरम्यान नोरा म्हणते की, भारतातील हवामान आणि आर्द्रता लक्षात घेऊन ती वेळोवेळी आपल्या मेकअप किटमध्ये बदल करत राहते.
मेकअप दरम्यान ती त्वचेचा टोन अधिक मोहक करण्यासाठी लाईट आणि डार्क टोनचे दोन मॉइश्चरायझर्स मिसळून एक वेगळा टोन तयार करते. जेणेकरून तिची त्वचा नैसर्गिकरित्या अधिक सुंदर दिसेल.
बराच काळ ‘फ्रेश’ दिसण्यासाठी
नोरा म्हणतात की, भारताचे हवामान खूप गरम आहे आणि इथले हवामान बहुतेक वेळेस दमट असते. तर आपल्या त्वचेला सदैव फ्रेश आणि सपल रूप देण्यासाठी, ती दिवसभरात कित्येक वेळा स्वतःच्या स्कीन टोनला पूरक असलेली फेस पावडर लावते.
या फेस पावडरला वेळोवेळी त्वचेवर लावल्याने चेहर्यावर जास्त तेल दिसत नाही आणि आपली त्वचा अधिक ताजी दिसू शकते. नोरा सांगते की, चेहऱ्यावर वारंवार पावडर लावत राहिल्याने त्वचेवरील तेल मेकअप खराब करत नाही. तसेच आपला चेहरा बराच काळ चमकत राहतो.
त्वचा इतकी सुंदर कशी आहे?
जेव्हा नोराला तिच्या सुंदर, निरोगी आणि चमकदार त्वचेचे रहस्य विचारले गेले, तेव्हा ती एकही क्षण न गमावता म्हणाली, नृत्य! नोरा तिच्या नृत्यास फिटनेस, चमकदार त्वचा आणि त्वचेच्या आरोग्याचे श्रेय देते (Actress Nora Fatehi’s glowing skin secret).
आपल्या किलर डान्स मूव्हजने स्टेजला आग लावणारी नोरा म्हणते, बर्याचदा मला मनापासून नाचण्यासाठीचा वेळ मिळत नाही. पण इतकी व्यस्त झाल्यानंतरही ती दररोज नृत्यासाठी काही वेळ देते, ज्यामुळे ती तंदुरुस्त आणि तिची त्वचा चमकदार राहते.
नृत्याचा आरोग्य आणि त्वचेशी संबंध
नृत्याचा आरोग्याशी काय संबंध हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात येतो, याचे उत्तर म्हणजे नृत्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. कारण डान्सच्या वेळी बऱ्याच कॅलरी बर्न होतात. परंतु, नृत्याचा चमकदार त्वचेशी काय संबंध?, असाही प्रश्न आहेच.
तर उत्तर असे आहे की, डान्स केल्याने आपल्या त्वचेला जास्त घाम फुटतो. या घामामुळे, आपल्या त्वचेची चरबी कमी होते आणि आपल्या त्वचेमध्ये साठवलेले विष देखील बाहेर पडतात. आपल्या त्वचेची रोम छिद्र साफ केली जातात आणि त्वचेवरील मृत पेशी देखील सहजपणे काढून टाकल्या जातात. या सर्व कारणांमुळे आपली त्वचा चमकू लागते.
सुंदर दिसण्यासाठी ‘या’ पद्धतीचे अनुसरण करा
जर तुम्हाला कमी वेळात सुंदर आणि तंदुरुस्त व्हायचे असेल, तर नृत्यापेक्षा चांगला व्यायाम दुसरा कोणताच नाही. कारण नाचण्यामुळे तुमचे शरीर केवळ फिट होत नाही, तर मनाचे आरोग्यही सुधारते. तुम्ही पूर्वीपेक्षा आनंदी राहता.
नृत्य केल्याने रक्त परिसंचरण योग्य राहते, आपण पूर्वीपेक्षा अधिक सक्रिय राहता. या सर्वांचा आपल्या त्वचेच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो आणि आपण पूर्वीपेक्षा सुंदर दिसू लागता.
(Actress Nora Fatehi’s glowing skin secret)
हेही वाचा :
beauty tips | फक्त ‘या’ 6 गोष्टी करा आणि मिळवा तजेलदार चेहराhttps://t.co/6Sm47ZBB8x#beauty #beautytips #tips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020