अभिनेत्री झरीन खानला डेंग्यूचा विळखा, रुग्णालयात झाली दाखल,जाणून घ्या डेंग्यूपासून बचावाचे उपाय

अभिनेत्री झरीन खान हिची तब्येत बिघडली होती. तिला डेंग्यूची लागण झाली होती व ती रुग्णालयात दाखल होती. सध्या सर्वत्र डेंग्यूची साथ पसरली असून या आजारापासून बचावासाठीचे उपाय जाणून घ्या.

अभिनेत्री झरीन खानला डेंग्यूचा विळखा, रुग्णालयात झाली दाखल,जाणून घ्या डेंग्यूपासून बचावाचे उपाय
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 5:39 PM

मुंबई | 16 ऑगस्ट 2023 : अभिनेता सलमान खानसोबत चित्रपटात झळकलेली अभिनेत्री झरीन खान (zareen khan) बऱ्याच दिवसांपासून चित्रपटात दिसली नाही. मात्र सध्या चित्रपटांमुळे नव्हे ती वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. तिला नुकताच डेंग्यू (dengue) झाला होता, ज्यामुळे तिच्या शरीरात अतिशय वेदना होत होत्या आणि तापही आला होता. या आजारामुळे झरीन हिला रुग्णालयातही (in hospital) दाखल करण्यात आले होते. तिने सोशल मीडियाद्वारे ही माहिती देत हेल्थ अपडेट शेअर केले होते. आता तिची तब्येत पूर्वीपेक्षा बरी असून ती रिकव्हर होत आहे.

इन्स्टाग्रामवरून दिली माहिती

हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर झरीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आजाराची माहिती तर दिलीच, शिवाय चाहत्यांना डेंग्यूपासून बचाव करण्याचा सल्लाही दिला. वास्तविक, झरीनने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली, ज्यामध्ये तिच्या हातात ड्रिप लावलेले दिसत होते. मात्र थोड्या वेळाने तिने स्टोरी डिलीट केली आणि दुसरी पोस्ट टाकली, त्यामध्ये तिच्या हातात ज्यूसचा ग्लास दिसत आहे. “रिकव्हरी मोड” असेही तिने कॅप्शनमध्ये लिहिले.

चाहत्यांना दिला काळजी घेण्याचा सल्ला

झरीन सध्या रुग्णालयात असून तेथे दाखल झाल्यानंतर तिने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आणि डेंग्यूपासून दूर राहण्यास सांगितले. डेंग्यूच्या केसेस सध्या वाढत असून, अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि डासांना घरात येऊ देऊ नका, असा सल्ला तिने तिच्या चाहत्यांना दिला. एवढेच नाही तर डासांपासून दूर राहण्यासाठी फुल स्लीव्ह्ज किंवा पूर्ण बाह्यांचेच कपडे घाला, झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, अशी सूचनाही तिने चाहत्यांना दिली आहे. मुंबईत सध्या डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

डेंग्यूपासून बचावासाठी उपाय

डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी, या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काय काळजी घ्यावी ते वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले आहे. डेंग्यू होऊ नये असे वाटत असेल तर सर्वप्रथम डासांपासून स्वत:चा बचाव केला पाहिजे. त्यासाठी पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत, तसेच कूलर, टाक्या, घराचा आजूबाजूचा परिस, झाडं यांमध्ये पाणी साचू देऊ नका. बाहेर जाचाना शरीरावर तेल किंवा मॉस्किटो रिपेलंट लावावे. तसेच घरा-दाराच्या खिडक्या नीट लावाव्यात, रात्री झोपताना मच्छरदाणीचा अवश्य वापर करावा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फळे, भाज्या, पौष्टिक आहार घ्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.