Work From Home | पगार झालाय कमी, वजनही वाढलंय, ‘वर्क फ्रॉम होम’चे मोठे दुष्परिणाम!

मजेशीर गोष्ट म्हणजे आता लोकांना ‘वर्क फ्रॉम होम’ इतके आवडू लागले आहे की त्यांना पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन काम करायचे नाही.

Work From Home | पगार झालाय कमी, वजनही वाढलंय, ‘वर्क फ्रॉम होम’चे मोठे दुष्परिणाम!
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 12:52 PM

मुंबई : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना घरून काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला ‘वर्क फ्रॉम होम’ ही नवीन संस्कृती स्वीकारणे प्रत्येकासाठी कठीण होते. कंपनी आणि कर्मचारी या दोघांनाही बर्‍याच समस्यांमधून जावे लागले. परंतु, लॉकडाऊनच्या दीर्घ कालावधीमुळे हळूहळू सगळ्यांनाच याची सवय झाली. यातही मजेशीर गोष्ट म्हणजे आता लोकांना ‘वर्क फ्रॉम होम’ इतके आवडू लागले आहे की त्यांना पुन्हा ऑफिसमध्ये जाऊन काम करायचे नाही. यासाठी ते पगारामध्ये तडजोड करण्यासही तयार आहेत. परंतु, वर्क फ्रॉम होममुळे पगार तर कमी झालाय, पण वजन वाढल्यामुळे आरोग्याची समस्यादेखील वाढले आहे (Advantages And Disadvantages of Work From Home).

वर्क फ्रॉम होमचे फायदे-तोटे

पैसे वाचले..

2020च्या जून आणि जुलै महिन्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतातील सुमारे 1000 लोकांची वर्क फ्रॉम होममुळे प्रत्येक महिन्यात किमान तीन हजार ते पाच हजारांची बचत झाली आहे. तसेच ऑफिसला जाणे, बाहेरचे खाणे, मद्यपान, कपडे इत्यादींचा खर्च देखील वाचला आहे. याच कारणाने, आता सुमारे 74 टक्के लोक घरून काम करण्यास प्राधान्य देत आहेत.

कंपनीची कार्यक्षमता वाढण्याची शक्यता

या सर्वेक्षणातून, घरातून काम केल्याचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांना झाला नाही तर, कंपनीची कार्यक्षमता वाढण्याच्या शक्यतादेखील व्यक्त केली आहे. दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये वर्क फ्रॉम होम केल्याने कर्मचार्‍यांच्या प्रवासादरम्यान आणि मिटिंगसाठी लागणारा वेळ वाचला आहे. आता हा वेळ ते कंपनीची कोणतीही इतर योजना सुधारण्यासाठी वापरु शकतात. यामुळे कंपनीसोबतच कर्मचार्‍यांची कार्यक्षमताही वाढली आहे (Advantages And Disadvantages of Work From Home).

ट्रॅफिक कमी

बरेच लोक घरातूनच काम करत असल्याने सकाळपासूनच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे. जर हे पुढेही असेच चालू राहिले, तर रस्त्यांवरील रहदारी कमी झाल्याने प्रदूषण पातळीत घट देखील होऊ शकते.

‘वर्क फ्रॉम होम’चे मोठे तोटे

वर्क फ्रॉम होममुळे, लोक इतके रिलॅक्स झाले आहेत की, आता त्यांच्या खुर्चीची जागा पलंग आणि अंथरुणाने घेतली आहे. लॅपटॉपवर चुकीच्या स्थितीत काम केल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. यावेळी, सांधेदुखीच्या वेदना, मणक्याच्या समस्या, पाठदुखी, खांदा दुखणे यासारख्या समस्या लोकांमध्ये निर्माण आहेत. संगणक आणि मोबाईलच्या पडद्यावर सतत काम केल्यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळ्यांतून पाणी आणि कमी झोप यासारख्या समस्या वाढल्या आहेत. तसेच सतत बसून काम केल्याने वजन देखील वाढले आहे.

(Advantages And Disadvantages of Work From Home)

हेही वाचा :

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.