प्रवाशांना वाटतं महागड्या तिकीटात फ्री… एअर होस्टेसची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी

एअर होस्टेसच्या आयुष्यातील वास्तव, त्यांच्यावर होणारे मानसिक आणि शारीरिक छळ, आणि काम-आयुष्यातील असंतुलन या गोष्टी वारंवार समोर आल्या आहेत. उच्च अपेक्षा, प्रवाशांचं गैरवर्तन आणि आरोग्यावर होणारा परिणाम यांचा समावेश असलेल्या त्यांच्या आव्हानांचा धांडोळा घेण्यात आला आहे. सोशल मीडियावरून आलेल्या अनेक एअर होस्टेसच्या अनुभवांवर आधारित या गोष्टी आहेत.

प्रवाशांना वाटतं महागड्या तिकीटात फ्री... एअर होस्टेसची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 2:15 PM

स्कीन चमकदार असली पाहिजे… दात सरळच हवेत… जेवण वाढताना किंवा सेफ्टी रुल्स सांगताना हात सुंदर वाटले पाहिजे. वजन करताना 16 द्राक्षानंतर 17 वा द्राक्ष बसता कामा नये. म्हणजे थोडक्यात वजन मेंटेनच राहिलं पाहिजे. कधी कधी तर आम्हाला टेप घेऊन स्वत:चं मोजमाप करावं लागतं. थोडं फार पोट सुटणं किंवा चेहरा थोडा जरी सूजल्यासारखा दिसला तरी आम्हाला फ्लाइटमध्ये चढू दिलं जात नाही. एअर होस्टेस व्हायचं म्हणजे खाली मोठी दरी असलेल्या एखाद्या दोरीवरून रोज चालण्यासारखं आहे. म्हणजे एका श्वासात सर्व खतम.

पूर्वी विमानात पुरुष अटेंडेंट असायचे. होमोसेक्सुअल सर्वाधिक असायचे. विमानातून प्रवास करणाऱ्या श्रीमंत प्रवाशांना खूश करण्याचं काम ते करायचे. तीसच्या दशकात विमानात महिला अटेंडेंटचा प्रवेश झाला. आणि नंतर महिलांची संख्या वाढत गेली.

80 टक्के महिला अटेंडेंट

हे सुद्धा वाचा

इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या सांगण्यानुसार, आज संपूर्ण जगात 80 टक्के फ्लाइट अटेंडेंट महिला आहेत. त्याही 18 ते 24 वयोगटातील. काम काहीच नाही. फक्त तंग कपडे घालून चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचं. आणि तयार अन्नपदार्थांचा ट्रे सर्व्हे करणे. सोबत जगातील कानाकोपऱ्यात मोफत प्रवास. बदल्यात भरपूर पैसा.

पण खरोखरच एअर होस्टेसचं आयुष्य एवढ्यावरच सिमीत असतं. एवढं आनंदी आयुष्य असतं? त्यांच्याही काही वेदना नाहीत का? सोशल मीडियावर नेहमीच एअर अटेंडेंट्स आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असतात. त्यातही विदेशी अटेंडेंट आपली ओळख लपवून वेदना मांडतात. त्या मांडत असताना मोठमोठे गौप्यस्फोटही होतात. तऱ्हेवाईक प्रवाशांचे आलेले अनुभवही त्या शेअर करत असतात.

चपाती, भाकरी सोडून दिल्या

एका हेयर होस्टेसने तिचा अनुभव मांडला. एकदा मी प्रचंड ऑब्सेस्ड झाली होती. मी चपाती-भाकरी खायचं सोडून दिलं. त्याऐवजी व्हिटॅमिन ए घेऊ लागले. सफरचंदापासून गाजरापर्यंत मी सर्व काही खात होते. कारण त्वचा चमकली पाहिजे म्हणून. औषधे घेत होते. दीर्घकाळ औषधे घेतल्याने मला ऑटोइम्यून हिपेटायटिस झाला. अवस्था एवढी वाईट झाली की मला रुग्णालयात दाखल करावं लागलं. डॉक्टरनेही मला सख्त ताकीद दिली. त्यामुळे मला करिअर सोडावं लागलं.

आम्ही बाहुल्याच आहोत असं वाटतं…

काही प्रवाशांना वाटतं आम्ही महागडं तिकीट खरेदी केलंय. म्हणजे एअर होस्टेस या बाहुल्याच झाल्या. आम्ही सांगू तसं त्यांनी नाचलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. काही प्रवाशांना त्यांच्या आवडीचं सीट मिळालं नाही तर त्यांना राग येतो, राग निघतो आमच्यावर. काही प्रवाशांना अल्कोहल नाही मिळालं तरीही ते रागावतात. राग निघतो आमच्यावरच, असं एक एअर होस्टेस म्हणाली.

स्पर्श करता यावा म्हणून…

फिजिकल अब्यूज तर ही सामान्य गोष्ट झालीय. माझ्या एका कलिगचा किस्सा आहे. फ्लाइट लँड करताना लोक उठायला लागले होते. धक्काबुक्की होऊ लागली त्यामुळे तिने सर्वांना बसण्याची सूचना केली. पण फ्लायरना राग आला. एकाने तर घाणेरडी कमेंट करून माझ्या कलिगला टच केलं. ती ज्युनिअर होती. जवळपास 19 वर्षाची. सर्व काही इतकं वेगाने घडलं की ती रिअॅक्टही करू शकली नाही. केवळ तिच्याबाबत हे घडलं नाही. तर इतरांच्याबाबतही असंच घडतंय, असंही तिने सांगितलं. काही लोक तर अनेकदा कोपऱ्यावर सीट घेतात. येता जाता आम्हाला स्पर्श करता यावा म्हणून ते हे करत असतात. अन्न पदार्थाच्या ट्रॉली आम्ही घेऊन येतो तेव्हा अनेक नजरा आमच्याकडेच टिकलेल्या असतात असं दुसरीने सांगितलं.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.