दारुचा एक पेग खरंच थंडीत उबदार करतो का? की फक्त एक भ्रामक कल्पना, जाणून घ्या
हिवाळा आला की दारू पिण्याकडे अनेकांचा कल असतो. अनेकदा थंडीत दारू प्यायल्याने उबदारपणा मिळतो असा समज आहे. पण खरंच असं होत का? असे एक ना अनेक प्रश्न पडतात. दारूमुळे हृदयाची गती वाढते, पण उबदारपणाचं कारण खरं आहे की नाही ते जाणून घेऊयात.
कडक्याची थंडी पडली की दारू पिणाऱ्यांना रम किंवा व्हिस्कीची आठवण येते. खासकरून दारू प्यायल्याने उबदारपणा जाणवतो असा समज आहे. त्यामुळे थंडीच्या नावावर मोठ्या प्रमाणावर रम रिचवली जाते. काही जणांना एक दोन पेग घेतल्याने शरीरातील थंडी दूर होते असा समज आहे. पण खरंच असं होतं का? हा देखील अनेकांना प्रश्न आहे. नाहीतर नुसतंच थंडीच्या नावाखाली दारू प्यायचा एक बहाणा ठरतो. सर्वप्रथम दारू प्यायल्याने शरीराला उबदारपणा मिळतो का? हे जाणून घेणं आवश्यक आहे. जगभरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी याबाबत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. दारू शरीराला उबदारपणा देते हे एक भ्रामक कल्पना आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. अल्कोहोलमध्ये शरीराचं तापमान वाढवणारे घटक असतात. पण तुमच्या शरीरावर नाही तर तुमच्या विचारांवर अधिक असतो. त्यामुळे उबदार होणं आणि ते जाणवणं यात फरक आहे.
अल्कोहोलमुळे त्वचेजवळच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. यातून मोठ्या प्रमाणात रक्त प्रवाह होतो. त्यामुळे त्वचेवर एक उबदारपणा जाणवतो. पण हा उबदारपणा जाणवतो. पण खऱ्या अर्थाने हा उबदारपणा नसतो. तज्ज्ञांच्या मते, शरीराचे तापमान तुमच्या महत्त्वाच्या अवयवयांपासून दूर गेलं की, शरीराचं तापमान कमी होऊ शकतं. इतकंच काय तर त्यावरील नियंत्रण सुटलं की हायपोथर्मियाही होऊ शकतो. खासकरून असं अति थंडीत होऊ शकतं. अल्कोहोलचा परिणाम हृदय आणि मनावर होऊ शकतो.
दारूमुळे मिळणारी ऊब ही तात्पुरत्या स्वरूपाची असते असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. अगदी तसंच जेव्हा तुम्ही हिवाळ्यात उन्हात बसून ऊब घेता तसंच.. उन्हात असेपर्यंत ऊब मिळते. पण त्यानंतर पुन्हा एकदा थंडा जाणवते. त्यामुळे दारूच्या पेगऐवजी उबदार कपडे आणि गरम पेय प्यायल्याने चांगली ऊब मिळेल.
दारू प्यायल्याने तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो. कधी कधी शुद्ध हरपल्याने आपण काय करतो तेच कळत नाही. अनेकदा चुकीच्या गोष्टी आपल्या हातून नकळत घडून जातात. त्यामुळे दारू हा थंडीवरचा उपाय असू शकत नाही. उलट त्यामुळे शारीरिक व्याधींना आमंत्रण दिल्यासारखंच आहे.