Health Care | आलिया भट्टने वर्ज्य केले कॉफीचे सेवन, वाचा या मागचे मोठे कारण
आलिया भट्टने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, ती आपला दिवस चहा किंवा कॉफीने सुरू करत नाही. यापूर्वी तिला चहा-कॉफीची प्रचंड सवय होती.
मुंबई : आलिया भट्टने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, ती आपला दिवस चहा किंवा कॉफीने सुरू करत नाही. यापूर्वी तिला चहा-कॉफीची प्रचंड सवय होती. पण, आता तिने तिची ही सवय बदलली आहे. अशा परिस्थितीत बॉलिवूडच्या या आघाडीच्या अभिनेत्रीने असे का केले? याचे कारण आलियाच्या चाहत्यांना माहित असलेच पाहिजे…(Alia Bhatt avoids coffee and tea for healthy skin)
विशेषत: आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्याबद्दल खूपच काळजी असणाऱ्या लोकांसाठी ही गोष्ट अधिकच गरजेचे आहे. आलिया कॉफी आणि चहा खूपच कमी वेळा पिते, याचे कारण त्वचेच्या सौंदर्याशी संबंधित आहे. चला तर, जाणून घ्या सविस्तर कारण…
कधीकधीच घ्यावे ‘हे’ पेय
आलिया त्वचेच्या काळजीशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना म्हणाली की, ती आता दिवसाच्या सुरूवातीस चहा किंवा कॉफी घेत नाही. कारण, असे करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. तसेच आलिया म्हणाली की, ती आता ही दोन्ही पेये फक्त तेव्हाच घेते, जेव्हा ती अत्यंत महत्वाची असते किंवा कधीकधी तिचा मूड असतो तेव्हाच ती सेवन करते.
वास्तविक, आलियाच्या या कृती मागचे मोठे कारण म्हणजे, चहा आणि कॉफीमध्ये उपस्थित असलेल्या कॅफिनमुळे आपल्या त्वचेचे नुकसान होते. चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य आपल्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पाडतात, तसेच ते आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक कमी करण्याचे काम देखील करतात.
मुरुमांची समस्या वाढू शकते
जेव्हा आपण कॉफी पितो तेव्हा, त्यातील कॅफिन मुरुमांच्या समस्येस थेट जबाबदार नसतात. परंतु जर एखाद्यास मुरुमेची समस्या असेल तर, कॅफिन ही समस्या वाढवण्याचे कार्य करू शकते. हे खरे आहे की कॉफी प्यायल्याने आपल्याला त्वरित उर्जा मिळते आणि तणाव देखील कमी होतो (Alia Bhatt avoids coffee and tea for healthy skin).
पण, जेव्हा तुम्ही अधिक प्रमाणात कॉफीचे सेवन करता किंवा नियमितपणे जास्त कॉफी पित असाल, तर हे तुमच्या शरीरात कॉर्टिसॉलसारख्या स्ट्रेस हार्मोनच्या वाढीचे कारण बनते. यामुळे केवळ आपला ताणच वाढत नाही, तर त्वचेची समस्याही वाढते.
‘या’ ग्रंथी अधिक सक्रिय होतात
कॅफिन शरीरात जास्त प्रमाणात गेल्यास कॅफिन संप्रेरक वाढवते आणि जेव्हा शरीरात कोर्टीसोल संप्रेरक जास्त असतो, तेव्हा त्वचेतील तेल तयार करणार्या ग्रंथी अधिक सक्रिय होतात. यामुळे सेबम अर्थात त्वचेचे नैसर्गिक तेल वाढते. ज्यामुळे त्वचेवरील मुरुम आणि पिटकुळ्यांची समस्या वाढते.
यामुळे, आपली त्वचा फिकट, डल आणि डागदार होऊ शकते. म्हणून कॉफी आणि चहाचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. मग, आलिया तर शो-बिझच्या जगाताशी संबंधित आहे. ती तिच्या त्वचेबद्दल निष्काळजी, असू शकत नाहीत.
जर आपल्याला दररोज कॉफी पिण्याची इच्छा होत असेल तर…
आलियासारखी सुंदर त्वचा आपल्याला हवी असेल आणि दररोज कॉफीचा स्वाद घ्यायचा असेल तर कॉफीचे सेवन कमी प्रमाणात करा, हे लक्षात ठेवा. म्हणजेच, तुम्ही एकाच वेळी पीत असलेल्या कॉफीचे प्रमाण कमी करा. तसेच, आपण दिवसभरात पीत असलेले पाणी आणि द्रव पदार्थाचे प्रमाण वाढवा. असे केल्याने आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिक आर्द्रता टिकून राहील आणि विषद्रव्य जमा होणार नाही.
याव्यतिरिक्त, आपण वेळोवेळी आपली त्वचा व्यवस्थित स्वच्छ करा. दररोज दोनदा त्वचेची निगा राखण्याचे नियम पाळा. सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी आपल्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावा.
(Alia Bhatt avoids coffee and tea for healthy skin)
हेही वाचा :
Coffee Side Effect | सकाळी-सकाळी ‘कॉफी’ पिण्याची सवय? मग ‘हे’ वाचाच…#CoffeeSideEffect | #coffee | #healthylifestyle https://t.co/irNowsk312
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 4, 2021