रात्री झोपण्यापुर्वी कोरफड जेलमध्ये ‘या’ 5 गोष्टी मिक्स करा, 15 दिवसात चमकदार दिसेल चेहरा
अस्वस्थ जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे, त्वचेवर सुरकूत्या येऊ शकतात किंवा त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. फक्त दिवसाच नाही तर रात्री झोपण्यापूर्वीही त्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला घरगुती उपायांनी तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल, तर कोरफडीत काही गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि फरक पहा.

साधारणपणे प्रत्येकालाच आपली त्वचा दीर्घकाळ चमकदार राहावी आणि तरुण दिसावी असे वाटत असते. यासाठी काही लोकं अनेक कॅमिकल प्रॉडक्टचा वापर त्वचेवर करत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही कोणत्याही कॅमिकल प्रॉडक्टशिवाय सुंदर, चमकदार आणि मऊ त्वचा मिळवू शकता. आजकाल त्वचेची काळजी घेणे सामान्य झाले आहे, परंतु घरगुती उपाय करून पाहण्याची पद्धत पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आली आहे. ज्यात सर्वाधिक प्रमाणात कोरफडीच्या मदतीने त्वचेची काळजी घेतली जात आहे. कारण ॲंटीबॅक्टेरिअल बेनिफिट्समुळे कोरफड स्किन केअरसाठी सर्वोत्तम मानली जाते. कोरफडीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत, यासाठी तुम्ही दररोज त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफड जेलचा वापर करू शकता.
खरं तर, आजच्या धावपळीच्या जीवनात, हायड्रेशनचा अभाव, प्रदूषण आणि ताणतणाव यामुळे, तुमच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येतात आणि त्वचेचा मऊपणाही निघून जातो. अशा परिस्थितीत, कोरफड हा एक नैसर्गिक उपाय आहे जो सुंदर त्वचेसोबत चेहरा चमकदार आणि मऊ बनवण्यास मदत करतो. कोरफड जेलच्या वापरामुळे त्वचेवरील डाग कमी करते आणि मुरुमे दूर करते. यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीत कोणत्या गोष्टी मिक्स करून लावल्याने तुम्ही नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा मिळवू शकता ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात…
रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेणे का महत्त्वाचे आहे?
रात्रीच्या वेळी त्वचेवर लावण्यात आलेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे शोषून घेतात. झोपेत असताना त्वचेच्या पेशी जास्त प्रमाणात तयार होतात, म्हणून रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेतल्याने ती दुरुस्त होण्यास मदत होते. दिवसभर उन्हामुळे, प्रदूषणामुळे आणि ताणतणावामुळे खराब झालेली त्वचा बरी होते. झोपताना त्वचेची आर्द्रता कमी होते, त्यामुळे त्वचा मऊ राहण्यासाठी तसेच मॉइश्चरायझ्ड ठेवणे महत्वाचे आहे.
कोरफडीमध्ये या 5 गोष्टी मिक्स करा
मध
मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे जे त्वचेला नैसर्गिकरित्या मऊ ठेवते. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात जे मुरुम दूर करण्यास मदत करतात. कोरफडीमध्ये मध मिक्स करून लावल्याने त्वचेला मॉइश्चरायझेशन, सनबर्न कमी होणे, त्वचेची पोत सुधारणे आणि मुरुमे कमी होणे असे फायदे होतात.
हळद आणि कोरफड
हळदीमध्ये दाहक-विरोधी आणि ऑक्सिडंट गुणधर्म असतात. कोरफडीमध्ये हळद मिसळून लावल्याने त्वचेचा पोत सुधारतो. हे मिश्रण त्वचेवरील चट्टे कमी करण्यास देखील मदत करते. कारण यात वापरण्यात आलेली हळद त्वचेला चमक देते. रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे कोरफडी जेल मध्ये थोडी हळद मिसळून त्वचेवर लावा. त्यानंतर काही वेळाने साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ साफ करा.
लिंबाचा रस
लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी असते आणि ते त्वचेच्या काळजीसाठी खूप महत्वाचे आहे. याशिवाय, लिंबाचा रस त्वचेला एक्सफोलिएट देखील करतो. लिंबाचा रस कोरफडीत मिसळून लावल्याने त्वचेवरील गडद डाग कमी होतात. तसेच, ज्यांना त्वचेवर अतिरिक्त सीबम तयार होण्याची समस्या आहे त्यांना हा उपाय करून थोडा आराम मिळतो. कोरफड आणि लिंबू हा घरगुती उपाय त्वचा स्वच्छ करतो आणि त्वचेचा पोत देखील सुधारतो.
गुलाबपाणी
गुलाब पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्वचेला थंड आणि ताजेतवाने करते. कोरफडीमध्ये गुलाबपाणी मिक्स करून लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि मुरुमेही कमी होतात. कोरफड आणि गुलाबपाणी यांचे मिश्रण त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवतेच, शिवाय त्वचेला चमक देखील देते. त्वचा मऊ राहते. म्हणून, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कोरफड मध्ये गुलाबपाणी मिसळून टोनर बनवू शकता.
नारळ तेल
त्वचेच्या काळजीसाठीही नारळाचे तेल सर्वोत्तम मानले जाते. जर त्यात कोरफड जेल मिसळून लावला तर त्याचे फायदे दुप्पट होतात कारण या दोन्ही गोष्टी मॉइश्चरायझिंगमध्ये सर्वोत्तम आहेत. याशिवाय, ते दररोज लावल्याने त्वचेचे नुकसान होण्यापासून बचाव होतो आणि त्वचा चमकदार होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)