Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amalaki Ekadashi 2021 | भगवान विष्णूच्या पूजेचा दिन ‘आमलकी  एकादशी’, वाचा या व्रताची कथा आणि जाणून घ्या शुभ मुहूर्त!

असे मानले जाते की, भगवान विष्णू हे आवळ्याच्या झाडामध्ये निवास करतात. अशा परिस्थितीत जर या खास दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून, भगवान विष्णूची पूजा केली, तर तुम्हाला शंभर गायी दान करण्याइतके पुण्य आणि त्याचे शुभ फळ मिळते.

Amalaki Ekadashi 2021 | भगवान विष्णूच्या पूजेचा दिन ‘आमलकी  एकादशी’, वाचा या व्रताची कथा आणि जाणून घ्या शुभ मुहूर्त!
आमलकी एकादशी 2021
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 7:22 AM

मुंबई : हिंदू धर्मात जवळजवळ दररोज एखादा सण साजरा केला जातो. तथापि, आपल्याला याबद्दल क्वचितच संपूर्ण माहिती असेल. प्रत्येक दिवस एक वेगळी तारीख म्हणून आपल्या समोर येतो. प्रत्येक दिवसाची स्वतःची खासियत असते. सध्या फाल्गुन महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यातील सणांचीसुद्धा अशाच प्रकारे सुरूवात होणार आहे. याच महिन्यात पाडवा आणि होळी हे महत्वाचे उत्सवही लवकरच येणार आहेत (Amalaki Ekadashi 2021 Story of amalaki ekadashi 2021 and shubh muhurat).

होळीनंतर या फाल्गुन महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षाच्या या एकादशीच्या दिवशी आमलकी एकादशी साजरी केली जाते. यावेळी ही एकादशी 25 मार्च 2021 रोजी, अर्थात गुरुवारच्या दिवशी येत आहे. या दिवशी, भगवान विष्णूची पूजा संपूर्ण विधिवत पद्धतीने केली जाते. या दिवशी आवळ्याचे महत्त्व खूप विशेष आहे.

असे मानले जाते की, भगवान विष्णू हे आवळ्याच्या झाडामध्ये निवास करतात. अशा परिस्थितीत जर या खास दिवशी आवळ्याच्या झाडाखाली बसून, भगवान विष्णूची पूजा केली, तर तुम्हाला शंभर गायी दान करण्याइतके पुण्य आणि त्याचे शुभ फळ मिळते.

चला तर जाणून घेऊया, आमलकी एकादशीची तारीख, शुभ वेळ आणि तिचे महत्त्व :

आमलकी एकादशी शुभ काळ

एकादशी तिथाची सुरूवात : 24 मार्च 2021, दिवस बुधवार, सकाळी 10 वाजून 32 मिनिटे

एकादशी तिथी समाप्ती : 25 मार्च 2021, दिवस गुरुवार, सकाळी 09 वाजून 12 मिनिटे

पारणा मुहूर्त : 26 मार्च 2021, दिवस शुक्रवार, सकाळी 06 वाजून 53 मिनिटे ते सकाळी 08 वाजून 12 मिनिटे.

पारणा कालावधी : 02 तास 27 मिनिटे

(Amalaki Ekadashi 2021 Story of amalaki ekadashi 2021 and shubh muhurat)

अमलाकी एकादशीचे महत्त्व :

पद्म पुराणानुसार, जर आमलकी एकादशीचे व्रत पूर्ण निष्ठेने पाळले गेले, तर शेकडो तीर्थक्षेत्रांच्या दर्शनांइतके पुण्य मिळते. या दिवशी पूजा आणि उपवास केल्यास भगवान विष्णूसमवेत देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो. हे व्रत केल्याने माणसाला भरभराट होते. या दिवशी भगवान विष्णूला आवळे अर्पित करावे. या दिवशी पूजनानंतर विष्णू सहस्रनामाचे पठण करावे.

अमलाकी एकादशीची कथा :

प्राचीन काळी चित्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात एकादशीच्या उपवासाला खूप महत्व होते आणि सर्व लोक एकादशी व्रत ठेवत असत. त्याचवेळी राजाची अमलाकी एकादशीवर खूप श्रद्धा होती. एके दिवशी शिकार करताना राजा जंगलात बरेच दूर गेला. मग काही रानटी आणि जंगली डाकूंनी राजाला वेढा घातला. यानंतर डाकूंनी राजावर शस्त्राने हल्ला केला. तथापि, देवाच्या कृपेने राजावर जी काही शास्त्र चालवली गेली, ती राजाला लागण्याआधी फूलात बदलली जायची.

मात्र, मोठ्या संख्येने डाकूंनी घेराव घातल्यामुळे राजा जमिनीवर बेशुद्ध पडला. मग, राजाच्या शरीरातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली आणि सर्व राक्षसांचा वध करून अदृश्य झाली. जेव्हा राजाची शुद्ध परत आली, तेव्हा त्याला सर्व डाकू मृत आढळले. हे पाहून राजाला आश्चर्य वाटले की, या डाकुंना कोणी मारले?  तेव्हा आकाशवाणी झाली, ‘हे राजन! तुमच्या सर्व आमलकी एकादशी उपवासाच्या परिणामाने हे सर्व राक्षस ठार झाले आहेत. तुमच्या शरीरातून निर्माण झालेल्या आमलकी एकादशीच्या वैष्णवी सामर्थ्याने त्यांचा वध केला आहे. त्यांना ठार मारल्यानंतर तिने पुन्हा तुमच्या शरीरात प्रवेश केला आहे.’ हे ऐकून राजा आनंदित झाला आणि परत येऊन त्याने राज्यात सर्वांना एकादशीचे महत्त्व सांगितले.

(टीप : या लेखात दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लौकिक विश्वासांवर आधारित आहे. यातून अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही.)

(Amalaki Ekadashi 2021 Story of amalaki ekadashi 2021 and shubh muhurat)

हेही वाचा :

Mahashivratri 2021 | महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचं महत्त्व काय? जाणून घ्या…

Vijaya Ekadashi 2021 : विजया एकदशीचा काय आहे व्रत, विधी आणि शुभ मुहूर्त, वाचा सविस्तर

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.