रताळे कोणत्या आजारांवर रामबाण उपाय पाहा ? काय आहेत फायदे?

रताळे, उपवासासाठी वापरले जाणारे हे फळ, अनेक आरोग्य फायदे देते. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असल्याने, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते. वजन नियंत्रण आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील ते फायदेशीर आहे. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

रताळे कोणत्या आजारांवर  रामबाण उपाय पाहा ? काय आहेत फायदे?
Sweet potato
Follow us
| Updated on: Dec 23, 2024 | 4:08 PM

आपल्याला बाजारात एक फळ नेहमी दिसतं. ते आपण काही फार आवडीने घेत नाही. फक्त उपवास असेल तरच घेतो. रताळे कुणाचं आवडीचं फळ असेल असं वाटत नाही. फक्त उपवासासाठीचं उत्तम फळ म्हणून त्याकडे पाहिलं जातं. थंडीच्या दिवसात रताळे मोठ्या प्रमाणावर मिळतात. खायला गोड असलेल्या रताळ्यात पोषक घटक चांगले असतात. त्यामुळे रताळे खायला चविष्ट लागतात. त्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात. रताळे खाण्याचे काही आरोग्यदायी फायदेही आहेत. आरोग्यासाठी रताळे अत्यंत उत्तम आहेत.

शरीराला जी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आवश्यक आहेत, ते सर्व या रताळ्यात आहेत. त्यामुळेच रताळे डोळ्यांच्या आरोग्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत, त्वचेसाठी, पचन क्रिया सुधारण्यासाठी आणि अनेक इतर आरोग्यवर्धक कामांसाठी फायदेशीर आहे. रताळ्यात फायबर्स, जीवनसत्त्वे, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक भरपूर असतात. त्याचप्रमाणे ऊर्जा वाढवण्यासाठी आवश्यक असलेला लोह देखील रताळ्यात आढळतो. यामुळे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ नेहमीच आहारात रताळ्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात. रताळ्याचे फायदे खालीलप्रमाणे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

रताळ्यात जीवनसत्त्व C खूप प्रमाणात असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यात असलेल्या कॅरोटेनॉइड्स आणि अँथोसायनिन्स शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 124 ग्राम गोड बटाट्यात 12.8 मिलीग्राम जीवनसत्त्व C असते.

हे सुद्धा वाचा

डोळ्याचे आरोग्य

रताळ्यात जीवनसत्त्व A आणि बीटा कॅरोटिन मोठ्या प्रमाणावर आहे. ते UV किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करते. यासोबतच रताळ्यातील बीटा कॅरोटिन, अँथोसायनिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या आरोग्याला सुधारतात आणि दृष्टिदोष होण्यापासूनही प्रतिबंधित करतात.

पचनशक्ती सुधारते

रताळे आहारात समाविष्ट केल्याने पचन संबंधित समस्या दूर होतात. रताळ्यात फायबर पचन प्रणालीला सुधारते. याशिवाय, रताळ्यातील खनिजे आणि जीवनसत्त्व बी पोटदुखी, आम्लता आणि constipation सारख्या समस्यांपासून बचाव करतात.

वजन नियंत्रणात

जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी रताळे हा एक उत्तम पर्याय आहे. रताळ्यात फायबर्स असतात आणि त्यात कॅलरी कमी असतात. रताळे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते. रताळ्याचा वापर जिरे, मिरी सारख्या कमी कॅलरी असलेल्या मसाले किंवा औषधांसह केला जाऊ शकतो.

मधुमेह रुग्णांसाठी

मधुमेह रुग्णांनाही रताळे खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात नैसर्गिक गोडपणा असला तरी त्याचे ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी आहे. रताळे खाल्ल्याने टाईप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे 2004 मध्ये युनिव्हर्सिटी असोसिएट प्रोफेसर डॉ. बर्हार्ड लुडविक यांनी केलेल्या अध्ययनात दिसून आले आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.