Angarki Sankashti Chaturthi 2021 | ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ म्हणजे काय? वाचा यामागची कथा आणि जाणून घ्या शुभ मुहूर्त!

प्रत्येक महिन्यात दोनवेळा चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात.

Angarki Sankashti Chaturthi 2021 | ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ म्हणजे काय? वाचा यामागची कथा आणि जाणून घ्या शुभ मुहूर्त!
अंगारकी संकष्टी चतुर्थी
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 12:00 PM

मुंबई : प्रत्येक महिन्यात दोनवेळा चतुर्थी योग असतात. दोन्ही चतुर्थी भगवान गणेशाला समर्पित आहेत. शुक्ल पक्षावर पडणार्‍या चतुर्थीला ‘विनायक चतुर्थी’ आणि कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला ‘संकष्टी चतुर्थी’ म्हणतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी उद्या म्हणजेच 2 मार्च रोजी आहे. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ (Angarki Sankashti Chaturthi 2021) म्हणून ओळखले जाते. म्हणून, या दिवसाला ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’, असे म्हणतात (Angarki Sankashti Chaturthi 2021 pooja vidhi and vrat story).

याशिवाय फाल्गुन महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी (Dwijapriya Sankashti Chaturthi 2021) देखील म्हणतात. या दिवशी गणपतीच्या ‘विजप्रिया’ स्वरुपाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, विघ्नहर्ता द्विजप्रिया गणेशाला चार डोके आणि चार हात आहेत. त्यांची उपासना आणि उपवास केल्यास सर्व प्रकारचे त्रास दूर होतात. यासह, चांगले आरोग्य आणि आनंदी व समृद्धी प्राप्त होते.

‘ही’ आहे व्रत आणि पूजा करण्याची पद्धत

सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला. यानंतर श्रीगणेशाचे ध्यान करा आणि त्यांच्यासमोर व्रत करण्याचा संकल्प करा. यानंतर गणेशाच्या मूर्तीला पाणी, रोली, अक्षत, दुर्वा, लाडू, पान, अगरबत्ती अर्पण करा. आता केळीचे पान किंवा प्लेट घ्या. त्यावर रोलीने त्रिकोण काढा. त्रिकोणाच्या वरच्या बाजूस एक तूपाचा दिवा ठेवा. त्याच्यामध्ये मसूर डाळ आणि सात लाल मिरची ठेवा. त्यानंतर, ‘अग्ने सखस्य बोधि नः’ मंत्र किंवा गणपतीच्या इतर कोणत्याही मंत्राचा जाप किमान 108 वेळा करावा. या दरम्यान व्रताची कथा सांगा किंवा ऐका. आरती करा. संध्याकाळी चंद्रोदयानंतर व्रत सोडा.

शुभ काळ

चतुर्थी तिथी प्रारंभ : 2 मार्च, 2021 मंगळवार, 05:46 वाजता

चतुर्थी तिथी समाप्त : 3 मार्च, 2021 बुधवार, रात्र 02:59 वाजता

चंद्रोदय : 09:41 वाजता

(Angarki Sankashti Chaturthi 2021 pooja vidhi and vrat story)

व्रताची कथा

एकदा माता पार्वती आणि भगवान शिव नदीजवळ बसले होते, तेव्हा अचानक माता पार्वतींनी चौपद खेळण्याची इच्छा व्यक्त केली. पण समस्या अशी होती की, खेळामध्ये निर्णय घेणार्‍याची भूमिका बजावण्यासाठी दुसरा कोणीही व्यक्ती नव्हता. हा प्रश्न सोडवण्यासाठी शिव आणि पार्वती यांनी मिळून मातीची मूर्ती बनविली आणि त्याला जीवदान दिले.

दोघांनीही मातीपासून बनवलेल्या या मुलाला हा खेळ पाहण्याचा आदेश दिला. तसेच, कोण जिंकला आणि कोण हरला, हे ठरवण्याचा आदेश दिला. हा खेळ सुरू झाला, ज्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिव यांना वारंवार पराभूत करून विजय मिळवला. हा खेळ सुरूच राहिला, पण एकदा मुलाने चुकून माता पार्वतीला हरल्या, असे म्हटले.

मुलाच्या या चुकीमुळे माता पार्वतीला खूप राग आला, म्हणून तिने रागाने त्या मुलाला शाप दिला आणि तो लंगडा झाला. आपल्या चुकीबद्दल मुलाने मातेकडे खूप दिलगिरी व्यक्त केली. मग माता पर्वती म्हणाली की, आता शाप परत घेऊ शकत नाही, परंतु मी एक उपाय सांगू शकते ज्यामुळे तू शाप मुक्त होशील. माता म्हणाली की, काही मुली संकष्टीदेवाशी या ठिकाणी पूजेसाठी येतात, तुम्ही त्यांना उपवासाची पद्धत विचारा आणि ते व्रत प्रामाणिक मनाने करा.

व्रत करण्याची पद्धत जाणून घेत, मुलाने आदरपूर्वक आणि नियमांनुसार हे व्रत केले. भगवान गणेशाने त्यांच्या खऱ्या उपासनेवर प्रसन्न होऊन, त्यांची इच्छा विचारली. मुलाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. गणेशाने त्या मुलाची मागणी पूर्ण केली आणि त्याला शिवलोकी धाडले. परंतु, जेव्हा तो तेथे पोहोचला, तेव्हा त्याला फक्त भगवान शिव दिसले.

माता पार्वती भगवान शिवांवर रागावली आणि कैलास सोडून गेली होती. शिवाने जेव्हा त्या मुलाला विचारले की, आपण इकडे कसे आलात? तेव्हा त्याने त्यांना सांगितले की, गणेशाची पूजा करुन मला हे वरदान मिळाले आहे. हे जाणून घेतल्यानंतर भगवान शिवनेही पार्वतीची समजूत काढण्यासाठी हे व्रत केले, त्यानंतर माता पार्वती भगवान शिवावर प्रसन्न झाल्या आणि कैलासवर परत आल्या. अशाप्रकारे ‘संकष्टी चतुर्थी’ व्रत पाळणाऱ्याच्या सर्व मनोकामना गणपती पूर्ण करतात.

(Angarki Sankashti Chaturthi 2021 pooja vidhi and vrat story)

हेही वाचा :

Gopeshwar Mahadev | या मंदिरात महिलेच्या रुपात महादेव विराजमान, श्रुंगारानंतर पूजा-अर्चना

Kaal Bhairav | कोण आहेत काळ भैरव? ज्यांच्या उपासनेने दूर होतात मोठी विघ्ने, जाणून घ्या…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.