एप्रिल महिन्यात जन्माला येणाऱ्यांनी जरूर वाचावी ही बातमी, कारण तुम्ही…

ज्यांचा वाढदिवस एप्रिल महिन्यात येतो त्यांना एप्रिल फुलमुळे बऱ्याचदा चिडवलं जातं. पण जरी हा एप्रिल फुलचा महिना असला तरी या महिन्यात जन्माले येणारे लोक अनेक प्रकारे खास असतात

एप्रिल महिन्यात जन्माला येणाऱ्यांनी जरूर वाचावी ही बातमी, कारण तुम्ही...
इंजेक्शन दिल्याने दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यूImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 8:53 PM

मुंबई :  ज्यांचा वाढदिवस एप्रिल महिन्यात येतो त्यांना एप्रिल फुलमुळे बऱ्याचदा चिडवलं जातं. पण जरी हा एप्रिल फुलचा महिना असला तरी या महिन्यात जन्माले येणारे लोक अनेक प्रकारे खास असतात. एप्रिल महिन्यात जन्म घेतल्याचे अनेक फायदे असल्याचं डेली स्टारमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. तसंच, एक संशोधनानुसार, सर्वात लकी महिना ऑक्टोबर महिना आहे, परंतु या यादीत एप्रिल महिनाही समाविष्ट आहे. एप्रिलबद्दल सांगायचं झालं तर, या महिन्यात जन्मलेले लोक अधिक भाग्यवान आणि यशस्वी मानले जातात. जाणून घ्या यामागचं कारण.

एका इंग्रजी वेबसाइटवर एक प्रकारचे संशोधन करण्यात आले. यामध्ये एप्रिल महिना लकी का आहे याचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये सुमारे 300 प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि अब्जाधीशांचा समावेश करण्यात आला. तसंच जे आज यशस्वी आणि लोकप्रिय आहेत त्यांचाही यात समावेश केला. तसंच या संशोधनात शिक्षण, प्रगती, मेहनत अशा अनेक घटकांचाही समावेश करण्यात आला होता. यामध्ये काही प्रमाणात नशिबालाही कारणीभूत ठरवलं गेलं. तर या महिन्यात जन्माला येणारे लोक यशस्वी होऊन मोठे होतात हे सिद्ध झालं. त्यामुळे एप्रिल महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहे, त्यांनी हा स्पेशल दिवस अगदी स्टाईलने साजरा केला पाहिजे.

ऑक्टोबरमध्ये जन्मलेले सर्वात जास्त पॅाप्युलर

यादीत समाविष्ट असलेल्या 300 लोकांपैकी 36 लोक असे आहेत ज्यांचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला आहे. यामध्ये बिग गेट्स, किम कार्दशियन आणि सायमन कॉवेल यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींची नावे आहेत. तसंच संशोधनात असंही म्हटलं गेलं आहे की फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर या महिन्यात जन्मलेले लोक यशस्वी आणि भाग्यवान नाहीत. तसं सांगायचं झालं तर, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एखाद्या विशिष्ट महिन्यात जन्म घेणे आवश्यक नसते. कारण आयुष्यात जर यशस्वी व्हायचे असेल तर कठोर परिश्रम करावेच लागतात.

तुमचा वाढदिवस बनवा खास

तुमचा वाढदिवस कोणत्याही महिन्यात असो. पण तुमचा हा दिवस तुम्ही नक्कीच खास बनवा. तुम्ही यासाठी अनेक अनोख्या पद्धतींचा अवलंब करू शकता. तुमच्या वाढदिवसाला तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. किंवा तुमच्या या खास दिवशी तुमच्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद  स्वतः आणि तुमच्या कुटुंबासह आनंद लुटण्याची मजा घ्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.