एप्रिलमध्ये लाँग वीकेंड भेट देण्यासाठी ही आहेत सर्वोत्तम ठिकाणे, नक्की एक्सप्लोर करा
एप्रिलमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा मित्रांसह तीन दिवसांच्या सहलीसाठी बाहेर या ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करून सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. काही ठिकाणी तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात शांततेत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

आजकाल प्रत्येकाची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे आपल्याला बाहेर फिरायला जाण्यासाठी वेळ काढता येत नाही. कधी मुलांच्या परिक्षेमुळे तर कधी ऑफिसमधून सुट्टया नसल्यामुळे प्रवासाचा बेत नेहमीच अपूर्ण राहतो. पण तुम्हीही या लोकांपैकी एक असाल तर पुढील एप्रिल महिन्यात बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. कारण बहुतेक लोकांना त्यांच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर फिरायला ट्रिपला जायला आवडते. कारण यानिमित्ताने आपण आपल्या लोकांसोबत वेळ घालवतो.
एप्रिलमध्ये हवामान चांगले असते. त्यातच एप्रिल महिन्यामध्ये तीन दिवसांच्या सुट्ट्या एकत्र येतात. 18 तारखेला गुड फ्रायडे, 19 तारखेला शनिवार आणि 20 तारखेला रविवार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला शनिवार आणि रविवारी ऑफिसमधून सुट्टी असेल तर तुम्ही एक दिवस सुट्टी घेऊन 4 किंवा 3 दिवसांसाठी सहलीला जाण्याचा प्लॅन करू शकता.
नैनिताल




या सुट्टयांमध्ये तुम्ही नैनिताल मधील या ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन करू शकता. नैनिताल हे उत्तराखंडमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. तुम्ही येथे अनेक ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. येथे तुम्ही नैनिताल तलावाला भेट देऊ शकता. याशिवाय तुम्ही टिफिन टॉप, पँगोट आणि किलबरी पक्षी अभयारण्य, नैना पीक, इको केव्ह गार्डन, पंत जीबी पंत हाय अल्टिट्यूड प्राणीसंग्रहालय, स्नो व्ह्यू पॉइंट आणि सरिता ताल यासारख्या अनेक सुंदर ठिकाणांना एक्सप्लोर करू शकता. नैना देवी मंदिर देखील नैनी तलावाच्या काठावर आहे, तुम्ही येथे दर्शनासाठी देखील जाऊ शकता.
जयपूर
तुम्ही जयपूरला तीन दिवसांच्या सहलीसाठी भेट देऊ शकता. येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. तुम्ही इथे फिरायला गेल्यावर येथील आमेर किल्ला, सिटी पॅलेस, हवा महल, नाहरगड किल्ला, जयगड किल्ला, जल महल आणि जंतरमंतर अशा अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता. याशिवाय, तुम्ही जवळच्या बाजारापेठेत तेथील खास वस्तू एक आठवण म्हणुन काही वस्तु खरेदी करू शकता. जोहरी बाजार आणि बापू बाजार हे येथील प्रसिद्ध बाजारपेठांपैकी एक आहेत.
कसोल
हिमाचल प्रदेशातील कसोल हे ठिकाण तीन दिवसांत भेट देण्यासाठी उत्तम ठरेल. तुम्ही येथे मणिकरण साहिब गुरुद्वारा आणि मणिकरण शिव मंदिराला भेट देऊ शकता. याशिवाय, तुम्ही येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या खीर गंगेला जाऊ शकता. हिरव्यागार टेकड्या आणि त्यावर असलेले निळे आकाश हे दृश्य पाहून तुम्हाला खूप मनमोहक वाटेल.येथील निसर्गाच्या सानिध्यात हरवून जाल. तसेच तुम्ही तेथील मलाना गावाला भेट देऊ शकता, हे ठिकाण देव टिब्बा आणि चंद्रखानी टेकड्यांनी वेढलेले आहे. याशिवाय, येथे तुम्हाला खीरगंगेला ट्रेक करण्याची, नदीकाठी कॅम्प करण्याची, रात्री आकाशात तारे पाहण्याची आणि इतर अनेक ॲक्टिवीटी करण्याची संधी मिळू शकते.