चमकदार चेहऱ्यासाठी तयार करा ‘हा’ पॅक…जाणून घ्या 6 घरगुती फेस पॅक
घरगुती गोष्टी वापरुन आपल्या त्वचेची काळजी घेतली जातेय. चमकदार चेहऱ्यासाठी तुमच्या किचनमध्ये असलेलं एक साहित्य खूप फायदेशीर आहे. ते तुमच्या किचनमध्ये कायम असतं. टोमॅटो हो...बरोबर टोमॅटोचा फेस पॅक आपल्या त्वचा चमकदार करते.
मुंबई : प्रत्येक जण महिला असो वा पुरुष आपल्या त्वचेची काळजी घेतात. चमकदार चेहऱ्यासाठी ते फेशियल करतात. लग्न, समारंभ, जीवनातील खास क्षण, पार्टी यासाठी आपण छान दिसण्यासाठी पार्लरमध्ये जातात. बाजारात मिळणारे सौदर्यं प्रसाधने वापरतात. पण हे केमिकलयुक्त प्रसाधने आपल्या त्वचेचं नुकसान करतात. लोकांचा आता नॅचलर गोष्टींकडे कल वाढलेला दिसतोय. घरगुती गोष्टी वापरुन आपल्या त्वचेची (Skin) काळजी घेतली जातेय. चमकदार चेहऱ्यासाठी तुमच्या किचनमध्ये असलेलं एक साहित्य खूप फायदेशीर आहे. ते तुमच्या किचनमध्ये कायम असतं. टोमॅटो (Tomato) हो…बरोबर घरगुती टोमॅटोचा फेस पॅक (Homemade Tomato Face Pack) आपल्या त्वचा चमकदार करते. टोमॅटोमध्ये असलेले गुणधर्म आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. टोमॅटोमध्ये अँटिऑक्सडंट्स आहेत जे आपल्या त्वचेसाठी फायद्याचे आहे. तर टोमॅटोचे वेगवेगळे फेस पॅक आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
- टोमॅटो आणि कोरफड जेल फेस पॅक – डार्क स्पॉट्स आणि डॉर्क सर्कल्ससाठी हा फेस पॅक खूप उपयुक्त आहे. या पॅक बनविण्यासाठी 2 मोठे चमचे ताज्या टोमॅटोचा रस आणि अर्धा चमचा एलोवेरा जेल मिक्स करा. हे मिश्रण 20 मिनटं चेहऱ्याला लावा
- टोमॅटो आणि लिंबू फेस पॅक – चेहऱ्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी हा फेस पॅक मदत करतो. या पॅकसाठी टोमॅटोचा रस आणि लिंबू मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर लावा. हा पॅक सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा
- टोमॅटो आणि चंदन फेस पॅक – हा पॅक तयार करण्यासाठी 4 चमचे टोमॅटोचा रस आणि 2 चमचे चंदन मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.
- टोमॅटो आणि बेसन फेस पॅक – या पॅकसाठी 2 चमचे टोमॅटोचा रस, 3 चमचे बेसन, एक चमचा शहद आणि एक चमचा दही मिक्स करा. मग यात एक चिमुटभर हळद मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला लावा आणि सुकल्यानंतर गरम पाण्याने धुवा
- टोमॅटो आणि दही फेस पॅक – 2 चमचे टोमॅटो आणि 2 चमचे दही चांगले मिक्स करा. यात काही थेंब लिंबूचा रस मिक्स करा. आणि हा पॅक 20 मिनट आपल्या चेहऱ्यावर लावा.
- टोमॅटो आणि मध फेस पॅक – 2 चमचे टोमॅटोचा रस, एक चमचा मध मिक्स करा. या मिश्रणाला चेहऱ्यावर 15 मिनिटं लावू ठेवा आणि कोमट पाण्याने चेहऱ्या साफ करा. हा पॅक आठवड्यातून 2 वेळा लावा.
हे झाले फेस पॅक तुम्ही टोमॅटोपासून घरच्या घरी फेशियल करु शकता.
टोमॅटो क्लीन्जर
पिकलेल्या टोमॅटोचा रस घ्या. त्यात कडुनिंबाच्या पानाचे पावडर मिक्स करा. या मिश्रणाने चेहऱ्यावर 2 ते 3 मिनिटं मसाज करा. या मिश्रणाने त्वचा स्वच्छ होते.
टोमॅटोचा स्क्रब आता या स्क्रबसाठी टोमॅटोचा रस आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. या मिश्रणाने चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटं मसाज करा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा.
टोमॅटो पॅक आता स्क्रब केल्यावर टोमॅटोचा फेस पॅक लावा. यासाठी टोमॅटो आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक लावा. सुकल्यावर ते थंड पाण्याने धुवून टाका.
टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
संबंधित बातम्या :
वजन कमी करण्यासाठी ‘या’ सूपचा दररोजच्या आहारात समावेश करा!
वजन कमी करायचे आहे? तर या ‘पाच’ सवयींना बनवा तुमच्या आयुष्याचा भाग; जाणून घ्या फायदे
Weight Loss आणि प्रोटीनची कमी भरुन काढण्यासाठी या हिरव्या भाज्या आहारात असायलाच हव्या