दात ब्रश करताना तुम्ही करताय या चूका?,पाहा ही आहे योग्य पद्धत

एक सामान्य समज आहे की दात घासण्यापूर्वी ब्रश पाण्याने ओला केल्याने टुथपेस्टला जास्त फेस येतो. त्यामुळे दातांची स्वच्छता चांगल्या प्रकारे होते. परंतू यावर अनेक मतांतरे आहेत. काही जणांच्या मते हे योग्य नाही. यावर तज्ज्ञांचे काय मत आहे हे पाहूयात...

दात ब्रश करताना तुम्ही करताय या चूका?,पाहा ही आहे योग्य पद्धत
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 3:30 PM

सकाळी उठल्यानंतर आपण दास घासतो. आपल्या दैनंदिन ओरल हायजिन पाळण्याची क्रिया म्हणून याकडे आपण पाहातो. परंतू ब्रश करताना आपल्याला काही बाबी माहिती नसतात की त्या चूक आहेत की बरोबर. यात एक बाब म्हणजे दात घासण्यापूर्वी आपण ब्रश नेहमी पाण्याने धुतो. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? अशा प्रकारे ब्रश ओला करणे गरजेचे असते का ? चला तर याबाबत विस्ताराने पाहूयात…

सकाळी ब्रश करण्यापूर्वी अनेकांना ब्रश ओला करण्याचा विचार मनात येतो. काही जणांना वाटते की ब्रश नीट ओला केल्याने फेस चांगला येऊन दात स्वच्छ होण्यास मदत मिळते. परंतू काही लोकांना याची चिंता वाटते की ब्रश ओला केल्याने लवकर टुथपेस्टचा फेस होतो आणि ती दातांना नीट लागत नाही. त्यामुळे दातांना नीट स्वच्छ करता येत नाही. या दोन्ही बाबी सर्वसामान्यांना कोड्यात टाकत असतात. अखेर दातांना स्वच्छ करण्याचा योग्य पद्धत कोणती ? ब्रश ओला करणे आवश्यक असते की नाही ? असे अनेक प्रश्न मनात येत असतात. त्यामुळे दातांना स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती ? हे आपण पाहूयात..

ब्रश करण्याची योग्य पद्धत काय?

दात घासण्यापूर्वी ब्रश ओला करणे एक चांगली सवय आहे. परंतू हे लक्षात ठेवा की हे टुथपेस्ट लावण्यापूर्वी केले पाहीजे. तज्ज्ञांच्या मते ब्रशला धुणे ही एक चांगली हेल्थी सवय आहे. यामुळे ब्रशला लागलेली धुळ, माती निघून जाते. किंवा टुथपेस्टचे लागलेले कण यामुळे धुवून निघतात. या शिवाय पाण्याने धुतल्याने ब्रिसल्स नरम होतात. नरम ब्रिसल्स दातांना नीट पद्धतीने साफ करतात. आणि हिरड्यांना नुकसान पोहण्याची शक्यता कमी होते.

हे सुद्धा वाचा

या सवयी नुकसानकारक

दातांची स्वच्छता करण्यासाठी आपण सर्वजण टुथपेस्टचा वापर करीत असतो. परंतू तुम्हाला माहिती आहे का ? ब्रशवर नेमकी टुथपेस्ट किती घ्यायला हवी ? काही लोकांना वाटते की जास्त टुथपेस्ट घेतली की दांत चांगले स्वच्छ होतात. परंतू हा एक गैरसमज आहे.

ब्रश करताना तुम्हाला आपल्या टुथब्रशवर केवळ वाटाण्याच्या दाण्याच्या आकाराची पेस्ट घेणे आवश्यक असते. जादा टुथपेस्ट घेतल्याने दातांच्या ईनेमलला नुकसान होऊ शकते. तसेच दातांच्या संवेदनशीलता वाढू शकते. तसेच जास्त फ्लोराईड युक्त टुथपेस्टच्या वापराने दातांवर पिवळे डाग देखील पडू शकतात. ज्याला फ्लोरोसिस असे म्हटले जाते.

( सूचना – ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा )

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.