Drinking Water Mistakes : पाणी पिताना तुम्हीही या छोट्या-छोट्या चुका करता का ?
पाणी पिताना तुमच्याही चुका होतात का? दैनंदिन जीवनात पाण्याशी संबंधित कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते पाहूया.
मुंबई : पाणी हे जीवन (water is important for life) आहे… पाण्याशिवाय आपण कोणीच जगू शकत नाही. पण पाणी पिताना कळत-नकळतपणे काही अशा चुका (mistakes) घडतात, ज्या तुम्हाला आजारी पाडू शकतात. पाय दुखणे, अपचन किंवा सर्दी अशा अनेक समस्या पाण्यामुळे होऊ शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे किंवा वापरणे. पाण्याशिवाय जीवन शक्य नाही, पण ही महत्त्वाची गोष्ट जर आपली शत्रू झाली तर आपल्याला खूप त्रास सहन करावा लागू शकतो.
पाणी पिताना तुमच्याही चुका होतात का? दैनंदिन जीवनात पाण्याशी संबंधित कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते आपण जाणून घेऊया.
बर्फाचं पाणी
रणरणत्या उन्हाळ्यात बर्फाचं गारेगार पाणी प्यायला खरंच छान वाटतं. पण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. बर्फ किंवा फ्रीजचे थंड पाणी जास्त प्यायल्याने सांधेदुखीची तक्रार होऊ शकते. त्याची सवय पोटाला अस्वस्थ करू शकते. याशिवाय थंड पाण्यामुळे तहान भागत नाहीच, उलट पुन्हा पुन्हा तहान लागते.
गार पाण्यात साधं पाणी मिसळणं
पाणी खूप थंड असल्याने बहुतेक लोक त्यात साधं पाणी घालतात. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारचे पाणी प्यायल्याने शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.
पाण्याच्या जुन्या बाटल्या वापरत राहणे
बहुतेक घरांमध्ये, लोक अनेक महिने किंवा वर्षे पाण्याच्या बाटल्या बदलत नाहीत. असे बॅक्टेरिया जुन्या बाटलीतून पाण्यात जातात ज्यामुळे शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होते. याशिवाय बाटलीतील दुर्गंधीमुळे कोणाच्याही समोर पेच निर्माण होऊ शकतो. म्हणूनच बाटल्या वेळेत बदलल्या पाहिजेत.
प्लास्टिकच्या बाटलीचा वापर
घरांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरणे खूप सामान्य आहे. प्लास्टिकची बाटली नवी असो वा जुनी, आरोग्यासाठी ती कोणत्याही विषापेक्षा कमी नाही. भारतातील बहुतेक लोक प्लास्टिकच्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवतात. ही पद्धत आपल्याला सर्वात जास्त आजारी बनवते.
तुम्हीही पाण्याशी संबंधित अशा चुका करत असाल किंवा तुम्हालाही वर नमूद केलेल्या काही सवयी असतील, तर त्या आजच सोडा आणि स्वस्थ रहा.