सनस्क्रीन लावताना तुम्हीही या चुका करता का ? या गोष्टी जाणून घ्याच
त्वचेचं नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. पण अनेक वेळा आपण अशा काही चुका करतो, ज्यामुळे सनस्क्रीन त्वचेवर कमी परिणामकारक ठरतं. त्या चुका कोणत्या , हे समजून घेऊया.
Sunscreen Mistakes : उन्हाळा असो किंवा पावसाळ्याचा ऋतू, नाहीतर कडाडती थंडी, त्वचेचे नुकसान होण्यापासून (skin care) वाचवण्यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये सनस्क्रीन (sunscreen) लावणे आवश्यक आहे. हानीकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन हे प्रोटेक्टिव्ह बॅरिअर म्हणून कार्य करते. परंतु अनेक वेळा त्वचेवर सनस्क्रीन लावल्याने अपेक्षित परिणाम मिळत नाही.
जर तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर याचाच अर्थ की तुम्ही सनस्क्रीन लावताना काही चुका करत आहात. सनस्क्रीन लावण्याशी संबंधित काही चुका जाणून घेऊया, ज्या बऱ्याच लोकांना कदाचित माहितही नसतील.
कमी सनस्क्रीन लावणे
यातील सर्वात सामान्य चुकांपैकी एक म्हणजे योग्य प्रमाणात किंवा पुरेसं सनस्क्रीन न लावणे. त्यामुळे त्वचेचा जो भाग प्रकाशाच्या किंवा सूर्यकिरणांच्या संपर्कात येतो, त्यावर योग्य प्रमाणात सनस्क्रीन लावा. त्यामुळे एक्सपोजर मिळणारा शरीराचा भाग किंवा अवयवाला त्रास होणार नाही.
चेहऱ्याच्या काही भागांवर सनस्क्रीन न लावणे
अनेकदा लोक कानाच्या मागच्या बाजूला, मानेला, ओठांना आणि पायाच्या वरच्या भागाला सनस्क्रीन लावत नाहीत. या ठिकाणी सनबर्नचा धोका जास्त असतो. त्यामुळे सनस्क्रीन लावताना शरीराच्या या भागांवरही सनस्क्रीन आवर्जून लावा.
अर्धा तास आधी सनस्क्रीन लावा
बाहेर जायच्या किमान 15 ते 30 मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे जेणेकरून ते त्वचेत योग्यरित्या शोषले जाईल आणि चांगले संरक्षण देईल.
परत न लावणे
जर तुम्ही पोहत असाल, जिममध्ये घाम येत असेल तर दर दोन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावा. बरेच लोक चेहऱ्यावर सनस्क्रीन लावायला विसरतात, ज्यामुळे त्यांना उन्हापासून पूर्ण संरक्षण मिळत नाही. तसेच काही लोकं असेही असतात, जे ढगाळ हवामान असताना सनस्क्रीन लावत नाहीत. पण अशा हवामानातही सनस्क्रीन लावणे आवश्यक असते.
एक्सपायरी डेट तपासा
तुमच्या सनस्क्रीनवर असलेली एक्सपायरी डेट तपासा. एक्सपायरी डेट उलटून गेलेले सनस्क्रीन लावल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच ते नियमितपणे बदलणे देखील आवश्यक आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)