उन्हाळ्यात त्वचा झाली टॅन ? तुम्हीही या चुका करता का ? मग होणारच ना त्रास !

Skin Tanning : उन्हाळ्यात टॅनिंगमुळे त्वचा सावळी अथवा काळसर दिसू लागते. स्किन केअर च्या काही चुका या टॅनिंगसाठी कारणीभूत ठरू शकतात.

उन्हाळ्यात त्वचा झाली टॅन ? तुम्हीही या चुका करता का ? मग होणारच ना त्रास !
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 11:36 AM

नवी दिल्ली : सूर्यकिरणांमध्ये दोन प्रकारचे अतिनील किरणे असतात. पहिला UVA आणि दुसरा UVB. UVA त्वचेच्या वरच्या थराला नुकसान करते. याला सनबर्न म्हणतात. तर UVB त्वचेच्या आतील थरांना नुकसान पोहोचवते. हे टॅनिंग म्हणून ओळखले जाते. सनटॅनमुळे त्रास होतो, मग तुम्ही कोणत्या चुका करत आहात याचा विचार करा ? उन्हाळ्यात UVB किरणांच्या थेट संपर्कामुळे त्वचा टॅन होते. टॅनिंगमुळे (tanning) त्वचा काळी पडते. उन्हामुळे काळी झालेली त्वचा सहजासहजी बरी होत नाही. सन टॅनिंग शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकते. अतिनील किरणांव्यतिरिक्त, स्किन केअरच्या (skin care mistakes) काही चुकाही टॅनिंगसाठी कारणीभूत ठरू शकतात. त्या चुका कोणत्या हे जाणून घेऊया.

1) उन्हात जाताना अंग न झाकणं

जे लोकं बाहेर, रस्त्यावर किंवा उघड्यावर काम करतात त्यांनी आपली त्वचा झाकून ठेवावी. असे करण्यात अयशस्वी झाल्यास टॅनिंग होऊ शकते. उन्हाळ्यात पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालावेत. त्वचेला टॅनिंग, रॅशेस, पिंपल्स किंवा उन्हाळ्याच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी सुती कपडे फायदेशीर ठरतात. सुती कपडे घातले तर जास्त घाम येत नाही.

हे सुद्धा वाचा

2) त्वचा एक्सफोलिएट न करणे

जे लोक कधीही स्क्रब करत नाहीत, त्यांच्या त्वचेवरील टॅनिंग सहजासहजी जात नाही. त्वचेला स्क्रब केल्याने त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात. स्क्रब केल्याने त्वचा स्वच्छ होते. पिगमेंटेशनची समस्याही दूर होते. जर तुम्हाला टॅनिंग काढण्यासाठी स्क्रब वापरायचा असेल तर साखर आणि कॉफी मिक्स करून स्क्रब तयार करा. त्वचेवर स्क्रब लावा. 2 ते 3 मिनिटे वर्तुळाकार मसाज करा, नंतर त्वचा स्वच्छ करा.

3) त्वचा मॉयश्चराइज न करणे

जर त्वचेत कोरडेपणा असेल तर त्वचा UVB किरणांचे वाईट परिणाम असणाऱ्या टॅनिंगपासून वाचू शकत नाही. मॉयश्चरायझर हे त्वचा आणि अतिनील किरणांमधील थर म्हणून काम करते. त्वचेचा जास्त कोरडेपणा असेल तर याचा अर्थ म्हणजे तुम्ही त्वचेला योग्य प्रकारे मॉयश्चराइझ करत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेतील कोरडेपणाही वाढतो. टॅनिंग टाळण्यासाठी, त्वचेत ओलावा ठेवा. सकाळी आणि संध्याकाळी त्वचेला मॉइश्चरायझर लावा.

4) स्किन केअर रूटीन फॉलो न करणे

UVB किरणांचा संपर्क पूर्णपणे टाळणे कठीण आहे. प्रत्येकाच्या त्वचेला कधी ना कधी UVB किरणांचा फटका बसतो. काहींना UVB किरणांच्या संपर्कात आल्याने जास्त टॅनिंग होते, तर काहींना कमी होते. जे स्किन केअर रूटीनचे पालन करत नाहीत, ते लवकर टॅनिंगचे शिकार होतात. आठवड्यातून एकदा त्वचेवर स्क्रब लावावा. याशिवाय फेसपॅक लावावा. टॅनिंग टाळण्यासाठी, दररोज क्लिन्झिंग, मॉइश्चरायझिंग सारख्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत.

5) सनस्‍क्रीन न लावणे

सनस्क्रीन न लावल्यामुळे टॅनिंगची समस्या होऊ शकते. सनस्क्रीन आपल्या त्वचेवर संरक्षणात्मक थर म्हणून काम करते. पिगमेंटेशनच्या समस्येपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी सनस्क्रीन देखील फायदेशीर मानले जाते. तसे, काही त्वचाशास्त्रज्ञ मानतात की सनस्क्रीन लावणे अत्यावश्यक नाही. सनस्क्रीनच्या अतिवापरामुळे त्वचेवर पुरळ उठणे किंवा संसर्ग होऊ शकतो. नैसर्गिक सनस्क्रीन शोधत असल्यास, कोरफडीचा रस किंवा जेल वापरून पहा. कोरफडीचे जेल हे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते. त्यामध्ये व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स असतात. या घटकांच्या मदतीने ते त्वचेला सूर्याच्या नुकसानीपासून वाचवण्यास मदत करते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.