Be Smart : फक्त फोन वापरू नका, या गोष्टींचा दैनंदिन जीवनात करा समावेश, आयुष्य होईल सोप्प!

आता मोबाईलमुळे लोकांमधील अंतर खूपच कमी झाले आहे. आजकाल लोक एकमेकांसोबत फोनवरच बोलतात. तसेच ते एकमेकांना मोबाईलवरूनच पाहतात. त्याचबरोबर आजकाल असे खूप कमी लोक असतील ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसेल. 

Be Smart : फक्त फोन वापरू नका, या गोष्टींचा दैनंदिन जीवनात करा समावेश, आयुष्य होईल सोप्प!
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 4:35 PM

मुंबई : सध्याच्या काळात प्रत्येकजण मोबाईल शिवाय काही राहू शकत नाही. जिथे जाल तिथे तुम्हाला कुणी ना कुणी मोबाईल घेऊन बसलेलं दिसेलच. तसेच मोबाईल ही एक काळाची गरज बनलीये हे म्हणणं काही वावगं ठरणार नाही. कारण सध्याच्या जमान्यात लोक कोणताही व्यवहार करायचा असो, शॉपिंग करायची असो किंवा एखाद्या व्यक्तीशी संवाद साधायचा असो यासाठी मोबाईलचा वापर आवर्जून करतातच. तसेच आता तुम्ही तुमचा फोन स्मार्ट पद्धतीनेही वापरू शकता. ज्यामुळे तुम्हाला तुमचे जीवन आणखी सोपे करण्यास मदत होईल. तर स्मार्टफोनचा वापर स्मार्ट पद्धतीने कसा करायचा याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

पूर्वी मोबाईल नसल्यामुळे लोक एकमेकांना भेटायचे, एकमेकांसोबत वेळ घालवायचे. पण आता मोबाईलमुळे लोकांमधील अंतर खूपच कमी झाले आहे. आजकाल लोक एकमेकांसोबत फोनवरच बोलतात. तसेच ते एकमेकांना मोबाईलवरूनच पाहतात. त्याचबरोबर आजकाल असे खूप कमी लोक असतील ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसेल.

सध्या सोशल मीडियावर काही पोस्ट किंवा व्हिडीओ असतात ज्यामुळे तुमचे लक्ष विचलित होते. अनेक लोक आपला वेळ ते रील किंवा इतर नको त्या गोष्टी पाहण्यात वाया घालवतात.  यामुळे तुम्ही तुमचा वेळ तर वाया घालवताच पण तुम्ही काही चांगल्या कामाच्या गोष्टीही करू शकत नाही. अशा वेळी तुम्ही तुमचा स्मार्ट फोन स्मार्ट पद्धतीने वापरा. यामुळे तुम्ही फोनचा योग्य वापर करू शकाल.  तर स्मार्ट फोनचा स्मार्ट पद्धतीने वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.

टू डू लिस्ट

तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये टू डू लिस्ट बनवा. टू डू लिस्ट बनवल्यामुळे तुम्हाला दिवसभरात काय करायचे आहे हे कळेल. तसेच  तुम्ही तुमच्या मनातील गोष्टींबद्दल अगदी क्लिअर असाल.

वाॅटर रिमाइंडर

तुम्ही वाॅटर रिमाइंडरसाठी तुमचा फोन वापरू शकता.  बर्‍याचदा आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की आपण पाणी प्यायचं विसरून जातो. पाणी नं पिणे  हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही.  त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वॉटर रिमाइंडरचा वापर करा. जेणेकरून हे रिमाइंडर तुम्हाला किती वेळेत पाणी प्यावे हे सांगते.

स्पेशल ऑकेजन रिमाइंडर

अनेकदा असे घडते की आपण आपल्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस किंवा त्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास विसरतो. त्यामुळे जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस विसरायचा नसेल तर तुम्ही रिमाइंडर सेट करू शकता. जेणेकरून तुम्हाला त्या व्यक्तीचा वाढदिवस कधी आहे हे लगेच समजेल.

कौशल्य विकास

अनेक लोकांना दररोज काहीतरी नवीन शिकायला आवडते. त्यामध्ये मग आर्ट अँड क्राफ्टशी संबंधित काही शिकायचे असेल, तर त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत.  त्यांच्याद्वारेही तुम्ही शिकू शकता. तसेच अशा अनेक गोष्टी शिकण्यासाठी लोकांना बाहेर क्लासेसला जाणं शक्य नसतं, अशावेळी ते मोबाईलवर व्हिडीओ पाहून शिकू शकतात.

पीरियड ट्रॅकर ॲप

सध्याच्या महिला त्यांच्या मोबाईलमध्ये पीरियड ट्रॅकर ॲप वापरू शकतात.  या ॲपमध्ये  मासिक पाळीची तारीख आणि दिवस याबद्दल संपूर्ण माहिती असते. यामध्ये तुमच्या मासिक पाळीची तारीख तसेच पुढच्या महिन्यात कोणत्या तारखेला मासिक पाळी येणार किंवा  तुमच्या मासिक पाळीला किती उशीर होतो याच्याशी संबंधित माहिती या ॲपमधून मिळते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.