वारंवार खाजेमुळे तुमचा ‘बिअर्ड लूक’ बिघडतोय? हे घ्या घरगुती उपाय…
आजकाल सर्वांनाच ‘बिअर्ड लूक’ आवडत आहे. अनेक तरुण भारदस्त दाढी ठेवत असले तरी एक समस्या सामान्य आहे. दाढीला वारंवार खाज सुटते. यामुळे अनेक तरुण त्रस्त आहेत. परंतु आज आम्ही या लेखाच्या माध्यमातून काही खास टीप्स् देणार आहोत, ज्या माध्यमातून तुमची ही समस्या मुळापासून नष्ट होईल.
‘बिअर्ड लूक’ (Beard look) सध्या तरुणाईसाठी ‘स्टाईल आयकाँन’ झाला आहे. तरुणांचा सध्या भारदस्त दाढी वाढवण्याकडे कल वाढत आहे. सिनेमातील अभिनेत्यांच्या लूकनुसार तरुणांमध्येही आता दाढी वाढविण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. परंतु दाढी वाढविताना त्याची विशेष काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. दाढीची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे आणि त्याच्याशी संबंधित अशा अनेक ब्युटी टिप्स आहेत. ज्यामध्ये त्याच्या पोषणापासून ते हायड्रेटेड ठेवण्यापर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे. एवढेच नाही तर दाढीसाठी योग्य उत्पादने निवडणे खूप महत्त्वाचे आहे. डोक्याच्या केसांप्रमाणेच दाढीमध्ये खाज सुटली तर चिडचिड आणि वेदना होतात. जर तुम्हालाही दाढीच्या खाजेने (Itching) त्रास होत असेल तर तुम्ही घरच्या घरी या समस्येपासून सुटका मिळवू शकता. या लेखात काही सोप्या टिप्स (tips) सांगणार आहोत, ज्यामुळे खाज सुटण्याची समस्या दूर होईल.
तेलाचा वापर करावा
अनेकदा खासकरुन हिवाळ्यात दाढीच्या त्वचेत कोरडेपणा आल्यानेही खाज सुटते. यासाठी आठवड्यातून दोनदा दाढीला तेल लावावे. तज्ज्ञांच्या मते, असे केल्याने खाज सुटत नाही, त्याचबरोबर तुमचे केसही दाट होऊ शकतात. दाढीसाठी बिअर्ड ऑईलसह अनेक उत्पादने बाजारात मिळतील, पण घरच्या घरी दाढीचे तेलही बनवू शकता. घरी आर्गन ऑइलमध्ये लिंबूपासून तयार तेल मिसळा आणि दोन्ही बाटलीत ठेवा. दोन्ही तेल एकजीव होईपर्यंत बाटली नीट हलवा. त्यानंतर तुम्ही नैसर्गिक तेल दाढीच्या केसांसाठी वापरू शकता. हे तेल प्लास्टिक ऐवजी काचेच्या बाटलीत साठवण्याचा प्रयत्न करा. वास्तविक, काचेच्या बाटलीतील तेल लवकर खराब होत नाही.
दाढीच्या स्वच्छतेकडे लक्ष
स्कॅल्पप्रमाणेच दाढीही स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही दाढीच्या केसांची स्वच्छता ठेवली नाही, तर यामुळे तुम्हाला खाज येण्यासोबतच केस गळणे, तुटणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आंघोळ करण्याव्यतिरिक्त, आपण दिवसातून एकदा तरी दाढी साफ करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पाणी आणि फेस वॉशची मदत घेऊ शकता, यातून खाज सुटण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
लिंबू आणि दहीचा वापर
दाढीला खाजमुक्त करण्यासाठी तसेच दाढीचा लूक खास करण्यासाठी तुम्ही घरीच मास्क तयार करू शकता. दाढीची खाज लिंबू आणि दह्याने देखील दूर केली जाऊ शकते. टाळूमध्ये असलेली खाज दूर करण्यासाठीदेखील हे प्रभावी आहे. यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. आता ही पेस्ट दाढीला लावा आणि साधारण अर्धा तास अशीच राहू द्या. ते काढण्यासाठी फक्त कोमट पाणी वापरा. लिंबूमध्ये असलेल्या ‘व्हिटॅमिन सी’मुळे दाढीची वाढ चांगली होते.