PHOTO : निळ्या समुद्रात नैसर्गिक गिटार! भारतातील हे अनोख सुंदर ठिकाण तुम्ही पाहिलंय?
भारत असा देश आहे जेथे अनेक आश्चर्यचकीत करणाऱ्या सुंदर गोष्टी आहेत. त्यातीलच एक अप्रतिम जागा आहे धनुष्यकोडी. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर धनुष्यकोडीचे फोटो पाहण्यास मिळत आहेत.
तिरुअनंतपूरम : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथील वेगवेगळे ऋतू आणि वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे निसर्गाचे अनेक चमत्कार पाहायला मिळतात. भारतात कुठं डोंगर आहेत, तर कुठं मोकळी मैदानं, कुठं खळखळुन वाहणाऱ्या नद्या, तर कुठं वाळवंटी प्रदेश आहेत. हेच कारण आहे की जगभरातील लोकांना भारत आपल्या नैसर्गिक सौंदर्याने खुणावत असतो. भारतात अशा कितीतरी जागा आहेत जिथे एकदा गेल्यानंतर पुन्हा तिथून मागे येण्याची इच्छा होत नाही (Beautiful tourist place Dhanushkod from India in Sea).
भारतातील अशा नैसर्गिक सौदर्याने नटलेल्या ठिकाणांची माहिती देणारे कितीतरी पेज सोशल मीडियावर आहेत. तेथे भारतातील चांगल्या ठिकाणांचे फोटो टाकले जातात. हे फोटो पाहून तुमचं मन सुद्धा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन ती जागा पाहण्यासाठी इच्छूक असतं. अशीच एक जागा आहे जिचे नाव आहे धनुषकोडा. ही भारत आणि श्रीलंकेमधील एकमेव जमिनीवरील सीमा आहे. तिची लांबी फक्त 150 फूट आहे.
ही जागा जगातील सर्वात लहान जागांपैकी एक आहे. हे ठिकाण श्रीलंकेपासून फक्त 24 किलोमीटर दूर आहे. म्हणजेच हे भारताचे शेवटचे टोक आहे. एका बाजूला पल्क स्ट्रेट तर दुसऱ्या बाजूला मुन्नारची खाडी असलेलं हे ठिकाण पाहताना असं वाटतं जसं निळ्या समुद्राच्या मध्यावरती गिटार ठेवलेला आहे.
View this post on Instagram
धनुषकोडी या ठिकाणाचं सौंदर्य पाहून प्रत्येकाला तेथे जाण्याची इच्छा होते. सोशल मीडियावर देखील या ठिकाणाचे अनेक फोटो पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. इन्स्टाग्रामवरही Indian.travellers नावाच्या अकाउंटवर त्याचे फोटो पोस्ट करण्यात आलेत. स्थानिक लोकांपासून बाहेरच्या पर्यंटकांपर्यंत अनेक लोक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात.
हेही वाचा :
स्वत:च्या वाहनातून जंगल सफरीचा आनंद घ्यायचाय, चला चंद्रपूरला, वनविभागाकडून कमी खर्चात पर्यटनाची संधी
बदलत्या पर्यटन धोरणाची नांदी; राज्याच्या विविध भागात 20 पर्यटन महोत्सवांचे आयोजन
Special Story : महाराष्ट्राच्या बदलत्या पर्यटनाची नांदी, जेल टूरिझम ते हेरिटेज वॉक!
व्हिडीओ पाहा :
Beautiful tourist place Dhanushkod from India in Sea