Beauty hacks | चमकदार चेहरा आणि पांढरे दात हवेयत? मग अशाप्रकारे वापर ‘केळ्याचे साल’

2008च्या एका अभ्यासानुसार केळीच्या सालामध्ये मोठ्या प्रमाणात फिनोल्स असतात. ज्यात अँटीमाइक्रोबियल आणि अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात.

Beauty hacks | चमकदार चेहरा आणि पांढरे दात हवेयत? मग अशाप्रकारे वापर ‘केळ्याचे साल’
गुणकारी केळ्याचे साल
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 6:30 PM

मुंबई : आपल्या घरात डझनभर केळी आणली जातात, आणि मग त्यांना खाऊन त्याची साले फेकून दिली जातात आले. तुम्ही किंवा आम्ही नाही, तर आपण प्रत्येकजण असेच करतो. परंतु आपणास माहित आहे की, आपण फेकून देत असलेल्या फळाची साल आपली त्वचेची निगा राखू शकते, तसेच दात देखील उजळवू शकते. इतकेच नाही तर केसांचे आरोग्य देखील सुधारू शकते. चला तर, जाणून घेऊया केळ्याच्या सालाचे आरोग्यदायी फायदे…(Beauty benefits of banana peel)

त्वचा दिसेल तरुण आणि डागही नाहीसे होतील!

– केळीची साल त्वचेवर चोळल्यास त्वचेही चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात.

– त्याचबरोबर ही साल चेहर्‍यावरील डागही कमी करण्यातही मदत करते.

– केळीची साल चेहऱ्यावर चोळताना किंवा थोडावेळ चेहऱ्यावर ठेवल्यामुळे त्वचा हायड्रेट देखील होते.

– सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर तुमचे डोळे सुजल्यासारखे दिसत असतील, तर केळीची साल ही समस्या कमी करण्यासाठी वापरली जाऊ शकते. यासाठी ही साल आपल्या डोळ्यांवर थोडावेळ ठेवून पडून राहा.

विज्ञानानेही केले सिद्ध!

2008च्या एका अभ्यासानुसार केळीच्या सालामध्ये मोठ्या प्रमाणात फिनोल्स असतात. ज्यात अँटीमाइक्रोबियल आणि अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात. त्याच वेळी, आणखी दोन संशोधनातून असे दिसून आले आहे की, या फळाच्या सालामध्ये बायोअॅक्टिव कंपाऊंड आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यामुळे हे त्वचेसाठी चांगले मानले जातात (Beauty benefits of banana peel).

केसांसाठी उपयोगी केळ्याची साल

केळीच्या सालातील अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म केसांचे आरोग्य देखील सुधारतात. हा हेअर मास्क लावल्याने डोक्यातील कोंडा निघून जातो, केसांची गुणवत्ता सुधारते आणि त्यांची नैसर्गिक चमक देखील येते. या सालाचा हेअर मास्क तयार करण्यासाठी :

– केळ्याची साल ब्लेंडरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा.

– जर आपले केस तेलकट असतील, तर त्यात कोरफड घालता येईल.

– कोरड्या केसांसाठी त्यात एक चमचा नारळाचे तेल घाला.

– जर आपले केस गळत असतील, तर पपईचा तुकडा त्यात मिसळला जाऊ शकतो.

– आपल्या आवडीनुसार ही पेस्ट बनवा आणि केसांना 10-15 मिनिटांसाठी लावा. नंतर केस स्वच्छ धुवा.

(Beauty benefits of banana peel)

दातही होतील पांढरे शुभ्र!

2015 च्या Detection of antimicrobial activity of banana peel  या अभ्यासात दावा केला गेला होता की, केळीच्या सालातील गुणधर्म बॅक्टेरियांशी लढून दाताशी संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करतात. जर, यातील काही दाव्यांचा उपयोग केला, तर आपण केळीची ताज्या सालीने दात घासल्यास दातांचा पिवळसरपणा दूर होतो.

या गोष्टी लक्षात ठेवा!

– वापरासाठी केळ्याची साल नेहमी ताजी असावी.

– केळीची साल साठवून ठेवू नका.

– केळी बर्‍याच लोकांना पचत नाहीत. अशा लोकांनी कोणत्याही प्रकारे त्याचा त्वचेवर वापर करू नये.

– सालाची पेस्ट राहिल्यास ती रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येते. तथापि, एका दिवसापेक्षा जास्तकाळ ठेवू नका.

– केळीची साल सोलल्यानंतर किंवा चेहऱ्यावर वापरल्यानंतर तुम्हाला काही समस्या आल्यास त्याचा वापर थांबवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Beauty benefits of banana peel)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.