सुंदर डोळ्यांसह पापण्यांना बनवा आकर्षक, ‘हे’ तेल झोपण्यापूर्वी लावा
डोळ्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपल्या डोळ्यांच्या पापण्या खूप महत्वाची भूमिका बाजवतात. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या भुवया जाड असतील तर सौंदर्य आणखी वाढते.जर तुमच्या पापण्या आणि भुवया खूप पातळ असतील तर आम्ही येथे काही प्रभावी उपाय सांगत आहोत.
डोळे हे चेहऱ्याचे सर्वात सुंदर वैशिष्ट्य असून पापण्या आणि भुवया त्यांचे सौंदर्य आणखी वाढवतात. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या भुवया जाड असतील तर सौंदर्य आणखी वाढते. अश्यातच काही महिलांच्या बाबतीत त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या खूप पातळ असल्याने अनेक ब्युटी प्रॉडक्टचा वापर करत असतात. तसेच पापण्या जाड करण्यासाठी अनेक मोठं मोठ्या ब्रँडचे आयलॅश हेअर ग्रोथ ऑइल वापरले जातात. पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. त्यातच जर तुम्हाला बाहेर कार्यक्रमाला जाताना सुद्धा आयलॅशेश लावावे लागत असतील तर याने तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य खराब होऊ शकत. कारण आयलॅश लावताना वापरला जाणाऱ्या गम मध्ये असलेले कॅमिकलमुळे डोळ्यांच्या पापण्यांवर परिणाम होऊन पापण्या गळू शकतात. तुम्हालाही लांब आणि जाड डोळे आणि भुवया हव्या असतील तर काही घरगुती उपाय आणि टिप्स यांचा अवलंब करून ही इच्छा पूर्ण करू शकता.
पापण्या आणि भुवया दाट करण्याचे उपाय
नारळाचे तेल – तुमच्या डोळ्यांच्या पापण्या लांब आणि जाड करण्यासाठी नारळ तेल हा सर्वात प्रभावी उपाय आहे.यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध असल्याने तुम्ही जेव्हा हे तेल डोळ्यांना लावल्यास पापण्यांना पोषण देते आणि त्यांना मजबूत बनवते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या साहाय्याने वापर करून नारळाचे तेल डोळ्यांच्या पापण्यांना आणि भुव्यांवर लावा. काही दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसेल.
बदामाचे तेल- बदामाचे तेल पापण्या लांब आणि जाड करण्यासाठी देखील खूप चांगले आहे. बदामाच्या तेलात असणारे व्हिटॅमिन ई आणि प्रथिने तुमच्या पापण्यांना मजबूत करते आणि त्यांच्या वाढीस प्रोत्साहित करते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या पापण्यांवर आणि भुव्यांवर बदामाचे तेल लावा.
ग्रीन टी- ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल हे घटक असतात जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. त्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या पापण्या पातळ असल्यास दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पापण्यांना आणि भुव्यांना थंड केलेलं ग्रीन टी लावा.
व्हिटॅमिन ई तेल- व्हिटॅमिन ई हे तेल तुमच्या डोळ्यांच्या पापण्या मजबूत करतात आणि त्यांच्या वाढीस मदत करतात. यासाठी बाजारात मिळणारी व्हिटॅमिन ई कॅप्सूल घेऊन तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या डोळ्यांना आणि भुव्यांवर लावा. काही दिवसातच तुम्हाला पापण्यांमध्ये व भुवयांमध्ये फरक जाणवेल.
एरंडेल तेल- तुमच्या डोळ्यांच्या पापण्या आणि भुवया जाड बनवण्यासाठी एरंडेल तेल खूप चांगले आहे. यात रिसिनोलिक ॲसिड असते, जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते.त्यामुळे दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या पापण्यांवर आणि भुव्यांवर एरंडेल तेल लावा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)