Neem for Dandruff: कोंड्याची समस्या मुळापासून मिटवण्यासाठी ‘ या ‘6 पद्धतीने करा कडुनिंबाच्या पानांचा वापर

कोंडा झाल्यामुळे काही वेळा तुम्हाला लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. कोंड्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर कडुनिंबाच्या पानांचा वापर करावा.

Neem for Dandruff: कोंड्याची समस्या मुळापासून मिटवण्यासाठी ' या '6 पद्धतीने करा कडुनिंबाच्या पानांचा वापर
केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे रिठा-आवळा आणि शिककाई; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत!Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 5:07 PM

केसांमध्ये कोंडा होणं (Dandruff) ही एक सर्वसामान्य समस्या आहे, ज्याचा त्रास अनेकांना होतो. ज्या व्यक्तींची डोक्याची त्वचा अतिशय शुष्क, कोरडी (dry skin) असते त्यांना कोंड्याचा त्रास सर्वाधिक होतो. कोंडा झाल्यामुळे काही वेळा लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे कोंड्यामुळे केवळ तुमचं डोक प्रभावित होत नाही तर त्यामुळे केस गळणे, पातळ होणे, केस तुटणे अशा केसांच्या अनेक (hair problems) समस्याही उद्भवू लागतात. काही व्यक्तींना तर यामुळे टक्कलही पडू लागते. असे मानले जाते की कोंडा होण्याचे मुख्य कारण कोरडेपणा आहे. पण हे (कोंडा) त्वचेच्या पेशींमुळे होते ज्यांचे आयुष्य खूप कमी असते, त्या खूप वेगाने वाढतात आणि लवकर मरतात. मलसेजिया नावाची बुरशी ही कोंडा होण्यास जबाबदार असते. हिवाळ्यामध्ये त्याची वाढ जास्त होते.

कोंड्यावर उपाय काय ?

कोंड्यावर विचारपूर्वक उपचार न केल्यास, आपण कितीही प्रयत्न केले तरी तो परत वाढू शकते. कोंड्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर केस शांपूने धुवावेत, असा एक सामान्य समज आहे. मात्र कडुनिंबाचा वापर करून तुम्ही कोंड्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता. कसे ते जाणून घेऊया.

1) कडुनिंबाची पाने चघळा –

एनसीबीआयवर (NCBI) प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कोंड्यापासून मुक्ती मिळवायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दररोज सकाळी कडुनिंबाची पाने चघळणे. त्याची चव कमी कडू लागावी यासाठी ती पाने मधात मिसळून खाऊ शकता. किंवा कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून त्याचा काढा तयार करावा व तो गाळून पाणी प्यावे.

हे सुद्धा वाचा

2) कडुनिंबाचे तेल –

नारळाच्या तेलात कडुनिंबाची काही पाने घालून उकळावे आणि शेवटी त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळावे. अशा रितीने कडूनिंबाचे तेल घरी सहज तयार केले जाऊ शकते. मात्र त्यामध्ये लिंबाचा वापर जपून करा. आणि हे तेल वापरल्यानंतर उन्हात जाऊ नका. कारण केसांना लिंबू लावून उन्हात गेल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात. आपल्या टाळूवर हे तेल हळूवारपणे चोळावे व रात्रभर तसेच राहू द्यावे. सकाळी केस स्वच्छ धुवावे.

3) कडुनिंब आणि दही

कडुनिंब आणि दही एकत्र करणे हा कोंडा रोखण्याचा एक उत्तम मार्ग आहे. दही हे कोंड्यासाठी एक चांगला उपायय आहे. तसेच त्याच्या वापरामुळे आपल्या केसांचे क्यूटिकल्स मऊ आणि मजबूत होतात. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट बनवा, त्यामध्ये थोडे दही मिसळा व हे मिश्रण केसांना वा टाळूला लावा. ते 15-20 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर केस धुवून टाका. कडुनिंबातील ॲंटी-फंगल गुणधर्म तसेच दह्याच्या सुखकारक आणि थंड प्रभावामुळे कोंडा कमी होतो.

4) कडुनिंबाचा हेअर मास्क –

कोंड्यासाठी कडुनिंबाचा हेअर मास्क हा एक उत्तम उपाय आहे. कडुनिंबाची थोडी पाने घेऊन ती मिक्सरमध्ये बारीक वाटावीत व त्यामध्ये एक चमचा मध घालावा. हे दाटसर मिश्रण हेअर मास्क प्रमाणे संपूर्ण टाळूला व केसांना लावावे व 20 मिनिटे तसेच राहू द्यावे. ते वाळल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवावेत.

5) कडुनिंबाचा हेअर कंडिशनर म्हणून वापर –

कडुनिंबाचे वैशिष्ट्य असे आहे की त्याचा वापक केस धुण्यापूर्वी आणि केस धुतल्यानंतरही करता येतो व ते (कडुनिंब) तेवढेच प्रभावी ठरते. हे कंडिशनर बनवण्यासाठी कडुनिंबाची काही पाने घेऊन ती पाण्यात उकळून घ्या व ते पाणी थंड होऊ द्या. केस शांपूने धुतल्यानंतर कडुनिंबाच्या पाण्याने केस पुन्हा धुवून टाकावेत.

6) कडुनिंबाचा शांपू –

हा कोंड्याच्या सर्व समस्यांवरील सर्वात सोपा उपाय आहे. जवळच्या दुकानातून कडुनिंबाचा शांपू विकत घ्या. आठवड्यातून 2-3 वेळा या शांपूने केस धुवावे.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.