खराब केसांसाठी कोरफड लावा, पद्धत मात्र हीच वापरा; नाही तर…

केस कितीही लांब आणि दाट असले तरी केस खराब झाल्यामुळे ते चांगले दिसत नाहीत अश्यातच केस जर अधिकच डॅमेज झाले असतील तर आपल्याला चांगले दिसत नाहीत त्यामुळे आपला संपूर्ण लुक वेगळा दिसतो. खराब झालेल्या केसांना नवं जीवन देण्यासाठी तर कोरफड तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते.

खराब केसांसाठी कोरफड लावा, पद्धत मात्र हीच वापरा; नाही तर...
Aloe Vera gel hair maskImage Credit source: pixabay/unsplash
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 7:35 AM

प्रत्येकाला स्वतःचे केस लांब आणि जाड तसेच दिसायला निरोगी असावेत असे वाटते. यासाठी अनेक महिला केराटिन करून घेतात आणि आता बोटॉक्स ट्रीटमेंट मोठ्या ट्रेंडमध्ये आहे, पण या उपचारांचा परिणाम काही दिवसांचाच असतो. यानंतर केस आणखीनच खराब दिसू लागतात. या उपचारांमध्ये केसांना अनेक प्रकारची केमिकलयुक्त प्रॉडक्ट लावले जातात, ज्यामुळे कालांतराने केस अधिकच खराब होऊ शकतात. नैसर्गिकरित्या खराब झालेले केस नीट करण्यासाठी आणि केस मऊ करण्यासाठी कोरफड अतिशय प्रभावी आहे. खरं तर यात हायड्रेटिंग गुणधर्म असतात. आठवड्यातून एकदाच कोरफड काही गोष्टींसोबत लावल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात.

केस खराब होण्याची अनेक कारणे आहेत, जसे की धूळ आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे केस खूप फ्रिजी होतात. त्यात तुम्हाला हिवाळ्यात ही समस्या सार्वधिक वाढते, कारण अनेकजण हिवाळयात गरम पाण्याने केस धुवू लागतात. अश्यातच तुमचे देखील केस खूप फ्रिजी झाले असतील तर केस मऊ आणि नैसर्गिकरित्या चमकदार होण्यासाठी कोरफडमध्ये कोणत्या गोष्टी मिसळल्या जातात. ते जाणून घेऊयात.

अंडे आणि कोरफड

फ्रिजी झालेल्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कोरफड जेलमध्ये अंड मिसळू शकता. कोरफड केसांना हायड्रेट आणि मऊ करेल, तर अंडे प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत आहे, म्हणून हे केसांना चमकदार बनवण्यास आणि खराब झालेल्या केसांना चांगले करण्यास मदत करते. दर आठवड्याला अंड आणि कोरफडीचा हेअर मास्क लावल्यास केस नैसर्गिकरित्या चमकदार तर होतीलच, शिवाय केस तुटणे आणि गळणेही कमी होईल.

कोरफड आणि मेथी

केस मऊ, चमकदार करण्यापासून ते केसगळती रोखण्यापासून व कोंड्यापासून सुटका मिळवण्यापर्यंत, मेथी आणि कोरफड हेअर मास्क चांगले परिणाम देतात. अंड्यांचा वास आवडत नसेल तर मेथीदाणे भिजवून त्यांची बारीक पूड करून कोरफड जेलमध्ये मिक्स करून केसांना लावा. या दोन्ही गोष्टींचे कॉम्बिनेशन देखील काही दिवसात तुमचे केसांना चांगले परिणाम देतात.

कोरफड आणि दही

खराब झालेले केस चांगले करण्यासाठी आणि त्यात केसांना मजबूत करण्यासाठी तुम्ही दही आणि कोरफडीचा हेअर मास्क तयार करू शकता. सर्वप्रथम दही नीट फेटून त्यात कोरफड जेल मिसळा. कोंडा असणाऱ्यांसाठी हा हेअर मास्क खूप फायदेशीर आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.