Beauty Tips | ‘चारकोल’ने त्वचा बनेल नितळ, ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा!
चारकोलसुद्धा आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी चांगला उपयोगी आहे. (charcoal beautiful smooth skin)
मुंबई : सुंदर आणि नितळ चेहरा ठेवण्यासाठी आपण लिंबू, बटाटा, बेसन पीठ, कोरफड, हळद असं बरंच काही वापरतो. या सर्वांच्या मदतीने चेहऱ्यावर तेज येते, यात तिळमात्र शंका नाही. पण चारकोलसुद्धा आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी चांगलाच उपयोगी आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? (beauty tips charcoal mask for beautiful and smooth skin)
आपल्याला वाटतं चारकोल हा रंगाने काळा आहे. मात्र, तो चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडतो. चारकोल आपल्या त्वचेसाठी खूप मदतीचा ठरु शकतो. त्यासाठी तुम्हाला अॅक्टिव्हेटेड चारकोल वापरावा लागेल. हा चारकोल तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल. बाजारात फेसमास्क आणि फेसवॉशच्या स्वरुपातसुद्धा अॅक्टिव्हेटेड चारकोल मिळतो. चला तर मग जाणून घेऊयात चारकोलचे फायदे.
तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स असतील तर चारकोलच्या मदतीने या समस्येपासून सुटका मिळू शकते. त्यासाठी चारकोलचा फेसपॅक किंवा फेसवॉश किंवा दोन्हींचा वापर केला जाऊ शकतो.
- चारकोल फेसवॉश किंवा फेसपॅकच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चारकोलमुळे चेहरा तरतरीत राहण्यास मदत होते.
- चारकोमुळे चेहऱ्याची चांगल्या प्रकारे स्वच्छता होते. नियमित वापर केल्यांनतर चेहऱ्यामध्ये फरक दिसू लागेल. तो नरम, आणि टवटवीत दिसेल.
- तुमचा चेहरा जर तेलकट होत असेल तर तुम्ही चारकोलचा वापर करु शकता. चेहऱ्यावर येत असलेल्या सीबमला चोरकोल रोखून धरतो. आणि चेहरा तेलकट होत नाही.
चारकोल फेसपॅक
- हा फेसपॅक तयार करण्यासाठी बाजारात चारकोलच्या गोळ्या सहज अपलब्ध होतात. या गोळ्यांना चागंल्या प्रकारे बारीक करुन घ्या. त्यानंतर व्हिटॅमिन ई ची गोळी घेऊन ती या चारकोलमध्ये मिसळावी. गरज असल्यास त्यात थोडे पाणी मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर मास्क लावल्याप्रमाणे लावावे. हे मिश्रण चेहऱ्यावर कोरडे झाल्यानंतर हलक्या हातांनी काढून घ्यावे.
- तीन अॅक्टिव्हेटेड चारकोलच्या गोळ्या, मुलतानी माती, व्हिटॅमिन-ई चे तेल आणि मध पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावावे. 10 मिनिटांनतर चेहरा धुतल्याने चेहरा तजेलेदार होतो.
सूचना : वर सूचवलेला फेसपॅक ट्राय करण्याआधी कुठलीही अॅलर्जी होणार नाही याची शहानिशा करुन घ्यावी. तसेच, तज्ज्ञांचा सल्लादेखील घ्यावा.
(beauty tips charcoal mask for beautiful and smooth skin)
संबंधित बातम्या :
Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…
(beauty tips charcoal mask for beautiful and smooth skin)