Beauty Tips: तजेदार त्वचा पाहिजे आहे? मग ‘या’ पाच प्रकारे आवळ्याचा करा उपयोग

बहुगुणी आवळ्याचा चेहरा निखारण्यासाठीही उपयोग होतो. वेगवेळ्या प्रकारे चेहऱ्यावर लावल्याने याचे अनेक लाभ मिळतात.

Beauty Tips: तजेदार त्वचा पाहिजे आहे? मग 'या' पाच प्रकारे आवळ्याचा करा उपयोग
त्वचेसाठी आवळ्याचे उपाय Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 6:41 PM

मुंबई, आवळ्याला (Amla) विनाकारणच सुपरफूड म्हटले जात नाही. आवळ्यामध्ये एक-दोन नव्हे तर अनेक गुणधर्म आहेत, ज्यामुळे आयुर्वेदसुद्धा याला त्वचा, केस आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानतो. त्यात अँटी-ऑक्सिडंट्ससोबत व्हिटॅमिन सीही मुबलक प्रमाणात आढळते. त्वचेला (Skin) तरुण ठेवण्यासोबतच ते फ्री रॅडिकल्सलाही दूर ठेवते. याशिवाय चेहरा ताजेदार करण्यासाठीही आवळा गुणकारी (Benefits) आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या प्रकारे आवळा चेहऱ्यावर लावला जाऊ शकतो.

आवळा, दही आणि मध

चमकदार त्वचेसाठी हा फेस पॅक तयार करा. दोन चमचे आवळा पावडरमध्ये एक चमचा दही आणि एक चमचा मध मिसळा. त्याचे चांगले मिश्रण तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.  20 मिनिटे ठेवल्यानंतर धुवा. चेहऱ्यावर ग्लो दिसू लागेल.

आवळा, साखर आणि गुलाबपाणी

आवळा स्क्रब बनवूनही लावता येतो. हा स्क्रब त्वचेला एक्सफोलिएट करतो आणि त्वचेच्या मृत पेशी देखील काढून टाकतो. या स्क्रबमुळे तारुण्य टिपिक आणि पुटकुळ्या दूर राहतात. एक वाडग घ्या आणि त्यात एक चमचा आवळा पावडर मिसळा, अर्धा चमचा साखर आणि एक चमचा गुलाबजल घाला. हलक्या हाताने स्क्रब केल्यानंतर चेहरा धुवा.

हे सुद्धा वाचा

आवळा आणि कोरफड व

हा फेस मॉइश्चरायझिंग मास्क बनवण्यासाठी आवळ्याचा रस कोरफडीच्या जेलमध्ये घाला. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आवळा पावडर देखील वापरू शकता. दोन्ही मिक्स करा आणि 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर धुवा.

आवळा आणि पपई

त्वचा स्वच्छ करण्यासाठी आवळा आणि पपई दोन्ही मिसळून हा फेस पॅक तयार केला जातो. 2 चमचे आवळा रस घ्या आणि त्यात 2 चमचे पपईचा लगदा मिसळा. दोन्ही मिक्स करा आणि 15 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर धुवा. तुम्ही आठवड्यातून एकदा ते लावू शकता.

आवळ्याचा रस

आवळ्याच्या रसात कापसाचा गोळा बुडवून टोनरप्रमाणे चेहऱ्यावर लावा. तथापि, त्याचा दैनंदिन वापर टाळा आणि आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा वापरा. यामुळे चेहऱ्यवरील डाग दूर होतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.