हिवाळ्यात वारंवार कोंडा होतोय, जाणून घ्या शॅम्पू कसा वापरावा
थंडीच्या दिवसांमध्ये कोंडा वारंवार होत असतो. त्यामुळे या ऋतूत केस धुतले की कोंडा दूर होतो, पण तो एक-दोन दिवसात परत येतो. या लेखात आम्ही तुम्हाला काही शॅम्पूबद्दल सांगणार आहोत जे कोंडा कमी करू शकतात. चला जाणून घेऊया ही समस्या कशी टाळावी.
हिवाळा ऋतू सुरु झाला की बहुतेक लोकं केसांच्या समस्येने त्रस्त असतात. कारण या ऋतूत केस धुतले तरी वारंवार कोंडा होत असतो आणि हे सामान्य आहे. परंतु कोंडा टाळण्यासाठी लोकं केसांची काळजी घेणारी बरीच महागडे उत्पादने वापरतात. बाजारातून आणलेल्या महागड्या उत्पादनाचा वापर करून सुद्धा एक-दोन दिवसांनी केसांमध्ये कोंडा पुन्हा येतो. जेव्हा टाळूवर मृत पेशी जमा होऊ लागतात तेव्हा कोंड्याची समस्या सर्वाधिक उद्भवते. तरी सुद्धा अनेकांच्या मनात असा प्रश्न येतो की कोंडा वारंवार का होतो, कोंडा होण्यामागचं कारण काय? तुम्हीही कोंड्याच्या समस्यांशी झगडत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. कोंडा होण्याची कारणे काय आहेत आणि ती कशी टाळावी हे जाणून घेऊया.
कोंडा वारंवार का होतो?
खरं तर वारंवार डोक्यामध्ये कोंडा होण्याची अनेक कारणं असतात. केस नीट न धुणे, व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्सची कमतरता, टाळू जास्त तेलकटपणा असणे आणि मानसिक ताण ही देखील कारणे आहेत. हे टाळण्यासाठी तुम्ही शॅम्पूचा वापर करू शकता. परंतु कोंडा टाळण्यासाठी शॅम्पू कसा लावावा हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
शैम्पू कसे वापरावे
तुम्ही जेव्हा केसांचा कोंडा दूर करण्यासाठी बाजारातुन महागडा शॅम्पू खरेदी करता तेव्हा शॅम्पू खरेदी करताना लक्षात ठेवा की त्यात केटोकोनाझोल, सिक्लोपिरॉक्स आणि पिरोक्टोन ओलामाईन असावे. कोंडा दूर करण्यासाठी हे आवश्यक आहे. यासोबतच कोंड्यामुळे होणारे फंगल इन्फेकशन रोखण्यासही मदत होते. शॅम्पू लावल्यानंतर कंडिशनरचा वापर नक्की करा. कोंड्याची समस्या असल्यास तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना शॅम्पू लावून केस धुवा.
कोंडा टाळण्यासाठी इतर टिप्स
- केस नियमित धुणे : कोंडा टाळण्यासाठी नियमितपणे केस धुणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे टाळू स्वच्छ राहते आणि तेलकटपणा जमा होत नाही.
- डोक्याला मसाज करा : टाळूतील रक्ताभिसरण वाढविण्यासाठी हलक्या हातांनी डोक्यामध्ये मसाज करा.
- संतुलित आहार घ्या : व्हिटॅमिन बी, झिंक आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिडयुक्त आहार घेतल्यास कोंड्याची समस्या कमी होऊ शकते.
- तणाव टाळा : मानसिक ताण कमी करण्यासाठी योगा, मेडिटेशन किंवा मेडिटेशन सारख्या गोष्टींचा आधार घ्या.