तुमच्या हातांची नखंही सतत तुटतात? मग शरीरात असू शकते ‘या’ गोष्टीची कमतरता
आपली नखे सुंदर आणि मोठी असावीत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण काही स्त्रियांची नखे वाढताच तुटतात. जर तुमची नखंही तुटत असतील तर ती शरीरातील पोषणाच्या कमतरतेमुळे असू शकतात. चला जाणून घेऊया वारंवार नखे तुटण्याची कारणे कोणती असू शकतात.
आपल्या हाताची नखे आपले सौंदर्य तर वाढवतातच, त्याचबरोबर तुमचे आरोग्यही देखील दाखवतात. बहुतेक स्त्रियांना लांब नखे आवडतात. सध्या मार्केटमध्ये नेल आर्ट मोठ्या प्रमाणात केले जात आहे. लग्नसरा असो किंवा वाढदिवस तर प्रत्येक स्त्री नेल आर्ट करते. त्यात नखांवरही अनेक प्रकारची कला वापरली जाऊ लागली आहे. अशातच एखाद्या स्त्रीचे नखे कमी वाढतात, ते कृत्रिम नखे लावून हातांचे सौंदर्य खुलवतात. तुमची नखे मजबूत आणि चमकदार दिसावीत अशी प्रत्येकाची इच्छा असते.
परंतु दुसरीकडे पहिले तर काही स्त्रियांची नखे मोठी होताच तुटतात, आणि नखे तुटताना सुद्धा खूप वेदना होतात. जर तुमची नखे सुद्धा वारंवार तुटत असतील, कमकुवत होत असतील किंवा त्यांच्यावर पांढरे डाग दिसत असतील तर हे सामान्य नाही. हे तुमच्या शरीरात कोणत्याही आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे उद्भवू शकते.
आजकालची व्यस्त जीवनशैली, अनहेल्दी फूड आणि केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर यामुळे नखे कमकुवत होतात. पण तुम्हाला माहित आहे का की ही एकमेव बाह्य कारणे नाहीत. नखे तुटणे हे तुमच्या शरीरात सुरू असलेल्या बऱ्याच समस्यांशी संबंधित असू शकते. आज या लेखात आम्ही तुम्हाला हाताची नखे कमकुवत का असतात, त्यामागची कारणे काय असू शकतात आणि ती टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात.
नखे तुटण्याची मुख्य कारणे
पोषण तत्वांचा अभाव : नखे कमकुवत होण्याचे सर्वात मोठे कारण शरीरात जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिनांची कमतरता असू शकते. बायोटिन, व्हिटॅमिन बी 12, लोह आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नखे कमकुवत होऊ शकतात. अशावेळी जर तुम्हालाही नखे तुटण्याची समस्या असेल तर या पोषक घटकांचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा.
पाणी आणि रसायनांच्या जास्त संपर्कात येणे : वारंवार हात धुणे, जास्त वेळ पाण्यात राहणे किंवा केमिकल नेल पॉलिश वापरल्याने नखे कोरडी होतात, ज्यामुळे नखे तुटण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
लोहाची कमतरता (ॲनिमिया) : शरीरात लोहाची कमतरता असल्यास नखे पिवळी, पातळ होतात आणि तुटू शकतात. यासाठी आहारात पदार्थांचा समावेश करा.
डिहायड्रेशन : पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवर परिणाम तर होतोच त्याच बरोबर नखेही कोरडी पडतात आणि सहज तुटतात.
हार्मोनल बदल : शरीरात होणाऱ्या हार्मोन्स बदलामुळे तसेच गर्भधारणा, मेनोपॉज किंवा इतर हार्मोनल बदलां दरम्यान नखे कमकुवत होऊ शकतात.
मेडिकल कंडिशन : हायपोथायरॉईडीझम, सोरायसिस किंवा मधुमेह यासारखे आजार असल्याने सुद्धा नखांवर परिणाम करू शकतो.
नखे मजबूत करण्याचे मार्ग
संतुलित आहार घ्या : तुमच्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश करा. तसेच हंगामी हिरव्या पालेभाज्या, अंडी, नटस, दूध आणि वेगवेगळ्या डाळींचा समावेश करा. अश्याने तुमच्या नखांना सुद्धा पूरक पोषण मिळते आणि मूखे मजबूत राहतात.
बायोटिन पूरक आहार घ्या : डॉक्टरांच्या सल्ल्याने बायोटिन पूरक आहार घेतल्यास नखे मजबूत होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हालाही नखे तुटण्याची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वत:साठी बायोटिन सप्लीमेंट घ्या. यामुळे नखे तुटण्याची समस्या दूर होऊ शकते.
नखे हायड्रेटेड ठेवा: नखे मजबूत करण्यासाठी त्यांना हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे आहे. अशावेळी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने नखांना मसाज करा. हात धुल्यानंतर मॉइश्चरायझरचा वापर करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)