Baking Soda Scrub | हिवाळ्यात त्वचा निस्तेज झाली आहे, तर बेकिंग सोडा स्क्रब नक्की ट्राय करा
लागतो. डेड स्किन हटवण्यासाठी चेहऱ्याला एक्सफॉलिएट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
मुंबई : हिवाळ्यात ड्राय स्किन ही महिलांची सर्वात मोठी समस्या असते (Dry Screen In Winter). हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडते, त्यामुळे चेहऱ्यावर डेड स्किन जमा होते आमि चेहरा डल दिसू लागतो. डेड स्किन हटवण्यासाठी चेहऱ्याला एक्सफॉलिएट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. मात्र, क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग प्रमाणे रोज करु नये (Dry Screen In Winter).
एक्सफॉलिएशन हे आठवड्यात दोनदा करायला हवं. यासाठी तुम्ही बाजारात मिळणारं स्क्रब घेऊ शकता किंवा घरी तयार करण्यात आलेलं स्क्रबही वापरु शकता. आज आम्ही तुम्हाला असंच एक सिंपल स्क्रब कसं बनवावं हे सांगणार आहोत. याचा वापर करुन तुम्ही डेड स्किन सेलचा थर हटवू शकता आणि त्वचेला आणखी तजेलदार आणि तरुण बनवू शकता.
स्क्रबमध्ये खडबडीत कण असतात जे मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. धूळ, माती आणि प्रदूषणामुळे दर 2-3 दिवसात त्वचेवर घाणीचा थर जमा होते. त्यामुळे चेहऱ्याला एक्सफॉलिएट करणं महत्त्वाचं असतं.
DIY स्क्रब सामूग्री :
- बेकिंग सोडा (1 चमचा)
- मध (1 चमचा)
- थोडीशी हल्दी
स्क्रब बनवण्याची पद्धत
- एका वाटीत वरील सर्व सामूग्री एकत्र करुन घ्या.
- आधी चेहरा पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर चेहऱ्यावर हे मिश्रण लावून मसाज करा
- स्क्रब केल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या
- टॉवेलने चेहरा हलक्या हाताने पुसून घ्या
- त्यानंतर तुमच्या स्किन टाईपनुसार चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा किंवा फेस सीरम लावा (Dry Screen In Winter)
हा स्क्रब वापरण्याचा फायदा काय?
- बेकिंग सोडा, मध आणि हळदे तयार केलेला हा स्क्रब तुमच्या त्वचेला पूर्णपणे शुद्ध करेल, त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल.
- बेकिंग सोडा हा एक एक्सफॉलिएटर म्हणून काम करतं. हे तुमच्या चेहऱ्यावरील पोर्समध्ये असलेली घाण बाहेर काढण्यास मदत करतं.
- तर मधामुळे तुमची त्वचा मॉईश्चरायईज होते आणि स्किन ग्लो करते.
- तर हळदीमध्ये असेलल्या अँटीऑक्सिडेंट गुणांमुळे तुमची त्वचा उजळते.
आठवड्यातून किती वेळा एक्सफॉलिएशन करायला हवं?
डर्मेटोलॉजिस्टच्या मते, आठवड्यातून तीन वेळा चेहऱ्याला एक्सफॉलिएट करायला हवं. मात्र, हे तुमच्या स्किन टाईपवरही अवलंबून असतं. जर तुमची स्किन संवेदनशील असेल तर आठवड्यातून फक्त दोन वेळा याचा वापर करा.
Skin Care Tips | हेल्दी आणि चमकदार त्वचेसाठी ‘या’ सवयी गरजेच्या!https://t.co/gB4ZfQIj8t#skincare #skincareroutine #glowingskin
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 9, 2020
Dry Screen In Winter
संबंधित बातम्या :
Skin Care | सणासुदीच्या काळात ‘या’ चार गोष्टी मुरुमांपासून सुरक्षित ठेवतील!
Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!
Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!