Summer Fashion Tips : कॉटन, शिफॉन की आणखी काही…; उन्हाळ्यात कोणते फॅब्रिक वापरावे?
उन्हाळ्यात स्टायलिश आणि आरामदायी लूक मिळवण्यासाठी योग्य फॅब्रिक निवडणे खूप महत्वाचे आहे. या ऋतूत, तुम्ही असे कपडे परिधान करावेत जे घाम लवकर शोषण्यास मदत करतात आणि तुम्हाला आरामदायी वाटेल. या हंगामात कोणते कापडाचे कपडे परिधान करणे योग्य ठरेल ते जाणून घेऊयात...

बदलत्या ऋतूनुसार आपण आपल्या आहारात बदल करत असतो. तसेच बदलत्या ऋतूप्रमाणे आपल्या कपाटातील कपड्याची स्टाईल देखील बदलत असते. उन्हाळ्यात तुम्ही असे कपडे परिधान करण्याचा विचार करतात ज्यामध्ये तुम्ही सुंदर आणि स्टायलिश दिसाल तसेच तुम्हाला त्यात आरामदायी देखील वाटेल. अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या हंगामात योग्य फॅब्रिक निवडणे खूप महत्वाचे आहे. ज्यामध्ये तुम्हाला आरामदायी वाटेल. अशातच अनेक लोकं या ऋतूत सुती कापड खूप आरामदायक असल्याने यांची निवड करतात.
उन्हाळा हा असा ऋतू आहे ज्यात प्रत्येक व्यक्तीला खूप घाम येतो, म्हणून या ऋतूत आपण असे कापड परिधान करावे जे घाम शोषण्यास मदत करेल. म्हणूनच तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात कपड्यांची खरेदी सुरू करणार असाल, तर तुम्हाला प्रथम हे जाणून घ्यावे की या हंगामात कोणते फॅब्रिकचे कपडे खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरेल. चला तर मग आजच्या लेखात या बद्दल जाणून घेऊयात…
कॉटन फॅब्रिक
उन्हाळ्यासाठी कॉटन फॅब्रिक सर्वोत्तम आहे. म्हणूनच बहुतेक लोकं या ऋतूत सुती कपडे घालणे पसंत करतात. कॉटन फॅब्रिक पासून तयार केलेले कपडे परिधान केल्यानंतर खूप हलके वाटते आणि जे आरामदायी देखील असते. कॉटन हे घाम लवकर शोषून घेतो. उन्हाळ्यात सुती कपडे घालल्याने आराम मिळतोच, शिवाय ते फॅशनमध्येही खूप लोकप्रिय आहेत. याशिवाय, कॉटन स्वच्छ करणे देखील सोपे आहे. तुम्ही कॉटन सूट, साड्या, टॉप आणि कुर्ती या उन्हाळ्यात खरेदी करून परिधान करू शकता.
लिनेन फॅब्रिक
उन्हाळ्यासाठी लिनेन फॅब्रिक देखील परिपूर्ण आहे. कॉटनप्रमाणे, लिनेन देखील घाम चांगल्या प्रकारे शोषून घेते. याशिवाय, या कापडापासून बनवलेले कपडे स्टाईल आणि एलिगंट लूकसाठी परिपूर्ण असतात. लिनेनवर खूप लवकर सुरकुत्या पडतात, पण हे फॅब्रिक खूप हलके आणि आरामदायी आहे म्हणूनच लोकं उन्हाळ्यात ते परिधान करायला अधिक पसंती देतात.
रेयॉन फॅब्रिक
रेयॉन हे एक सिंथेटिक कापड आहे जे सिल्कसारखे मऊ असते. उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही कोणत्याही खास दिवशी किंवा कार्यक्रमात रेयॉनपासून बनवलेले ड्रेस परिधान करू शकता. याच्या मदतीने तुम्ही मॅक्सी किंवा वेस्टर्न ड्रेस देखील बनवू शकता. उन्हाळ्याच्या हंगामासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
सिल्क फॅब्रिक
उन्हाळ्यात सिल्क कपडे घालणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. विशेषतः एखाद्या उत्सवाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जाताना, तुम्ही सिल्क कपडे परिधान करू शकता. हे तुम्हाला एक उत्कृष्ट लूक देण्यास मदत करेल. तुम्ही तुमच्या आवडीचे सिल्क सूट, साड्या आणि ड्रेस शिवून घेऊ शकता. सिल्क साडी नेहमीच ट्रेंडमध्ये असते.
जॉर्जेट आणि शिफॉन फॅब्रिक
उन्हाळ्यासाठी शिफॉन आणि जॉर्जेट हे देखील एक चांगले पर्याय आहेत. उन्हाळ्यात लोकांना साड्या, सूट, कुर्ती, शर्ट आणि जॉर्जेटपासून बनवलेले कपडे घालायला आवडते. हे हलके कापड तुम्हाला उन्हाळ्यात एक उत्तम आणि आरामदायी लूक देण्यास मदत करू शकते. या कपड्यांत तुम्हाला सहज तयार कपडे मिळतील.