केसगळती आणि डँड्रफचा वैताग आलाय?, मग ‘ही’ भन्नाट युक्ती वापरा
पूर्णत: नैसर्गिक असलेली मेहंदी केसांसाठी खूप गुणकारी ठरु शकते. मेहंदीच्या वापराने केसांची निगा राखता येऊ शकते. (hair growth mehandi dandruff)
मुंबई : प्रत्येकाला दाट आणि लांब, मोकळे केस आवडतात. मात्र, सर्दीच्या काळात काहींना केस गळणे, डोक्यात कोंडा होणे (Dandrurr) या समस्या सुरु होतात. यावर उपाय म्हणून केसगळती होऊ नये यासाठी महिला वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करतात. कित्येक महिला रसायनांची मिसळ असलेले उत्पादनं वापरतात. मात्र, एवढे सारे उपाय करुनदेखील केसांना जास्त फायदा होत नाही. पण पूर्णत: नैसर्गिक असलेली मेहंदी केसांसाठी खूप गुणकारी ठरु शकते. मेहंदीच्या वापराने केसांची निगा राखता येऊ शकते. (heena mehandi fights with dandruff and helpful for growth of hair)
मेहंदीचे अनेक औषधी गुण आहेत. तुम्हालाही केसांच्या समस्या असतील तर मेहंदी वापरुन तुम्ही केसांच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.
केसांची वाढ
आपल्या सर्वांनाच लांब केस आवडतात. मात्र आजकालच्या धकाधकीच्या जीवनात केसांकडे दुर्लक्ष होते. तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे केसांची चांगली वाढ होत नाही. मात्र, केसांची वाढ होण्यासाठी आवश्यक असणारे नैसर्गिक गुण मेहंदीत असल्याने मेहंदी केसांसाठी पोषक ठरु शकते. मेहंदी लावल्यामुळे केसांची चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकते.
केसगळती थांबवते
हवामानात सातत्याने होणारे बदल, माणसिक तणाव तसेच अन्य कारणांमुळे महिलांना तसेच पुरुषांना केसगळतीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. तुमचेही केस गळत असतील तर तुम्ही केसांना मेहंदी लावून केसगळतीवर मात करु शकता. मेहंदीचे मिश्रण (पेस्ट) करुन केसांवर लावल्यावर केसांची गळती थांबवता येऊ शकते.
मेहंदी कंडीशनर
कोरड्या, निर्जीव केसांना मेहंदीच्या मदतीने चमकदार आणि मुलायम बनवता येऊ शकते. मेहंदी एखाद्या हेअर कंडीशनरसारखी काम करते. लिंबाचा रस, दही आणि मेहंदीचे मिश्रण करुन केसांना लवल्यास केस नरम, मुलायम होण्यास मदत होते.
Hair Care | केसांच्या समस्येवर घरगुती रामबाण उपाय!https://t.co/SvpdPBZ1oE#haircare #HairFall #Tips #lifestyletips
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 27, 2020
संबंधित बातम्या :
Health | केस विरळ होण्याची समस्या, काळजी घेण्याऐवजी तुम्हीही ‘या’ चुका करताय?
आजारांपासून दूर राहा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे 7 घरगुती उपाय
कोरोना काळात ‘हे’ पाच घटक वाढवतील रोगप्रतिकारक शक्ती!
(heena mehandi fights with dandruff and helpful for growth of hair)