Skin Care Tips : चेहर्यावरील अनवॉंटेड केस काढून टाकण्यासाठी करा हे घरगुती उपाय
हे उपाय अगदी सोपे आणि प्रभावी घरगुती उपचार आहेत ज्यामुळे चेहऱ्यावरील केस नैसर्गिकरित्या काढून टाकू शकतात. (Here are some home remedies to remove unwanted facial hair)
मुंबई : चेहर्यावरील अनवॉंटेड केस ही एक समस्या आहे, ज्यापासून बहुतेक स्त्रिया सुटका करु इच्छित असतात. जर आपल्याला प्रत्येक वेळी सलूनला भेट देणे शक्य नसेल तर आपण यासाठी काही घरगुती उपाय देखील अवलंबू शकता. हे उपाय अगदी सोपे आणि प्रभावी घरगुती उपचार आहेत ज्यामुळे चेहऱ्यावरील केस नैसर्गिकरित्या काढून टाकू शकतात. (Here are some home remedies to remove unwanted facial hair)
साखर आणि लिंबाचा रस
यासाठी 8-9 चमचे पाण्यात दोन मोठे चमचे साखर आणि लिंबाचा रस मिसळावा लागेल. त्यात बुडबुडे येईपर्यंत हे मिश्रण गरम करा आणि नंतर ते थंड होऊ द्या. हे स्पॅचुलाच्या मदतीने प्रभावित भागावर लावा आणि सुमारे 20-25 मिनिटे ठेवा. हे चेहऱ्यावर गोलाकार चोळून थंड पाण्याने धुवा.
हे कसे कार्य करते?
साखर एक नैसर्गिक एक्सफोलीएटिंग एजंट आहे आणि गरम साखर आपल्या केसांवर चिकटते. लिंबाचा रस त्वचेच्या केसांना नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. तसेच त्वचेचा टोन हलका करण्यात मदत करते.
लिंबू आणि मध
यासाठी आपल्याला दोन चमचे साखर आणि लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळावे लागेल. मिश्रण सुमारे तीन मिनिटे गरम करावे. आवश्यक असल्यास मिश्रण पातळ करण्यासाठी पाणी घाला. पेस्ट थंड झाल्यावर प्रभावित भागावर कॉर्नस्टार्च लावा आणि केसांच्या वाढीच्या दिशेने पेस्ट पसरवा. पुढे, एक व्हॅक्सिन पट्टी किंवा सूती कपडा वापरा आणि केसांच्या वाढीच्या उलट दिशेने ओढा. मध त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यात मदत करते.
ओट्स आणि केळी
ही पद्धत अगदी सोपी आहे. दोन चमचे ओट्सचे पीठ योग्य केळीमध्ये मिसळा आणि ही पेस्ट प्रभावित भागावर लावा. 15 मिनिटांसाठी मालिश करा आणि थंड पाण्याने धुवा. ओट्स एक छान हायड्रेटिंग स्क्रब बनवते आणि अँटीऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असते. हे आपल्या त्वचेवरील लालसरपणा दूर करण्यास मदत करते. आपल्या चेहऱ्यावरील केस काढून टाकण्याशिवाय ही पेस्ट चमकदार त्वचा तयार करण्यात मदत करते.
बटाटे आणि ओट्स
पाच चमचे बटाट्याच्या रसामध्ये एक चमचा मध, लिंबाचा रस मिसळा. दरम्यान, ओट्स (रात्रभर भिजवलेले) बारीक वाटून त्याची पेस्ट करा. हे मिश्रण प्रभावित भागावर सुमारे 20 मिनिटांसाठी लावा. जेव्हा ते पूर्णपणे कोरडे होईल तेव्हा ते धुवा. (Here are some home remedies to remove unwanted facial hair)
निवडणूक पुढे ढकलण्याची ओबीसींची मागणी, नागपूर प्रशासनाकडून मात्र जोमात तयारी, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातhttps://t.co/JyR0zwjbQV#Elections2021 | #obc | #OBCReservation
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2021
इतर बातम्या
प्रत्येकाला चेकद्वारे पेमेंट देता? मग जाणून घ्या हा नियम, अन्यथा द्यावा लागेल अतिरिक्त चार्ज